सौ. नेहा लिंबकर

? कवितेचा उत्सव ?

☆ मी एक सामान्य☆ सौ. नेहा लिंबकर ☆

भोवतालच्या घटनांकडे तटस्थपणे बघणारा

मनातल्या सार्‍या उद्रेकांना थोपवणारा

आणि बाहेर काहीच न बोलणारा

मी एक सामान्य

 

जागोजागी थुंकताना समोरच बघत असणारा

रागाचा पारा आतल्या आत वाढवणारा

आणि बाहेर काहीच न बोलणारा

मी एक सामान्य

 

आया बहिणींचा अपमान तटस्थपणे बघणारा

गुंडगिरीचा कळस बघून अस्वस्थ होणारा

आणि बाहेर काहीच न बोलणारा

मी एक सामान्य

 

खोट्या बातम्या मुखवट्यांचा राग येणारा

आत्मकेंद्री, स्वार्थी अन्  बेफिकिरीवर उचकणारा

आणि बाहेर काहीच न बोलणारा

मी एक सामान्य

 

मी बोलून काहीच  नाही बदलणार

हाच विचार पक्का असणारा

‘मी’ च का ? या घोळात अडकणारा

सामान्यांच्या रेषेत चपखल बसणारा

आणि बाहेर काहीच न बोलणारा

मी एक सामान्य

 

ह्या चक्रातून बाहेर पडायला

मोकळ्या श्वासाने जगायला

जिद्दीने विवेकाने स्पष्ट बोलायला

एकदातरी ह्यातून बाहेर पडायला

चला बदल घडवायला

 

सामन्यांत असामान्य व्हायला.

 

© सौ.  नेहा लिंबकर

पुणे 

मो – 9422305178

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments