सुश्री वृंदा (चित्रा) करमरकर
कवितेचा उत्सव
☆ चाहुल थंडीची… ☆ सुश्री वृंदा (चित्रा) करमरकर ☆
हळवीशी, कोवळीशी
जाग दंवाला आली
पाने,फुले,विहगांना
चाहूल थंडीची लागली
किलबिलही पाखरांची
का अशी मंदावली
चोच पंखांत लपवूनी
ती ऊब शोधू लागली
पाकळ्या फुलांच्याही
झळकल्या हिऱ्यांपरी
भिनली लयदार झिंग
माझिया अंगावरी
शाल लपेटुनी अशी
मी धुक्याची अभ्रेस्मी
थंड मदहोश ही हवा
स्पर्श भासतो रेशमी
कुंतलातील दंवफुले
सजणाच्या अधरावरी
बाहुपाशात आज त्या
पहाट जाहली रुपेरी
© वृंदा (चित्रा) करमरकर
सांगली
मो. 9405555728
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈