श्री आशिष  बिवलकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

?– वाट चाले पंढरीची– ? ☆ श्री आशिष  बिवलकर ☆

वाट चाले पंढरीची,

आनंदवारीत वारकरी दंगला !

ओसंडला आनंद,

विठ्ठल रंगांनी चेहरा रंगला !

भगवी पताका खांद्यावर,

फेटा बांधला शिरी !

मार्गस्थ देह झाला,

मुखी नाम रामकृष्ण हरी !

कशाला चिंता संसाराची,

विठ्ठल भार त्याचा वाहतो !

ओढ त्याची लागे मना ,

वारीची वाट आनंदे चालतो !

हृदयी भक्ती भाव

आत्मा झाला पांडुरंग !

वाट न वाटे खडतर,

सावळा देव चाले संग !

भेटी  संतसज्जन,

वैष्णवांचा रंगला सोहळा !

कपाळी झळकती गंध,

तुळशीमाळ घालुनी गळा !

रामकृष्ण हरीनामाचा घोष,

नाद करी टाळ मृदूंग !

आसमंत विठ्ठलमय झाला,

मुखी संतांचे अभंग !

माऊली वाट पाहे,

कर कटेवर ठेवुनी !

भेटी लागे जीवा,

लेकरं निघाली धावुनी !

© श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
5 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments