सौ. जयश्री पाटील

? कवितेच्या उत्सव ?

☆ आठवणी… ☆ सौ. जयश्री पाटील ☆

आठवणी कशा

येतात कोठून

मनावर हळू

फुंकर घालून

 

पिंगा घालतात

फेर धरतात

सभोवती अशा

नाच नाचतात

 

मनाच्या तळाशी

घट्ट बिलकुल

बसतात खोल

डोहात रुतून

 

जखमे वरली

खपली उडते

भळभळत ती

उघडी पडते

 

असंख्य घटना

येतात दाटून

अलगत येते

पाणी डोळ्यातून

 

सुखद काहीशा

मऊ मखमली

मोरपीस जणू

फिरतसे गाली

 

क्षण आनंदाचे

येतात जीवन

जाता येतील का

सोबत घेऊनी

© सौ. जयश्री पाटील

विजयनगर.सांगली.

मो.नं.:-8275592044

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments