सौ.ज्योत्स्ना तानवडे

? कवितेचा उत्सव ?

☆ बंध जिव्हाळ्याचे ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆ 

(सर्वोत्कृष्ट पुरस्कार प्राप्त कविता)

झाली धावती दुनिया

जिवलग जाती दूर

कसा जुळावा एकोपा

वाटे मनी हुरहूर ||

होते अपेक्षांचे ओझे

कोणी न माघार घेती

प्रेमासवे द्वेष ईर्षा

हात धरुनिया येती ||

खोटे रुसवे फुगवे

किती दिसांचा दुरावा

मानपान रागापायी

उगा अबोला धरावा ||

नाती दुरावली व्यर्थ

होती मनोमनी खंत

वाटे सरावी रुष्टता

पुन्हा फुलावा वसंत ||

गुढीपाडव्याचा सण

खास निमित्त मिळाले

रम्य अशा संध्याकाळी

गणगोत जमा झाले ||

गळामिठी गप्पागोष्टी

मनोमनी मुक्त झाले

आपोआप संवादाचे

सुसंवाद ऐकू आले ||

दाटलेले मेघ सारे

गेले अवघे विरून

झाले मोकळे आकाश

मनी आनंद भरून ||

© सौ.ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments