श्री आनंदहरी

? कवितेचा उत्सव ?

 ☆ खरंच सांगा… ☆  श्री आनंदहरी  ☆ 

माझा माझा म्हणतो देश हा

मी देशाचा आहे काय ?

 देशासाठी आपण आपुल्या

खरंच सांगा करतो काय ? !!

 

स्वातंत्र्यासाठी कितीक वीरांनी

प्राणांचीही दिली आहुती

आज आपणा स्वातंत्र्याची त्या

सांगा जाणीव आहे किती ?

हक्क सांगतो सदैव आपण

कर्तव्याला स्मरतो काय ?      ।।

 

कधी बंद,कधी मोर्चे काढता

शांततेचाच असतो नारा

कुठून कसा हो शिरतो त्यात

हिंसेचा मग विनाश वारा ?

मालमत्ता ही आपुली सारी

सांगा आपण राखतो काय ?  ।।

 

भारत माझा देश आहे

प्रतिज्ञा नितदिन म्हणतो आपण

सर्व धर्म समभाव हा असता

दंगली का हो करतो आपण ?

देशातील साऱ्या बांधवांशी

खरंच समतेने वागतो काय ? ।।

 

आपुल्यासाठीच असे कायदा

सांगा आपण किती पाळतो ?

देश आपुला आहे तर मग सांगा

भ्रष्टाचार हा का बोकाळतो ?

कितीही गरजलो शब्दांतुनी तरी

आपण एकचि असतो काय ?  ।।

 

माझा माझा म्हणतो देश हा

मी देशाचा असतो काय ?

देशासाठी आपण आपल्या

खरंच सांगा करतो काय ?  ।।

 

© श्री आनंदहरी

इस्लामपूर जि. सांगली

८२७५१७८०९९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments