श्री तुकाराम दादा पाटील

? कवितेचा उत्सव ?

☆ झालो समर्थ आम्ही… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

गाऊमिळून सगळे आता भविष्य गाणे

स्वातंत्र्यसूर्य जपला आम्ही पराक्रमाने

 

होतो जगात आहे जयघोष भारताच

बिमोड पूर्ण झाला आहेच संकटांचा

डुलतो नभी तिरंगा आदर्श वास्तवाचा

नांदायचे आम्हाला आता इथे सुखाने—-

 

जपली मनात सगळी आम्ही सवंग नाती

सांभाळते जिव्हाळा इथली पवित्र माती

आहेत भावना या रुजल्या मनात साऱ्या

बनलो समर्थ आम्ही साधार निर्णयाने—-

 

स्वप्नातले  इरादे साकार व्हावयाला

भरपूर भाव आहे अजूनी परिश्रमाला

घेऊन हात हाती राबू मिळून सारे

एकेक शिखर गाठू आता क्रमाक्रमाने—-

 

अभिमान सार्थ आहे आम्हास संस्कृतीचा

विश्वास मान्य आहे आदर्श मायभूचा

इतिहास बोध देतो येथे पराक्रमाचा

नमतो आम्ही तयाला अत्यंत आदराने—-

 

चैतन्य चंद्र आहे हाती नव्या पिढीच्या

दिपल्या प्रकाश वाटा कित्येक योजनांच्या

सामर्थ्य खूप आहे बाहूत आज त्यांच्या

करतात देशसेवा  सारे तनामनाने—-

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments