सौ.ज्योत्स्ना तानवडे

? कवितेचा उत्सव ?

☆ आई धावत ये … ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆ 

!!  श्री  !!

तूची माता तूची त्राता | देवी अंबाबाई |

तुझ्या दर्शना आलो आई | धावत ये लवलाही |

आई धावत ये लवलाही ||

☆ 

तुझी ओढ मना अनिवार | दर्शनासी झालो अधीर |

ऐकुनी माझी ही साद | आई सत्वरी दे प्रतिसाद |

सर्व समर्पित तुझ्या ठायी | धावत ये लवलाही |

आई धावत ये लवलाही ||

☆ 

हाके सरसी धावत येसी | भक्तवत्सले अंबाबाई |

लेकरांसी दुखवीत नाही |अगाध माया तुझी ग आई|

किती तुला मी विनवू आई | धावत ये लवलाही |

आई धावत ये लवलाही ||

☆ 

संकटांचा पडला घाला | जीव किती हा घाबरला |

दुःखविमोचिनी तू गे आई | तुझ्याविना जगी त्राता नाही |

एकची आस उरली | धावत ये लवलाही |

आई धावत ये लवलाही || 

☆ 

© सौ.ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

1 Comment
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Dr. Nishikant Shrotri

ज्योत्स्ना तानवडे यांच्या या कवितेतून आर्तता जाणवते. लवलाही या शब्दाचा कलात्मक वापर खूप भावला. सुंदर प्रासादिक रचना आहे.