श्रीमती अनुराधा फाटक
कवितेचा उत्सव
☆ स्वागत श्रावणाचे… ☆ श्रीमती अनुराधा फाटक ☆
वर्षाराणीचे गे सडासंमार्जन
अधिकाने केले रंग रेखाटन
मनीचा वसंत उमलून आला
श्रावण स्वागता उत्सुक झाला!
हिरव्या सृष्टीचा आनंद आगळा
फुलांफळांनी गच्च बहरला
घरट्यातले पक्षी बाहेर आले
निळ्या अंबरात फिरू लागले !
सूर्य किरणांना वाकुल्या दावीत
कौतुके प्रेमाचे शिंपण करीत
एखादी जलधारा येत अवचित
इंद्रधनूही येई रंग उधळीत!
असा श्रावण साठा आनंदाचा
निर्माता ठरतो नव्या चैतन्याचा
निसर्गाचा आनंद श्वासात घेत
श्रावण सणांचे करू या स्वागत!
© श्रीमती अनुराधा फाटक
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈