☆ 🌧️ म्हण बदलायची वेळ आली ? 🤣 ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆
“गर्जेल तो पडेल काय ?” ही दरवर्षी पावसाळ्यात कानावर पडणारी म्हण, यावर्षीपासून इतिहास जमा होणार की काय, अशी मला पावसात न भिजताच ओली भीती वाटायला लागली आहे मंडळी ! असं वाटायच कारण म्हणजे यंदा पाऊस आला पण नेहमीसारखं त्याचं आगमन सुरवातीला विशेष जाणवलं नाही. नंतर नंतर त्यानं अनेक राज्यात हैदोस घातला ही बाब आलाहिदा, पण यंदा त्याच आगमन जणू निसर्गाने ढगाला सायलेंसर लावला आहे अशा स्वरूपातच होतंय, हे आपण पावसात न भिजताच मान्य कराल याची मला कांदा भजी खाता खाता खात्री आहे ! या मागची वैज्ञानिक कारण काय आहेत यावर हवामान खाते विजेसारखा प्रकाश टाकेल न टाकेल, पण आपल्या सारख्या सुज्ञ लोकांच्या, पावसात ओल्या झालेल्या सुपीक डोक्यातून याच काय उत्तर असेल ते आपण, म्या पामराला लवकरात लवकर कळवले तर बरं होईल. नाहीतर काय होईल, आत्ता कांदा भजी खायला कितीही कुरकुरीत लागत असली तरी एखाद्याच्या ओल्या डोक्यातून आलेलं एखादं या मागच भन्नाट कारण माझ्या जिभेची चव बीघडवायला पुरेसं आहे, होय की नाही ? आणि ती व्यक्ती माझ्यासारखा कांद्या भज्या बरोबर गरमा गरम आल्याचा चहा न घेता इतर काही “अमृततुल्य पेय” पीत असेल तर मग माझं रक्षण धो धो पडणाऱ्या पावसात वरचा छत्रीधारी सुद्धा करू शकणार नाही, याची मला बालंबाल खात्री आहे !
हे ढगांच असं मूकं राहणं, विजांच न कडकडणं मला अजिबातच आवडलेलं नाही मंडळी. त्यामुळे होत काय, खराखुरा पावसाळा यंदा आला आहे असं वाटतच नाही माझ्या सारख्या सामान्य माणसाला. मग पावसाळी पिकनिक ठरवायचा मूडच जातो माझा !
मंडळी मी जेंव्हा माझ्या नसलेल्या डोक्याला थोडा ताण दिला तेंव्हा याच एक उत्तर माझ्या डोक्यात चमकून गेलं, बघा तुम्हांला पटतंय का ! सध्या सर्वपक्षीय नेत्यांचा, या नां त्या कारणाने जो घोषणारुपी गडगडाट चालला आहे त्याला घाबरून मेघांचा घसा तर बसला नसेल ना? हे माझं कारण मलाच पटलं आणि मी परत एकदा कांद्या भज्या बरोबर आल्याच्या चहाचा घोट घेतला आणि भरून पावलो !
ताजा कलम- कुठल्याही निसर्ग कोपाला लागू असलेलं “हा ग्लोबलवार्मिंगचा परिणाम आहे” हे घासून गुळगुळीत झालेलं उत्तर देवून माझ्या डोक्याची आणखी शकलं करू नयेत, कारण हा निसर्गकोप नक्कीच नाही !
संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.)
☆ गोष्ट एका सी. ई.ओ.ची — भाग-२☆ श्री मंगेश मधुकर ☆
(मॅडमच्या बोलण्यानं काळजाचा ठोका चुकला.तेवढ्यात फोन आल्यानं मॅडम बिझी झाल्या आणि मी मात्र…) इथून पुढे
पाचेक मिनिटं झाली तरी सीईओ फोनवर बिझी आणि मी नुसताच बसलेलो.सहनही होत नाही अन सांगताही येत नाही अशी अवस्था.शेवटी एकदाचा फोन संपला.
“सॉरी!!” चेअरमन साहेबांचा फोन होता.जरा महत्वाचं काम होतं”
“मॅडम,नक्की काय झालंय?एकट्यालाच का इथं बोलावलंय”
“मि.अनिल,सगळं कळेल.जरा धीर धरा.”
“काही चूक झाली असेल तर आधीच माफी मागतो.नोकरीची खूप गरज आहे.”मी हात जोडले तेव्हा मॅडम मोठ्यानं हसायला लागल्या.
“अरे अनिल,मला ओळखलं नाही का?”
“खरं सांगू.नाही ओळखलं.”
“अरे मी मीनाक्षी,‘ब’ तुकडी,नववीपर्यंत आपण एकाच वर्गात होतो.”कसं अन काय रिअॅक्ट व्हावं हेच समजत नव्हतं.टोटल ब्लॅंक.कालच डायरीतला नंबर बघितल्यावर आठवण झाली आणि आज चक्क तिची भेट.भान हरपून एकटक बघत राहिलो. “हॅलो,कुठं हरवलास”मॅडमच्या आवजानं तंद्री तुटली.
“जुनी ओळख चांगली लक्षात ठेवलीत”
“नॉर्मल बोल.मॅडम नको शाळेत म्हणायचा तसं ‘मीना’ म्हण आपण ऑफिसमध्ये नाहीये.इथं आपल्याला ओळखणारं कोणी नाही.”
“पण आपल्यामध्ये कंपनी आहे ना.मी साधा ऑफिसर आणि तुम्ही सीईओ..आपल्यातलं अंतर खूप मोठयं.”
“सीईओची ऑर्डर आहे असं समज.”
“का त्रास देता”
“अनिल,तुझ्यात काहीही फरक नाही रे.शाळेत होता तसाच आहेस.लाजरा-बुजरा,घाबरट,कायम डोक्यावर शंभर किलोचं ओझं असल्यासारखा वागणारा.”
“तू …सॉरी!!तुम्ही मात्र पार बदललात”
“खरंय,चवळीची शेंग होते आता मस्त गरगरीत दुधी भोपळा झालेय.”दोघंही खळखळून हसलो.
“किती वर्षांनी भेटतोय.”मी
“सत्तावीस”
“अरे वा!!एवढं परफेक्ट लक्षात आहे”
“तुला कधीच विसरले नाही.”मला जोराचा ठसका लागला पण मनात आनंदाचा धबधबा सुरू झाला.
“म्हणजे तुम्हीपण..”चेहऱ्यावरचा आनंद मला लपत नव्हता.
“तुम्हीपण म्हणजे,ए बाबा,आधी पूर्ण ऐक.प्रेमाचा वगैरे मामला नाहीये.”तिच्या परखड बोलण्यानं बटन बंद केल्याप्रमाणे आनंदाचा धबधबा बंद झाला.
“मग लक्षात रहायचं कारण ….”
“तुझा चांगुलपणा,वर्गात सगळे छळायचे,खोड्या काढायचे तरीही तू नेहमीच मदत करायचा.कधीच तक्रार केली नाहीस.माझ्या महितीतला इतकं चांगलं वागणारा पहिला तूच ..”
“थॅंक्यु”
“तुला तर माहितीये की शाळेत मी बिनधास्त होते.मुलांना त्रास द्यायला आवडायचे.त्यांच्याशी भांडायला मजा यायची.एकदा मधल्या सुट्टीत वर्गात आपण दोघंच होतो.सरांच्या खुर्चीला मी च्युइंगम लावलं ते सरांच्या लक्षात आलं.असले उद्योग नेहमी मुलंच करतात म्हणून सगळा दोष तुझ्यावर आला.सर वाट्टेल ते बोलले. वर्गासमोर अपमान केला तरीही तू गप्प राहिलास.वर्गाबाहेर काढलं.जाताना तू माझ्याकडं पाहिलंस त्यावेळच्या तुझ्या नजरेतला थंडपणा अस्वस्थ करून गेला.आजही आठवलं कि अंगावर काटा येतो/”
“जे झालं ते झालं”
“तसं नाही रे!!सुरवातीला मजा आली पण नंतर अपराध्यासारखं वाटायला लागलं.तू चूपचाप सगळं सहन केलसं पण माझं नाव सांगितलं नाहीस.ही गोष्ट मनाला भावली.तुझ्या चांगुलपणाचा फायदा घेतला असं वाटत होतं.आईशी बोलले नंतर सरांची माफी मागितली.तुझीही माफी मागायची होती पण भेट झालीच नाही.”
“कारण मी शाळा सोडली.त्या संध्याकाळीच वडिलांना अपघात झाला अन चार दिवसांनी ते गेले आणि सगळं बदललं.मामाशिवाय कोणाचाच आधार नव्हता त्यामुळं त्याच्या गावी गेलो.तिथंच पुढचं शिक्षण पूर्ण केलं”
“सॉरी!!हे काहीच माहिती नव्हतं.तुझं एकदम बेपत्ता होणं खूप धक्कादायक होतं.मूळापासून हादरले.माझ्यामुळे तू काही करून तर घेतलं नाही ना या विचारानं खूप भीती वाटत होती.तुला खूप शोधलं.मनात खूप भयंकर विचार येत होते.तुझ्यासाठी रोज प्रार्थना करत होते.”
“माझ्यासाठी एवढं काही चालू होतं अन मला काहीच माहिती नाही.प्रार्थना फळाला आली अन भेट झाली”
“तेच तर!! आज अचानक तुला पाहील्यावर खूप खूप आनंद झाला.कधी एकदा भेटते असं झालं होतं.मित्रा,माफ कर.त्यावेळी खूप चुकीचं वागले.”मीनाक्षीनं हात जोडले तेव्हा डोळ्यात पाणी होतं.
“ओके.आता सोडून दे.उगीच माफी वैगरे नको.लहान होतो.समजही कमी होती.”
“शाळेत असताना होता तसाच आताही आहेस.तुझ्याविषयी कंपनीत खूप चांगलं बोलतात.तुझा प्रामाणिकपणा, मदत करण्याच्या स्वभावामुळे खूप फेमस आहेस.”
“मदत करायला आवडतं.कामाचं म्हणशील तर ज्याच्यामुळे घर चालतं त्या कंपनीसाठी शंभर टक्के योगदान देणं यात काही विशेष नाही.”
“हेच तर खास आहे.सगळेच असा विचार करत नाही.तूझं मन मोठं अन स्वभाव खूप चांगला आहे.”
“बास आता!!इतकं कौतुक ऐकायची सवय नाही”
“पुन्हा एकदा सॉरी यार!!”मीनाक्षीनं हातावर हात ठेवला तेव्हा सर्वांग शहारलं.
“ए बाई!!सोड ना तो विषय,जाऊ दे”
“बाई नको हं.अजून म्हातारी झाली नाहीये.काय गिफ्ट पाहिजे ते बोल.”
“पुन्हा पुन्हा आपली ‘भेट’ झाली तर तेच जगातलं सर्वात भारी गिफ्ट असेल.”
“डन,इतक्या वर्षांनी भेटलास आता तुला सोडणार नाही.भेटत राहूच.तुझ्यासाठी काय करू सांग.ईनक्रीमेन्ट, प्रमोशन,जो चाहिये वो बोल”मीनाक्षी उत्साहानं म्हणाली.
“रागावू नको पण एक विनंती आहे”
“बिनधास्त बोल”
“आपली मैत्री आणि कंपनी दोन्ही वेगवेगळे राहू दे.मला कामाच्या जोरावर पुढं जायचंय.शिफारशीवर नाही.”
मीनाक्षी अपार कौतुकानं पाहत होती.त्यामुळे मी जास्तच संकोचलो.
“भूक लागलीयं”
“काय खाणार”
“वडा पाव?”माझ्या फर्माईशीवर मीनाक्षीचा चेहरा भूत पाहिल्यासारखा झाला.
“अगं,गंमत केली.इथल्या मेन्यू कार्डातलं काही कळणार नाही.तुझ्या आवडीचं मागव.”मीनाक्षीनं ऑर्डर केली.
“मीना,जास्त काही मागवू नकोस.मी काही पट्टीचा खाणारा नाही आणि बिल..”
“ते मीच देणार”मीनाक्षी पटकन म्हणाली.
“तेच म्हणतोय.तुलाच द्यावं लागेल.इथलं बिल परवडणार नाही कारण आमची कंपनी पगार फार कमी देते.”डोळे वटारत मीनाक्षी मनापासून हसली.
पंढरीच्या वारीला सातशे / आठशे वर्षांपासूनचा इतिहास आहे. कोरोनाचा काळ सोडला तर यात खंड पडलेला आपल्याला दिसत नाही. काय असेल पांडुरंगाकडे? का जातात इतकी लाखो माणसं पंढरीच्या वारीला? इतकी धाव, इतकी ओढ का दिसते माऊलीच्या भेटीसाठी? पंढरीचा पाडुरंग भेटल्यावर खरंच समाधानी होतात का हे भक्त? ही भक्ती खरंच, खरी असते का?
वाळवंटी गाऊ आम्ही वाळवंटी नाचू,
चंद्रभागेच्या पाण्याने अंग अंग न्हावू ||
विठ्ठलाचे नाव घेवू होऊनि निसं:ग
नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग ||
इतकं निस्संग, निर्मळ, स्वतःला हरवून विठ्ठलात लीन होऊन जगता येते? बुद्धाच्या मते जीवन हे दुःखमय आहे. न शमणारी तृष्णा हे दु:खाचे मूळ कारण आहे. दुःख निवारणासाठी त्यांनी अष्टांग मार्ग आणि पंचशील सांगितले. दुःख आणि वेदनेचा प्रत्यय आपल्याला क्षणोक्षणी येत असतोच. सामान्य माणसाने वारी हे दु:ख निवारणार्थ साधलेला एक मार्ग तर नसेल..! वारीला जाता न येणाऱ्यांना खूप खंत वाटते का? असे अनेक प्रश्न मला विद्यार्थी जीवनात पडायचे..
आई म्हणायची,
सखू निघाली पंढरपूरा
येशी पासूनी आली घरा !
घरदार सोडून, अनंत व्याप सोडून लोक वारीला चालत जातात. सर्व सुखंदुःखं बाजूला सारुन एकमेकांना “माऊली” म्हणत, एकमेकांना नमस्कार करत अनेक स्त्री-पुरुष भक्तीमय वातावरणात विलिन होतात. तन-मन-भान विसरुन पांडुरंगाच्या नामस्मरणात तल्लीन होतात. देहभान विसरुन मनाच्या आनंदाचा वारकऱ्यांनी साधलेला हा परमोच्च क्षण असावा.
“पुंडलिक वर दे हरी विठ्ठल,
श्री ज्ञानदेव तुकाराम
पंढरीनाथ महाराज की जय !”
असा जयघोष अखंड चालू असतो. पण या जयघोषात रुक्मीणी, जनाबाई, सोयराबाई, कुठेच नाहीत याची खंत मात्र माझ्या सारख्यांना वाटल्याशिवाय अजिबात राहत नाही. हा समतेचा भाग वेगळा असला तरी विचार करायला लावणारा आहे हे मात्र नक्की.
माझे आई वडील दोघेही विठोबाचे निस्सिम भक्त होते. आई दूसरा कोणताच देव मानत नव्हती. सर्व देवांचा देव म्हणजे विठोबा अशी तिची धारणा होती. वडीलांना संकष्टी सुद्धा करु द्यायची नाही. फक्त एकादशी करायची असा तिचा आग्रह. घरातले सगळेच एकादशी करायचे. आम्हा लहानांना ते ऐच्छिक होते. पण आम्ही वेगवेगळ्या पदार्थाच्या आशेने एकादशी करायचो. आठवड्यातून दोन वेळा भजनी मंडळासोबत घरी भजन असायचे.. एकनाथ षष्ठी, रामनवमी, गोकूळ अष्टमी, हनुमान जयंती, तुकाराम बीज हे सगळे दिवस अहोरात्र चोवीस तास भजन करुन साजरा केले जायचे. माझ्या आईने स्वाक्षरी करण्यापुरतीच अक्षरे गिरवलेली होती. ती कधी शाळेत गेली नव्हती. पण माझी आई म्हणजे लहानपणीची शाळा आणि मोठेपणीचे जीवन विद्यापीठ होते. सगळे अभंग तिला तोंडपाठ असायचे. तीचे बालपण कर्नाटकातले. वयाच्या अकरा-बाराव्या वर्षी लग्न होऊन महाराष्ट्रात जत येथे आली. केवळ कन्नड बोलता येणारी आई आमच्या मराठी शाळेतील शिक्षणामुळे आमच्याशी हळू हळू मराठी बोलायला शिकली. रेडीओवर लागणारे अभंग लक्षात ठेवून, आठवून, आठवून अभंग म्हणू लागली. भजनी मंडळात बऱ्याच वेळा ही एकटीच बाईमाणूस असायची. माझा विठोबा सगळं व्यवस्थीत करेल. हा तिचा विश्वास होता. वडील तलाठी नंतर सर्कल म्हणून प्रमोशन मिळाल्यावर नोकरी निमित्त बाहेर गावी असायचे आणि आई अभंगात रमून जायची. संतांचे अभंग हाच तिच्या ज्ञानाचा झरा होता. ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा यांचे त्यावेळी मंदिरात आणि घरी वाचन व्हायचे, ते ऐकायला ती जात असे. वडीलही तिच्या सोबत भजनात रमून जायचे. त्याच्या जगण्या वागण्यात बोलण्यात भक्तीचा सुगंध दरवळत राही. भजनी मंडळात अनेक जाती धर्माचे लोक होते. ते खऱ्या अर्थाने माणूस म्हणून जगत होते. पांडुरंगाच्या भक्तीने सर्व स्तरातील लोकांना एकत्र आणले होते एका पातळीवर आणले होते. हा खूप मोठा आनंदाचा भाग होता. वारीने सर्व जातीतील स्त्री-पुरुषांना सामावून घेतले आहे. त्यामुळे आमच्या लहानपणी आम्हाला मानवता हा एकच धर्म माहीत होता.
विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म । भेदाभेदभ्रम अमंगळ
तुका म्हणे एका देहाचे अवयव । सुख दुःख जीव भोग पावे
अशाच भावनेची कालची वारी होती. आजचीही वारी भक्ती या एकच भावनेने एकत्र चालते असे माझे मत आहे. अशा भक्तिमय वातावरणातले माझे बालपण.
आईचे सगळे लक्ष अभंगाकडेच असायचे. ती बऱ्याचदा मला विणा घेऊन भजनाला बसवायची.
तुकोबा म्हणतात तसे
“आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदची अंग आनंदाचे”
अगदी अशीच होऊन जगायची माझी आई…
तुकोबांच्या अभंगानी तिला नवे विचार मिळाले. तीने कधी वड पुजलेला अथवा कधी कर्मकांड केलेले आम्हाला आठवत नाही. एवढेच काय ती चालत वारीला कधीच गेली नाही. मुलाबाळांना मागे ठेवून जाणे तिला मान्य नव्हते. मुलाबाळांना गर्दीत घेऊन जायला नको म्हणून आम्हाला लहानपणी उन्हाळ्याच्या सुट्टीत पंढरपूरला घेऊन जायची. वडील सोबत असायचे. आम्ही दोन दिवस तिथे मुक्काम करुन मनसोक्त दर्शन घेऊन परतायचो.
जनाबाईला दळण दळायला विठोबाने मदत केली. तशी आपली दुःखं कमी करायला आणि ती सहन करायला पांडुरंग आपल्याला बळ देईल किंबहुना तोच संकटाना सामोरे जाण्याचं बळ देतो असे तिला वाटायचे.
सेवाधर्मी पुण्य आहे सांगे सखा श्रीहरी
देवांचाही देव करीतो भक्तांची चाकरी
हे तीचं आवडतं गाणं. मी अभ्यासात रमायचे ती अभंगात रमायची. विपश्यना, विज्ञान, मानसशास्त्र यापैकी काहीच तिला माहित नव्हते. पण तिला जगणं, माणसांना समजून घेणं, आणि मनाचा समतोल साधणं माहित होते. म्हणूनच विवेकाच्या पातळीवर जाऊन अयोग्य वागणाऱ्या स्वतःच्या पोटच्या मुलाला घरातून बेदखल करणं तिला शक्य झाले असेल. सगळी सुखंदुःखं तुळसीच्या हाराच्या रुपाने पांडूरंगाच्या गळ्यात घालून ती किती सहज जगत होती..! हे मी पाहिले आहे. आज तीच्या या श्रद्धारुपी निष्ठेचे मला राहून राहून आश्चर्य आणि कौतुक वाटते. स्वतःच्या कर्तव्यात तिने कधी कसूर केली नाही. पहिला संसाराची वारी मग विठोबाची वारी. गरजेनुसार शेतातली काम सुद्धा ती न डगमगता, न कंटाळता आनंदाने करायची. तीच्या तोंडी सतत अभंग. ती काम करत अभंग गुणगुणायची.
“कांदा, मुळा,भाजी अवघे विठाई माझी.”
असे म्हणत तिची कामं चालू असायची. मला आठवतंय जेव्हा परिस्थिती हाताबाहेर जायची तेव्हा एक गाणं ती नेहमी म्हणायची…
कर्तव्याला मुकता माणूस, माणूस ना उरतो
हलाहला ते प्राशून शंकर देवेश्वर ठरतो.
बहिणाबाईची कविता तिला माहित होती.
अरे संसार संसार जसा तवा चुल्ह्यावर
आईला कविता पाठ होती. रेडीओवर ऐकलेलं सगळं तिच्या लक्षात असायचं. माझ्यावर आध्यात्मिक संस्कार तिच्यामुळेच झाले.. तिच्या विठोबावरील भक्तीतला भाव आज मला कळतो. सगळं विठोबावर सोपवून ती किती आनंदी असायची ! आणि मी रोज नवे प्रश्न निर्माण करुन उत्तर शोधत राहते. विठोबा किंवा पांडुरंग म्हणजे आपण आपल्या जगण्या वागण्यात मनाशी केलेला एक उत्तम, निस्पृह, निर्मळ, विवेकी संवाद व निश्चय आहे. असे मला माझ्या आईच्या भक्तीतून जाणवले.
विज्ञानाने शरीरा बरोबर मनाच्या अगणित प्रश्नांची उत्तरे शोधण्यात आणि योग्य उपचार पद्धती विकसित करण्यात यश मिळविले आहे. विज्ञानाकडून उत्तर मिळाले असले तरी विज्ञान आणि अध्यात्म हे एकमेकांना पूरक आहेत. येथे कर्मकांडाला अजिबात थारा नाही. हे आवर्जून ध्यानात घ्यायला हवे. विज्ञान आणि आध्यात्म यांची सांगड घातली तर आपल्याही मदतीला विठोबा/ पांडुरंग नक्की येईल. म्हणूनच
मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण
एकवीसावे शतक हे मानसिक आजाराचे असेल असे काही तज्ञ लोक म्हणायचे. मला तेव्हा खरे वाटत नव्हते. असे होणे शक्य नाही असे मला वाटायचे. पण हे सत्य आहे. प्रत्येक चार माणसामागे एका माणसाला मानसिक आजाराची लक्षणे दिसून येत आहेत. यात स्त्रीयांची संख्या अधिक आहे. मी refer करत असलेल्या psychiatrist ची ओपीडी , hospitals तुडूंब भरलेली दिसतात. आपल्याकडे मानसरोगतज्ञ/ मानसविकार तज्ञ संख्येने तसे खूपच कमी आहेत.
माणसात देव अनुभवणारी, समुपदेशन आणि रुग्णसेवेत रमणारी, समतेचा आग्रह धरणारी मी. तुम्हा सर्वांना माऊलीच्या रुपात पाहते. माणसाच्या चांगुलपणावर माझा विश्वास आहे. आज माणसांचे जगणे सुसह्य करण्यासाठी त्यांच्या अडचणी समजून घेणे गरजेचे आहे. माणसाना बोलत करणं, प्रसंगी त्यांचा आवाज होणं, त्यांना व्यक्त होऊ देणं, त्यांच्या मनातील भाव-भावना केवळ शांतपणे ऐकून घेणं. त्यांच्या मनातील वादळांना वाट करून देण्याची नितांत गरज आहे. ज्याची त्याची लढाई, जो तो लढतोच असतो. केवळ आपण सोबत आहोत, सगळं व्यवस्थीत होईल, एवढंच सांगण्याची गरज आहे. महत्त्वाचे म्हणजे एखाद्याने मन मोकळं करण्यासाठी, मन हलकं करण्यासाठी आपल्यावर विश्वास ठेवून सांगितलेली गोष्ट त्यांच्या माघारी दूसऱ्या कुणाला सांगू नये. एवढे मोठे मन प्रत्येकाकडे असायला हवे. मनोविकारांना मात्र औषधोपचारीची गरज असते. हे विसरून चालणार नाही. शेवटी माणूसच माणसाच्या मदतीला येणार आहे. माणसा माणसातील प्रेमभाव मैत्र भाव टिकून राहणे त्यांचे संवर्धन होणे महत्त्वाचे.
माणसांच्या मनात भक्तीचा मळा फुलावा. जो जे वांच्छील तो ते लाभूदे ! आणि मानवी जगणे सुखाचे होऊदे. हीच मागणी माणसातल्या पांडुरंगाकडे.
माणूस जेव्हा एक पायरी वर चढतो तेव्हा तो देव होतो. माणूस जेव्हा एक पायरी खाली उतरतो तेव्हा तो राक्षस होतो.
मला मुलाखती फार आवडतात.प्रत्यक्ष समोर,यू ट्युबवर,दिवाळी अंकातल्या, साहित्य संमेलनाच्या,प्रासंगिक….स ग ळ्या…..मग कलाकार, साहित्यिक,लेखक,शास्त्रज्ञ, नाटककार, संगीतकार, शैक्षणिक क्षेत्रातले…अगदी वडापाव विकणाऱ्यापासून बिल्डर पर्यंत कुणीही व्यावसायिक..कुणीही असो….कारण प्रत्येकाचे आर्थिक, सामाजिक , सांस्कृतिक, कौटुंबिक, शैक्षणिक, मानसशास्त्रीय प्रश्न वेगळे…उत्तरं वेगळी….मार्गही वेगळे...
मला आठवतं पूर्वी नॅशनल टी व्ही वर कमलेश्वर मुलाखती घ्यायचे…मजूर बायका,मोलकरणी,रस्ते झाडणाऱ्या ,बोहारणी,भाजीवाल्या....अशा कुणाच्यातरी…अत्यंत सह्रदयतेनी सहज बोलून एक आगळंच विश्व उलगडायचे …त्यांना बोलकं करंत अगदी अनोळखी जग दाखवायचे….हे सारं आपल्या देशातलं…
पण वेगळीच संस्कृती,मग वेगळाच लढा,वेगळेच प्रश्न … सगळ्यांना तोंड देत निराशेच्या गर्तेतून अत्युच्च शिखरी जाणारी परदेशी माणसं पाहिली मुलाखतीत….मग आपली अडचण अगदीच क्षुल्लक वाटायला लागली..निराशेवर मात करायचं बळ मिळालं… आपल्याकडच्या सारखेच ते लढतांना पाहिले…दोन्हींनी मन थक्क झालं..त्यांचा लढा, चिकाटी,यश पाहून.
तर एका मुलाखतीत भेटली आफ्रिकन अमेरिकन महिला…ओपरा विनफ्रे नाव तिचं…पहा हं ..जगातला सर्वोत्तम टॉक शो तिच्या नावावर..दोन दशकं Top rating मुलाखतींचा कार्यक्रम घेणारी….२०११ मधे “विशेष ऑस्कर पुरस्कार”मिळवणारी...जगातल्या १०० विशेष व्यक्तींपैकी एक.... २०१३ मधे ओबामांकडून “सर्वश्रेष्ठ नागरी सन्मान” मिळवणारी….आणि हे ठळक … अजून बरंच बरंच काही….कुणी म्हणेल एका व्यक्तीच्या आयुष्यात एवढं?तर कुणी म्हणेल असे किती तरी आहेत….होय खरं आहे….पण या गौरवाच्या यशाच्या मालिकेबरोबरंच कमाल आहे संघर्ष लढ्याची आणि सकारात्मकतेची…..
कोण होती ही ओरपा? होय होय ओरपाच होतं तिचं नाव …पण लोक ओपरा असंच बोलवत…मग तिनं तेच नाव स्विकारलं….तिची आई लोकांकडे मोलकरणीचं काम करी..काबाडकष्ट….१५व्या वर्षीच तिला ही मुलगी झाली.Single Mother …म्हणजे अजून झगडा….ती सदैव कामात.या मुलीकडे लक्ष द्यायला तिला वेळंच नव्हता.दारीद्र्य पाठी लागलेलं..इतकं काम करूनही जेमतेम दोन घास पोटात…मग चिमुकली पोर दिसेल मिळेल ते ऊष्टमाष्टं खाई,…कचऱ्यातंच खेळ मांडी..वळण वगैरे कोण लावणार?…,नव्हतंच कुणी…कसंबसं ६व्या वर्षांपर्यंत आईनं सांभाळलं आणि हे गाठोडे आपल्या आईकडे पाठवून दिलं….तिथेही फारसा फरक नव्हता….पण वेळेवर दोन घास पोटात जात.आजी मायेनं काळजी घेई.न्हाउमाखू घाली.स्वच्छ ठेवी…रविवारी चर्चमध्ये नेई.बायबल कानावर पडे…गोष्टी सांगे.थोडंफार शाळेत जाणं होई.मग अक्षर ओळख झाली.पण पैसा दुर्मिळच….सभोवती बऱ्या घरातली मुलं असंत.आपला कमीपणा झाकण्यासाठी ती घरातच पैसे चोरायला लागली.आजीनं हे मान्य करणं शक्यच नव्हतं…..परत रवानगी आईकडे झाली.ती मोठी होत होती.मग गल्लीतल्या पासून नातेवाईक,भाऊ,मित्र साऱ्यांनी अत्याचार केले.त्यातून एक मूल झालं.पण अशक्त असल्यानं ते जगलं नाही.ते सुटलं आणि ती पण…..ती शाळेत जात होती खरी पण सोबतची श्रीमंत मुलं पाहून तिला न्यूनगंड वाटे…पुन्हा चोऱ्या…खोटे आभास….तेच दुष्टचक्र…..दुःख,दारीद्र्य,दैन्य,,वेदना ,यातना, अत्याचार हाच शब्दकोश जगण्याचा…त्या चोऱ्यांनी आई वैतागली आणि तिला सावत्र बापाकडे टेनेसीत दिलं पाठवून..
पण हा Turning point ठरला…जीवनाचा स्वरंच बदलला.तो फार चांगला “माणूस ” होता.तिथे शिस्त होती.नियम होते… सगळ्यात महत्वाचं म्हणजे जगणं सुरक्षित होतं..मोजकं पण समाधानी होतं.परिस्थितीनं गांजलेली ही मुलगी हुषार आहे.बुद्धीमान आहे.तिला संधी हवी.ज्ञान हवं.दिशा हवी.तिच्या आत्मविश्वासावरची धूळ झटकायला हवी हे सारं सारं त्यानं जाणवलं.ती खरंच हुषार बुद्धीमान होती.. वाह्यात,मवाली,चोरटी,टारगट ही तिची ओळख संपली,मिटली आणि ती एक” ब्रिलियंट स्टुडंट ” झाली.ओल्या मातीचा गुणांनी भरलेला घट झाला.तिच्या बोलण्यात वेगळंच कौशल्य जाणवे.. नाटकात ती फार छान अभिनय करी…. अशाच एका नाटकाच्या रिहर्सलला एका व्यक्तीला तिचे गुण जाणवले आणि आपल्या रेडिओ चॅनल वर त्यानं तिला न्यूज रीडरची पोस्ट दिली…हा उज्वल भविष्याचा देखणा दरवाजाच होता.पहिलं दार होतं ते राजरस्त्याकडे उघडणारे…
ती ऑफर तिनं स्विकारावी…पण अभ्यास सोडला नाही…नोकरी करत करत स्कॉलरशिपचा अभ्यास केला …ती मिळवली पण….. कॉलेज अक्षरशः गाजवलं….ती दोन ब्युटी कॉंटेस्ट जिंकली….Miss Tenesi आणि Miss Black National Beauty……आता तिला बाल्टीमोर टी व्ही वर न्यूज रीडरची नोकरी मिळाली…मग ती मेरीलॅंडला गेली.असं काम करणारी ती “पहिली आफ्रिकन अमेरिकन महिला ” ठरली.हे खूपच ग्रेट होतं.मोठा गौरव होता तिचा…..
ती फारच सेन्सिटिव्ह होती. बातमी कोरडेपणानी बा त मी न करता त्यातला इमोशनल आस्पेक्ट पहावा असं तिचं मत होतं.पण अत्यंत प्रॅक्टिकल मालकाला हा इमोशनल व्ह्यू नको होता…आणि या वादात जॉब गेला.परत निराशा…..पण यावेळी अनुभव, आत्मविश्वास,शिक्षण सोबत होतं . आणि एक रस्ता बंद झाला की नवे अनेक उघडतात असं म्हणतात तसंच झालं.. “People are talking ” अशा Talk show ची ती होस्ट झाली.ती लोकांना सहजपणे बोलकं करी…लोकही मोकळेपणाने बोलत.हा कार्यक्रम फारच लोकप्रीय झाला.( माझ्या मनात कमलेश्वर आणि आमीर खान चे कार्यक्रम उमटून गेले.)मग शिकागोचा Morning Show मग Oprah Show रांगच लागली.. दोन दशकं म्हणजे २० वर्ष हे शो Top rating show म्हणून गाजले आणि Oprah होस्ट म्हणून….ती सर्वात श्रीमंत ,पैसे मिळवणारी कलाकार होती.
ती श्रीमंत झाली पण तो जुना काळ ती कधीच विसरली नाही आणि Oprah Winfrey Leadership Academy चा जन्म झाला.तो तिच्या कर्तुत्वातला समाज कारणाचा कळस मानला पाहिजे.जे आपण सोसलं ते इतरांना सोसायला लागायला नको म्हणून तिनी अनेकांना मदत केली.दिशा दिली.मार्ग दाखवले … नाही तर ते निराशेने संपले असते किंवा गुन्हेगारीकडे वळले असते.
२०११ मधे तिला विशेष ऑस्कर पुरस्कार दिला गेला.Times,Forbes सारख्या जगद्विख्यात मासिकांच्या कव्हर पेजवर तिला मानाचं स्थान मिळालं.२०१३ मधे ओबामांनी तिला ” सर्वश्रेष्ठ नागरी सन्मान ” प्रदान केला.
कुठून कुठे आलं जीवन?एका दरिद्री गलिच्छ वस्तीत अपमानित असुरक्षित जगणारी Oprah किती उंचीवर पोहोचली.झगडत यशस्वी झाली.
तिची मतं ठाम होती.त्यानुसार तिनं कुणाची कॉपी केली नाही.स्वतःच्या विचारांनी ती Authentic झाली.तिनी फक्त यश हे ध्येय मानलं नाही..ती नवनवे मार्ग शोधत राहिली.ती फार ईमानदार, प्रामाणिक होती.समोरच्याची अडचण ओळखून तिनं योग्य सुंदर दिशा दिली.मदतीचा हात देत ग्रहदशाच बदलली म्हणा ना….अनेक घरं तिच्यामुळे सुखी झाली.तिनं आधाराचा हात सोडला नाही आणि अशा ६८,०००/ लोकांना तिनं हात दिला.
तिचा भूतकाळ भयंकर होता.पण तो मागे सोडून तिनं भविष्य घडवलं.भूतकाळ विसरा आणि जीवन नव्यानं Design करा असं म्हणते ती.. आणि तसं तिनं केलंही…
कुणी म्हणेल हे मिळणं तिच्या दैवात असणार…बरोबर आहे..दैवाची साथ हवीच…पण दैवात लढा पण असतो तो आपण पहायचा आणि शिकायचं….कारण प्रयत्नांचं मोल कधीच कमी होत नाही ..केवळ ३२ व्या वर्षी १२०चॅनल्सवर तिला १०लाख लोक पहात होते. संकटात आतल्या आत ती अनेकदा तुटली असेल….पण लढाई सोडली नाही.हार मानली नाही..परिस्थिती इतकी पालटली की तिनं तिच्या चॅनलचं नाव ठेवलं “HARPO” अगदी तिच्या “OPRAH ” नावाच्या उलटं. कमाल आहे ना!!
म्हणूनच वाटतं… असं काही पाहिलं ऐकलं की मनात येतं
“कितीही निराश असा….हे जगणं पहात रहा
मात करा अडचणींवर,
मग आशेचे किरण बोलावतीलंच पहा
जगणं त्यांचं देईलच दिशा,,,
कमीत कमी लढायचा तरी
घेऊया वसा!!”
आणि हो …एवढ्या यशानंतर तिच्या त्या वाक्याने तर मी हाललेच आत…ती म्हणते….
विरंगुळा म्हणून आजी आपल्या लेकाकडे राहायला आली. आज रविवार, सगळे घरी एकत्र भेटतील या विचाराने सुखावली. सकाळी उठल्यावर पाहते तर तीन खोल्यात तीन माणसं बघून भांबावली. लेकाची आणि सुनेची खोली वगळून तिने नातीच्या रूमकडे पावलं टाकली. मोबाईलवर स्क्रोलिंग करत लोळत पडलेली नात आजीला पाहून ‘ये बस’ म्हणाली. नाश्त्याला काय करायचं हे विचारायला आले होते, असं म्हणत आजी मऊ गादीवर बसताच बेडमध्ये रुतून गेली. नातीने तिघांच्या फॅमिली व्हॉट्स अप ग्रुपवर आजीचा मेसेज फॉरवर्ड केला. स्वीगीने मागवून घेऊया असा आईचा रिप्लाय आला. घरातल्या घरात मेसेजवर बोलणारे लोक पाहून आजी आश्चर्यचकित झाली. इथे हाकारे ऐकू आले नाहीत, तरी मेसेज पुढच्या क्षणाला रीड होतो, असं नात म्हणाली. गृह कलह टाळण्याचा नवीन फंडा बघून आजी इम्प्रेस झाली. नातीकडून मोबाईल शिकून घेत फॅमिली ग्रुपमध्ये टेम्पररी ऍड झाली. आजी तिच्या सेपरेट रूममध्ये मोबाईलसह दहा दिवस सुखाने राहिली. मुलाला-सुनेला आशीर्वादाचा इमोजी आणि नातीला gpay करून परत निघताना ग्रुपमधून लेफ्ट झाली.
(‘शांतीप्रिय माणसं’ ग्रंथातून साभार)
लेखिका – सुश्री ज्योत्स्ना गाडगीळ
प्रस्तुती : सुश्री प्रभा हर्षे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
(संस्कारधानी जबलपुर के हमारी वरिष्ठतम पीढ़ी के साहित्यकार गुरुवर आचार्य भगवत दुबे जी को सादर चरण स्पर्श । वे आज भी हमारी उंगलियां थामकर अपने अनुभव की विरासत हमसे समय-समय पर साझा करते रहते हैं। इस पीढ़ी ने अपना सारा जीवन साहित्य सेवा में अर्पित कर दिया है।सीमित शब्दों में आपकी उपलब्धियों का उल्लेख अकल्पनीय है। आचार्य भगवत दुबे जी के व्यक्तित्व एवं कृतित्व की विस्तृत जानकारी के लिए कृपया इस लिंक पर क्लिक करें 👉 ☆ हिन्दी साहित्य – आलेख – ☆ आचार्य भगवत दुबे – व्यक्तित्व और कृतित्व ☆.आप निश्चित ही हमारे आदर्श हैं और प्रेरणा स्त्रोत हैं। हमारे विशेष अनुरोध पर आपने अपना साहित्य हमारे प्रबुद्ध पाठकों से साझा करना सहर्ष स्वीकार किया है। अब आप आचार्य जी की रचनाएँ प्रत्येक मंगलवार को आत्मसात कर सकेंगे। आज प्रस्तुत हैं आपकी एक भावप्रवण रचना – चातक व्रत का वरण किया है…।)
साप्ताहिक स्तम्भ – ☆ कादम्बरी # 62 – चातक व्रत का वरण किया है… ☆ आचार्य भगवत दुबे
संस्कारधानी के सुप्रसिद्ध एवं सजग अग्रज साहित्यकार श्री मनोज कुमार शुक्ल “मनोज” जी के साप्ताहिक स्तम्भ “मनोज साहित्य” में आज प्रस्तुत है आपकी भावप्रवण कविता “मनोज के दोहे”। आप प्रत्येक मंगलवार को आपकी भावप्रवण रचनाएँ आत्मसात कर सकेंगे।