? कवितेचा उत्सव ?

☆ मातृभूमी वंदना 🇮🇳 ☆ सौ. मुग्धा कानिटकर ☆

वंदन त्रिवार भारतमाते 

शत शत नमन तुला //धृ//

 

भाषा, प्रांत, विभिन्नतेचे

सूर उमटती इथे एकतेचे

भूषणे हीच तुझी माते

वंदन त्रिवार भारतमाते 

शत शत नमन तुला..//१//

सस्यशालिनी विशालतेचे

सागर -नद्यांच्या संगमांचे

अनुपम रूपे तुझी माते

वंदन त्रिवार भारतमाते 

शत शत नमन तुला..//२//

सकल हृदयांत देशसेवेचे

बीजारोपण हे सुसंस्कारांचे

स्वप्ने साकार होती तुझी माते

वंदन त्रिवार भारतमाते 

शत शत नमन तुला..//३//

विज्ञानाचे अन् अध्यात्माचे

ज्ञान मिळे इथे शाश्वततेचे

प्रेमभावना ही तुझी माते

वंदन त्रिवार भारतमाते 

शत शत नमन तुला..//४//

तरुणाईला पंख दे प्रतिभेचे

स्थान लाभो तुज विश्वगुरुचे

साक्षात्कार देती तुझी माते

वंदन त्रिवार भारतमाते 

शत शत नमन तुला..//५//

© सौ. मुग्धा कानिटकर

विश्रामबाग, सांगली – मो. 9403726078

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments