श्रीमती रंजना मधुकरराव लसणे
कवितेचा उत्सव
☆ रंजना जी यांचे साहित्य # 167 – देशभक्ती गीत – साद ही आईची ☆ श्रीमती रंजना मधुकरराव लसणे ☆
☆
धावले वीर हो, साद ही आईची।
शृंखला तोडण्या, भारती माईची।।धृ।।
मातल्या यवना, माझा शिवबा पुरे।
पाहूनी धार ती, तक्त का हादरे।
स्वराज्य हिंदवी, मनिषा आईची।।१।।
तुझी संपंन्नता, मोहविले जगा।
व्यापारी सोंग रे, घेऊनी दे दगा।
प्रलोभने जाळली, ती सुखसोयीची।।२।।
पाहुनी शौर्य ते, शत्रू धास्तावले।
वंदे मातरम् ,घोष निनादले।
पुत्र चढले सुळी, मुक्तता आईची।।३।।
दुस्तर संग्राम , पुन्हा होणार ना।
वक्र दृष्टी कधी ती ऊठणार ना।
पडसे धाडसी, माय जिजाईची।।४।।
☆
© रंजना मधुकर लसणे
आखाडा बाळापूर, जिल्हा हिंगोली
9960128105
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈