? कवितेचा उत्सव ? 

☆ राॅय किणीकर : काही रूबाया ☆ राॅय किणीकर ☆

हा दोन घडीचा तंबूतील रे खेळ

या विदुषकाला नाही रडण्या वेळ

लावून मुखवटे नवा खेळ चल लावू

ठेवून सावल्या पडद्यामागे जाऊ

मी शब्द परंतू मूर्तिमंत तू मौन

मी पंख परंतू क्षितीजशून्य तू गगन

काजळरेघेवर लिहिले गेले काही

(अन)मौनाची फुटली अधरावरती लाही

शहाण्या शब्दांनो हात जोडतो आता

कोषात जाऊनी झोपा मारीत बाता

रस रूप गंध अन स्पर्श पाहुणे आले

घर माझे नाही, त्यांचे आता झाले

जळल्यावर उरते एक शेवटी राख

ती फेक विडी तोंडातील काडी टाक

जळण्यातच आहे गंमत वेड्या मोठी

दिव्यता अमरता मायावी फसवी खोटी

ही भूक शिकविते मागायाला भीक

अन भीती म्हणते गळा काढूनी भूंक

भूक आणि भीती देवाची दैवाची

शिकविते ज्ञातही कोणी अज्ञाताची

का प्रवास म्हणतो टप्पा हा शेवटचा

वर्तुळात फिरतो कोष मध्यबिंदूचा

प्रारंभ नसे ना शेवट या रेषेला

प्रश्नातच असते उत्तर ज्याचे त्याला.

– राॅय किणीकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments