☆ ‘स्वरलता’ – बाँध प्रीती फूल डोर…. भूल जाना ना ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆
प्रिय वाचकांनो,
नमस्कार!
लता मंगेशकर, अशी व्यक्ती जिच्या नावाचा महिमाच पुरेसा होता, तिच्या सुरांच्या जादूने भारलेल्या आवाजाच्या दिवाण्यांसाठी! ६ फेब्रुवारी २०२४ ला तिला जाऊन २ वर्ष होतील. त्या गंधर्वगायनी कळांना या तारखेशी कांहीही देणे घेणे नाही. त्यांची मनमोहक सुरेल स्वरमधुरिमा आजही तशीच शाबूत आहे. जशी स्वर्गातील नंदनवनाच्या रंगीबेरंगी सुमनांची सुरभी कालातीत आहे, तसेच लताच्या स्वरांचे लाघवी लावण्य वर्षानुवर्षे सुगंधाचा शिडकावा करीत आले आहे आणि आमच्या दिलांच्या गुलशनला याच प्रकारे वर्षानुवर्षे असेच प्रफुल्लित ठेवीत राहील. तिने गायलेल्या एका गाण्यात हीच भावना अत्यंत सुरेख रित्या प्रकटली आहे, ‘रहें ना रहें हम महका करेंगे, बन के कली, बन के सबा, बाग़े वफ़ा में’ (चित्रपट ‘ममता’, सुंदर शब्द- मजरूह सुल्तानपुरी, लोभस संगीत-रोशन).
आमच्या कित्येक पिढ्या सिनेसंगीताच्या इतिहासाच्या साक्षीदार आहेत, त्यांनी बघितलंय सिनेसंगीत कसे बदलत गेले ते! मात्र त्यात एक ‘चीज’ कधीच बदलली नाही, ती म्हणजे गायनाचा अमृतमहोत्सव पार करणाऱ्या लताच्या आवाजाचा गुंजारव! याच स्वरांनी आमचे कोडकौतुक करीत अंगाई गीत ऐकवले, यौवनाच्या मंदिरी प्रणयभावना प्रकट करण्यासाठी स्वर दिलेत, बहिणीच्या मायेने ओथंबलेल्या राखीचे बंधन बहाल केले. इतकेच नव्हे तर, मनोरंजन क्षेत्रातील ज्या ज्या प्रसंगातील ज्या ज्या स्त्रीचे रूप, स्वभाव अन मनाची कल्पना आपण करू शकतो, ते ते सर्व कांही या स्वरात समाहित होते. श्रृंगार रस, वात्सल्य रस, शांत रस, इत्यादी भावनांना जेव्हां लताच्या स्वरांची साथ लाभायची तेव्हां तेव्हां त्या बावनकशी सोन्यात जडलेल्या रत्नांसारख्या उजळून निघायच्या!
मैत्रांनो, आपल्याप्रमाणेच माझ्या जीवनांत देखील लताच्या स्वरांचे स्थान असे आहे की, जणू सात जन्मांचे कधीही न तुटणारे नाते! लताच्या जीवनचरित्राविषयी इतके भरभरून लिहिल्या आणि वाचल्या गेले आहे की, आता वाचक म्हणतील, “कांही नवीन आहे कां?” मी लताच्या करोडो चाहत्यांपैकी एक आहे. पौर्णिमेच्या चंद्राला बघून जशी सागराला भरती येते, तद्वतच लताच्या आठवणीने माझ्या मनात उचंबळून आलेल्या भावना इथे सामायिक करते (शेअर करते). मागील कांही दिवसांत लताच्या दोन गाण्यांनी मला भावविवश होऊन वारंवार ती ऐकण्यास भाग पाडले आणि मनाच्या अथांग गाभाऱ्यापर्यंत ठाव घेतला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या दोनही चित्रपटांची गीते निव्वळ शुद्ध हिंदी शब्दांची पराकाष्ठा करण्याचा आग्रह धरणारे गीतकार पंडित नरेन्द्र शर्मा यांनी लिहिली आणि त्यांना अभिजात संगीतसाज चढवला महान संगीतकार ‘स्वरतीर्थ’ सुधीर फडके यांनी!
१९५२- कोलकत्ता येथील अनोखा मिश्र संगीत महोत्सव -जेव्हा लताला उस्तादजींच्या आधी गाणे गावे लागले!
या चार रात्री चालणाऱ्या मिश्र संगीत महोत्सवात मिश्र अर्थात ध्रुपद-धमार, टप्पा-ठुमरीबरोबरच सिनेसंगीत देखील समाविष्ट करण्यात आले होते. एका रात्री लता आणि शास्त्रीय संगीताचे महान गायक उस्ताद बड़े गुलाम अली खान साहेबांचे गायन होते. पण आयोजकांनी लताला उस्ताद साहेबांच्या अगोदर गाण्याचा क्रम दिला. हे संगीत समारोहाच्या नियमांच्या चौकटीतून पाहिल्यास उस्तादजींचा अनादर करणे होते. लताला हे चांगलेच माहीत होते, म्हणून तिने आयोजकांना असे करण्याची मनाई केली, पण जेव्हां त्यांनी हे ऐकले नाही, तेव्हां तिने सरळ उस्ताद साहेबांकडेच तक्रार केली आणि म्हणाली की मी हे करू शकणार नाही. हे ऐकताच खांसाहेब जोराने हसले आणि तिला म्हणाले, ‘जर तू मला मोठा मानत असशील तर, माझे म्हणणे ऐक आणि तूच आधी गा,’ अन मग काय, कोलकत्तातील ती संध्याकाळ अविस्मरणीय ठरली.
लताने त्यांचे म्हणणे ऐकले तर खरे, पण तिने आपल्या हिट सिनेमांतील गाण्यांना वगळून निवड केली एका मधुरतम गीताची, जे बांधले होते जयजयवंती रागात. १९५१ साली आलेल्या ‘मालती माधव’ नांवाच्या सिनेमातील हे गाणे होते, ‘बाँध प्रीती फूल डोर, मन ले के चित-चोर, दूर जाना ना, दूर जाना ना…. ‘. पंडित नरेंद्र शर्मा यांच्या भावपूर्ण शब्दांना मधाळ संगीताचा साज चढवला होता सुधीर फड़के यांनी! या गाण्याचा असा कांही प्रभाव पडला की, तिने प्रेक्षकांना या संध्याकालीन संगीतलहरींच्या जादूने बांधून ठेवले. प्रेक्षकच नव्हे तर उस्तादजी सुद्धा लताच्या गायकीने प्रभावित झाले.
नंतर जेव्हां खां साहेब मंचावर आले तेव्हां त्यांनी लताला सन्मानाने मंचावर स्थान दिले आणि तिची खूप तारीफ केली. त्या वेळेपर्यंत जे गाणे प्रसिद्ध झाले नव्हते, ते त्या दिवशी हिट झाले! मित्रांनो, हा लेख लिहिस्तोवर मी या गाण्याविषयी फारसे ऐकले नव्हते. मात्र जेव्हांपासून ते लक्षपूर्वक ऐकले आहे, तेव्हापासून त्याच्या जादूने भारल्यासारखे झाले आहे. लताचे हे गाणे यू ट्यूब वर उपलब्ध आहे. (शिवाय सुधीरजींच्या आवाजात देखील!) आपण देखील लताच्या या अनमोल गाण्याचा आनंद घ्या आणि माझ्यासोबतच आपणही एका विचाराने त्रस्त व्हाल की, ‘मालती माधव’ या सिनेमाची एकमात्र स्मृती असलेले हे गाणे चालले कां नाही?
‘लौ लगाती गीत गाती, दीप हूँ मैं प्रीत बाती’
दुसरे गाणे आहे, भक्ती आणि प्रेमभावाने रसरसलेले असे गाणे ज्याचे एक एक शब्द जणू अस्सल दैदिप्यमान मोतीच, अन त्यांची चमक वृद्धिंगत करणारे कर्णमधुर संगीत सुधीरजी (बाबूजी) यांचे! जर अशी जोडी सोबत असेल तर, लताच्या सुरबहारचा एक एक तार वाजणारच ना. ‘भाभी की चूड़ियाँ’ (१९६१) सिनेमाचे गाणे होते, ‘लौ लगाती गीत गाती, दीप हूँ मैं प्रीत बाती’ (राग–यमन). रुपेरी पडद्यावर एका सुवासिनीच्या रूपात चेहेऱ्यावर परम पवित्र भाव असलेली मीना कुमारी. मी कुठेतरी वाचले होते की, या गाण्यावर सुधीरजी आणि लताने खूप मेहनत घेतली आणि गाण्याच्या वारंवार रिहर्सल झाल्या. सुधीरजींना या गाण्यापासून खूप अपेक्षा होत्या. हे गाणे श्रोत्यांना खूप पसंत पडेल अशी त्यांना आशा होती. पण झाले याच्या अगदी विपरीतच, याच सिनेमाचे दुसरे गाणे, ज्याच्या प्रसिद्ध होण्याची साधारणच अपेक्षा होती, ते सर्वकालीन प्रसिद्ध गाणे म्हणून गाजले. ते होते, ‘ज्योति कलश छलके’! भूपाली रागावर आधारित या गाण्याला शास्त्रीय संगीतावर बेतलेल्या चित्रपट गीतात अति उच्च स्थान प्राप्त झाले. कदाचित त्याच्या छायेत ‘लौ लगाती’ ला रसिकांच्या ह्रदयात ते स्थान मिळू शकले नाही. मैत्रांनो, आपणास ही विनंती की, आपण हे सुमधुर गाणे अवश्य बघा-ऐका आणि त्यातील शांति-प्रेम-भक्तिरसाचा अक्षत आनंद घ्या!
लताच्या असंख्य आठवणी आठवत असतांना नेमकं काय वाटतंय, त्यासाठी तिच्याच अमर (१९५४) या चित्रपटातील एक गाणे आठवले. (गीत-शकील बदायुनी, संगीत नौशाद अली)
“चाँदनी खिल न सकी, चाँद ने मुँह मोड़ लिया
जिसका अरमान था वो बात ना होने पाई
जाने वाले से मुलाक़ात ना होने पाई
दिल की दिल में ही रही बात ना होने पाई…”
प्रिय वाचकांनो, लताच्या गीतमंजूषेतील या दोन अमूल्य रत्नांच्या दिव्य प्रकाशात उजळलेल्या स्वरमंदिरात विराजित गानसरस्वतीच्या चरणी ही शब्दसुमने अर्पित करते!
धन्यवाद🙏🌹
टीप :
*लेखात दिलेली माहिती वरील लेखन साहित्य आणि लेखिकेचे आत्मानुभव तसेच इंटरनेटवर उपलब्ध माहिती यांच्यावर आधारित आहे.
**गाण्यांची माहिती सोबत जोडत आहे. यूट्यूबवर तुम्हाला गाण्यांच्या शब्दांवरून लिंक्स मिळतील.
‘बांध प्रीती फूल डोर’- चित्रपट -‘मालती माधव’ (१९५१) – गायिका-लता मंगेशकर, गीतकार-पंडित नरेन्द्र शर्मा, संगीतकार-सुधीर फडके
‘लौ लगाती गीत गाती, दीप हूँ मै प्रीत बाती’- चित्रपट -भाभी की चूड़ियाँ (१९६१) – गायिका-लता मंगेशकर, गीतकार-पंडित नरेन्द्र शर्मा, संगीतकार-सुधीर फडके
(अशी मी पुस्तकांशी मैत्री असलेली , अगदी टिपीकल भाषेत ‘पुस्तकी किडा’. कोणी काहीही म्हणू दे, मी तर सुखी आहे ना.) — इथून पुढे —
माझ्याही आयुष्यात तो दिवस आला, ज्या घरात मी जन्मले, लहानाची मोठी झाले, त्याच घराची मी पाहुणी होणार होते, माझं घर आता माहेरात परिवर्तित होणार होतं. मी खूप हळवी झाले होते.
“जगाची रितच आहे ही पोरी. एक ना एक दिवस प्रत्येक मुलीला आई बाबांचं घर सोडावं लागतं कारण हे रोपटं सासरी रूजणार असतं, फुलणार असतं. ही जगरहाटी टाळून कसं चालेल.”
“पण आई, संपूर्ण वेगळं कुटुंब, वेगळी माणसं, वेगवेगळ्या स्वभावाची माणसं, वेगळं वातावरण, कशी सामावली जाणार मी त्यांच्यात, कशी रूजणार नात्यांच्या विविध बंधनात?”
“होय बेटा, बंधनं तर भरपूर असतात. सासू सासर्यांचा सन्मान, नणंदेचा तोरा, जावा जावातील हेवेदावे. पण बाळा चिडायचं नाही. शांत राहायचं. वेळप्रसंगी कुटुंबाच्या सुखापुढे आपल्या इच्छांना मुरडही घालावी लागते, आणि यातच गृहिणीधर्म असतो.”
“पण आई, यासाठी काय मी माझी सगळी ओळखंच मिटवायची काय ?आणि माझ्या ज्ञानाचं काय ? तूच म्हणत होतीस ना ज्ञानाने माणूस मोठा होतो. आता हे ज्ञान काय असंच वाया जाऊ द्यायचं, तुझ्यासारखं स्वयंपाक घरातच राहायचं.”
“नाही गं बाई, तुझं म्हणणं तू तुझ्या कुटुंबाला समजावून सांगू शकतेस. तुझा होणारा जीवनसाथी ही सुशिक्षित आहे. त्याला पटेल तुझं म्हणणं कि भरारी घेणारी पक्षीण घरटं मात्र विसरत नाही. तुझ्या कला गुणांचा, तुझ्या शिक्षणाचा आदरच होईल तेथे ही. फक्त ते व्यवस्थित सांगता मात्र आलं पाहिजे. काही समस्या असल्यास त्यातून मार्ग ही काढता आला पाहिजे. हे जमलं कि सुखाचा पासवर्ड गवसला असं समज.”
आज मी एक यशस्वी बँक अधिकारी आहे, दोन मुलांची आदर्श माता आहे, सासू सासर्यांची मी जणू मुलगीच आहे आणि अरविंदची जीवलग सहचारिणी आहे. हे सगळं मी जमवू शकले सुखाच्या पासवर्डने. तो कोठे, कसा वापरायचा हे आईने दिलेल्या सखोल ज्ञानाने उमजलं आहे.
“ए सुनीता तू एवढी सुखी कशी गं? आम्हांलाही दे ना काही टिप्स. पण तू सुखी आहेस कारण तू स्वावलंबी आहेस. मी पण तुझ्यासारखं शिक्षण घेतलं असतं तर कोठे ना कोठे नोकरी मिळाली असती. पण नशिबातचं नव्हतं गं माझ्या.”
“रमा, पहिल्यांदा तू ही रडकथा थांबव. शिक्षण नाही म्हणून तू काही करू शकणार नाहीस असंच नाही काही. मुलांचे शिकवणी वर्ग चालव. तुझ्या पुढच्या हाॅलमध्येच तुला ते घेता येतील. तू चांगली सुगरण आहेस, काॅलेजच्या मुलांचे डबे करू शकतेस. स्वावलंबी व्हायला अनेक मार्ग आहेत गं. पण ते शोधायला हवे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सुख हे मानण्यात असतं. अति महत्वाकांक्षा, अति लोभ, अति अपेक्षा केव्हाही घातकच, कारण त्यांना कुठे अंतच नसतो. म्हणूनच कुठे थांबायचं हे ठरवता आलं पाहिजे. मग सुखाचा धागा आपसूकच हाती येतो.”
माझ्या फोनची रिंग वाजली. कामगार कल्याण मंडळातून फोन होता. मॅडम, परवा दहावी बारावीतील उत्तीर्ण कामगार पाल्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित केला आहे. आपण प्रमुख पाहुणे म्हणून तर यावेच पण मुलांना काही प्रेरक मार्गदर्शनही करावे अशी आमची इच्छा आहे. आपण येणार ना मॅडम?”
“होय सर, येईन मी.”
“ठीक आहे मॅडम, धन्यवाद. मी Whatsapp वर निमंत्रण पाठवले आहेच. सायंकाळपर्यंत Hard copy ही मिळून जाईल.”
दहावीनंतर काय ? बारावी नंतर काय ? विविध शैक्षणिक मार्गदर्शनानंतर जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर काय करावे याकडे मी वळले.
“मुलांनो, जीवनवाट वाटते तितकी सोपी नाही. आयुष्यात अनेक समर प्रसंग येतात. सगळं संपलं असं वाटायला लागतं. चोहीकडे अंधारच वाटतो. पण प्रकाशकिरण आम्हांलाच शोधायचा असतो. त्यातूनच वाट शोधत मार्गक्रमणा करावी लागते. बाळांनो मी आज काही सुखाचे पासवर्ड देणार आहे.
आता तुम्ही म्हणाल सुखाचा पासवर्ड म्हणजे काय ? तर जीवनाकडे नेहमी सकारात्मक दृष्टी कोनातून पाहाणे. ही सकारात्मकताच तुम्हांला नवऊर्जा देईल, प्रेरणा देईल. कशी ती पाहुयात.
1) कोणी वाईट बोलत असेल, तर तो आशीर्वाद समजा.
2) स्तुती करत असेल, तर ती प्रेरणा समजा.
3) खोटे आरोप करत असेल, तर ती तुमच्या सत्याची परिक्षा समजा.
4) तुम्हाला कोणी मनापासून साहेब म्हटले, तर तुमच्यात इतरांचे भले करण्याची ताकद आहे असे समजा.
5) विनाकारण कोणी तुमच्या मार्गात आडवे येत असेल, तर ती तुमच्या मार्गाची साफसफाई समजा.
6) उगाचच तुमच्याशी असलेले नाते कोणी तोडत असेल, तर तो तुमच्यातल्या नम्रतेचा विजय समजा.
7) तुमच्या जीवनाची कसोटी लागते तेव्हा तुम्ही योग्य मार्गावर आहात असे समजा.
बाळांनो हा सुखाचा कानमंत्रच माणसाला यशस्वी करतो. मी फार काय सांगणार ? तुम्ही ही सुजाण होणारच आहात, देशाचे होणारे आधारस्तंभ आहात, देशाची भावी पिढी आहात.
यशस्वी व्हा हा आशिर्वाद देते. All the best.”
“मॅडम खूपच छान, मार्गदर्शन तर मुलांसाठी होतं, पण आम्हांलाही त्यातून खूप काही शिकायला मिळालं. मानलं बुवा तुम्हाला.” कामगार कल्याण अधिकारी प्रशांत कदम चहा बिस्कीटांचा आस्वाद घेता घेता बोलत होते.
“मी फार काय सांगितलं असं नाही प्रशांतजी, प्रत्येकात हे गुण असतातच.”
“असतात ना मॅडम, पण त्यांचा परिचय, त्यांची ओळख ही हवीच ना, शिवाय त्यावर अंमलही करता यायला हवा. सगळ्यांना तो जमेलच असं नाही.”
☆ अयोध्या डायरी भाग-१– लेखक : श्री विश्वास चितळे ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆
अयोध्या वरून परत येत आहे . सर्व चितळे परिवार कडून श्रीराम प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाला जाता आले, रीप्रेझेन्ट करता आले. संपूर्ण कार्यक्रमात खूप ऊर्जा जाणवली. आपल्या सर्वांकडून श्रीरामाला वंदन करून आता परत येत आहे.
पुष्करने ही यात्रा छान घडवून आणली.
कार्यक्रम संघ परिवाराने खूप आखीव घडविला.
मी सकाळी ९:३० वाजता गेलो व आसनस्थ झालो . शेजारी तंजावर चे राजे भोसले बसले होते . मी मराठीत सायली बरोबर बोलत होतो . ते पाहून राजांनी मराठी मध्ये माझ्याशी सवांद साधला व विचारले आपण कोठून आलात . तंजावर मध्ये अजून हि २०० मराठी कुटुंब राहत आहेत . त्यांनी व राजेंनी अजूनही मराठीची नाळ सोडली नाही व त्यांनी मला तंजावर चे निमंत्रण दिले .
आणखी थोड्या वेळात हेमामालिनी यांचे आगमन झाले . संयोजक त्यांना प्रथम रांगेंत बसण्यासाठी सांगत होते पण त्यांनी, मी आपल्या जावया बरोबर आले आहे असे म्हणत, माझ्या शेजारी असलेल्या खुर्ची वर बसणं पसंत केले .मी त्यांना माझी जागा देवूं केली ती त्यांनी न स्वीकारतां
सांगितले की मी इथेच बसेन .
आम्ही सर्व स्थिरस्थावर होत असताना सोनू निगम ,शंकर महादेवन यांच्या जय श्री रामाच्या गीतांनी वातावरण भक्तीमय झाले .सर्व आसमंत जय श्रीरामांच्या उद्घोषांनी प्रफुल्लीत झाला.
संघाचे स्वयंसेवक सर्वांची अंत्यत अदबीने विचारपूस करत होते.
समोरील कलात्मक रामलल्लाचे निवासस्थान इतक्या सुंदर पानाफुलांनी सुशोभीत केले होती कि ती भव्य वास्तू , जणू स्वर्गातुन अवतरली आहे असा भास होत होता.
संपूर्ण अयोध्या नगरी आणि भारत ह्या मूहूर्ताची वाट पाहत होते, तो क्षण आला .मा.प्रधानमंत्री मोदीजी पूजा साहित्य घेऊन मंदिराच्या पायऱ्या चढून गर्भ गृहःमध्ये गेले .
गणेश स्तुती सुरु झाली . संकल्प गुरुजी सांगू लागले .सनई चवघड्यांचा मंगल स्वर मंदिरातून येवू लागला .
मंत्र घोषात पूजा सुरु झाली. आम्हा सर्वांना स्वयंसवेकांनी घंटा दिल्या .घंटा वाजू लागल्या .जय श्री रामांचा उद्घोष टिपेला पोचला .
आर्मीच्या दोन हेलिकॉप्टरांनी बरोबर प्राणप्रतिष्ठे च्या क्षणी गुलाब पाकळ्यांचा वर्षाव सुरु केला
आणी समोर असलेल्या स्क्रीन वर श्री राम लल्लांचे दर्शन झाले .
☆ सुमित्रेचे न परतलेले दोन राम ! – भाग – 1 ☆ श्री संभाजी बबन गायके☆
आई-वडिलांची तहान भागवण्यासाठी पाणवठ्याकाठी गेलेला श्रावणबाळ परतलाच नाही. मृगयेसाठी पाणवठ्याजवळच्या वृक्षावर अंधारात दबा धरून बसलेल्या राजा दशरथांच्या मरणबाणाला माणूस आणि जनावर यांतील भेद समजण्याचं काही कारण नव्हतं. पाण्यात बुचकाळल्या गेलेल्या घागरीचा आवाज दशरथांना हरिणाचा आवाज भासला आणि त्यांच्या प्रत्यंचेवरून बाण निघाला….आणि थेट श्रावणाच्या काळजात घुसला तो मृत्यूचा वैशाखवणवा घेऊनच. लाडक्या पुत्राला डोळ्यांनी कधी बघूही न शकलेल्या त्या म्हाता-या काळजांनी महाराज दशरथांना पुत्रविरहाचा शाप अगदी हृदयापासून दिला. आणि मग कर्मधर्मसंयोगाने महाराज दशरथ आणि महाराणी कौसल्या यांच्या हृदयाकाशातील राम’चंद्र’ वनवासाच्या काळोखात लुप्त झाला…चौदा वर्षांसाठी….ही दीर्घ अमावस्याच म्हणावी!
महाराज दशरथ पुत्रविरहाच्या वेदनेच्या वाटेवर चालताना लवकरच थकले आणि त्यांची मृत्यूनेच सुटका केली….ईहलोकात रामनाम घेत प्राण सोडणा-यांमध्ये दशरथ सर्वप्रथम ठरले. परंतू महाराणी कौसल्या पुत्रमुख पुन्हा पाहण्यात सुदैवी ठरल्या….त्यांचे पुत्र श्रीराम परतले आणि त्यांच्या सोबतीला गेलेले राणी सुमित्रा आणि दशरथ महाराजांचे सुपुत्र लक्ष्मण सुद्धा!
पण कलियुगातील एका सुमित्रेचे राम परतलेच नाहीत….हिच्यापोटी एक नव्हे तर दोन दोन राम जन्मले होते!
रामयाणात कौसल्येचे श्री राम आणि सुमित्रेचे श्री लक्ष्मण अशी जोडी. पण या सुमित्रेच्या पोटी जणू राम-लक्ष्मण एकापाठोपाठ जन्मले. फरक इतकाच की एक राम आणि दुसरा शरद म्हणून ओळखला जात होता. त्यांना एका भविष्यवेत्त्याने सांगितले होते की तुम्हांला चार मुलगे होतील. अत्यंत भाविक असलेल्या या दांमप्त्याने त्यांच्या या होणार असलेल्या मुलग्यांची नांवे आधीच ठरवून ठेवली होती….राजा दशरथांचे चार पुत्र…..राम,लक्ष्मण,भरत आणि शत्रुघ्न! त्यांना पहिला मुलगा झाला…त्याचे नामकरण अर्थातच राम…दुसरा लक्ष्मण! पण तिसरी मुलगी झाली..पौर्णिमा! म्हणून मग लक्ष्मणाचे नाव बदलून शरद ठेवण्यात आले.
त्रेता युगात यज्ञांना संरक्षण देण्यासाठी वशिष्ठ ऋषींनी श्रीराम आणि श्रीलक्ष्मण या दोघाही कुमारांची मागणी केली होती. कलियुगात काळाने अनेक मातां-पित्यांकडे श्रीरामाच्या सुटकेसाठी पुत्रांची मागणी केली.
वर्ष १९९0. महिना ऑक्टोबरचा. दिवाळीच्या आसपासचे दिवस. म्हणजे आजपासून साधारण तेहतीस वर्षांपूर्वीचा काळ. राजस्थानातील बिकानेरमधून कोलकात्यात व्यापारामध्ये आपले नशीब आजमावयला आलेल्या हीरालाल आणि सुमित्रा कोठारी यांच्या पोटी जन्मलेले दोन मुलगे असेच रामकार्यासाठी मागितले गेले आणि त्यांनी ते दिलेही. वीस बावीस वर्षांचे हे सुकुमार. १२ डिसेंबरला बहिणीचे लग्न होणार होते. घरात लग्नाची धामधुम सुरू असताना या सुकुमारांनी आधी लगीन अयोध्येचे असा चंग बांधला. त्यांनी आई-वडिलांची परवानगी मिळवली. कारसेवा म्हणजे अयोध्येत जाऊन श्रीराम रायाची सेवा अशीच त्या जन्मदात्यांची कल्पना होती. कारण तोवर अयोध्येत असा रक्तरंजित संघर्ष पेटेल याची कुणालाही कल्पना नव्हती. शिवाय हे कारसेवक प्रभु श्री रामचंद्र आणि श्री लक्ष्मण यांच्यासारखे हाती धनुष्यबाण घेऊन निघालेले नव्हते. यांच्या हाती असणार होते फक्त भगवे ध्वज. हजारो वर्षांपूर्वी ज्या जागी प्रभु रामचंद्रांचा जन्म झाला होता, ते पवित्र स्थळ १५२८ मध्ये परकीय आक्रमक बाबरच्या एका सरदाराने, मीर बाकीने नष्ट करून त्यावर मस्जिद उभारली होती…त्याजागी पुन्हा मूळचे राममंदिर उभारण्यासाठी सेवा करायची होती…!
प्रवासादरम्यान दररोज एक पत्र लिहाल अशी अट हीरालाल आणि सुमित्रा यांनी आपल्या या पोरांना घातली. आणि ती त्यांना मान्य करण्यात काहीच अडचण नव्हती. पोरांनी पळतच जाऊन दुकानातून पोस्ट कार्ड्स आणली आणि त्यावर पत्ते लिहिले…..प्रति,मा.श्री.हिरालालजी कोठारी….बडा बाजार…कोलकाता! काम आटोपून दहा बारा दिवसांत तर परतायचे होते.
दिवाळी संपून चार दिवस झाले होते…दिनांक २२ ऑक्टोबर,१९९०….कोलकात्यातील साथीदारांचे नेतृत्व करीत थोरले रामकुमार आणि धाकटे शरदकुमार अयोध्येकडे प्रस्थान करते झाले. संध्याकाळी सातची रेल्वेगाडी होती….उत्तर प्रदेशातील त्यावेळी मुघल सराय असे नाव असणा-या स्टेशनपर्यंत जाणारी. पण ही गाडी रद्द करण्यात आली. पण हे कारसेवक त्याच रेल्वेस्टेशनवर बसून राहिले….आणि प्रशासनाने रात्री दहा वाजता गुपचूप ती रेल्वे रवाना केली. मुलं पळतच त्या गाडीत शिरली आणि पहाटे मुघल सरायमध्ये पोहचली. तिथून त्यांना खाजगी वाहनातून अयोध्येत नेले जाणार होते.
यांच्या मस्तकात कारसेवा होती आणि मस्तकावर बांधलेल्या पट्टीवर कपाळावर शब्द दिसत होती जय श्री राम! कारसेवकांचा हा जत्था त्या दिवशी रात्री उशिरा रायबरेलीजवळच्या लालगंजपर्यंत पोहोचला. पण इथून पुढे वाहनव्यवस्था उपलब्ध नव्हती. कारण प्रशासनाने प्रवासाची सरकारी साधने रोखून धरली होती. मग एका खाजगी टॅक्सीने हे दोघे आणि त्यांचे एक सहकारी राजेश अग्रवाल आझमगडच्या फुलपूर कसब्यात पोहोचले. येथून पुढे तर रस्ताच बंद केला गेला होता. मग ही जोडगोळी २५ ऑक्टोबरला इतर कारसेवकांसोबत चक्क शेतांतून लपतछपत पायीच अयोध्येकडे निघाली…बहुतांश प्रवास रात्रीच उरकायचा…वाटेत गावकरी देतील ते अन्न स्विकारायचे असा क्रम होता. तब्बल दोनशे किलोमीटर्सचा हा प्रवास करायला त्यांना पाच दिवस लागले…प्रभु रामचंद्रांच्या वानरसेनेलाही श्रीलंकेपर्यंत सेतू बांधायला पाचच दिवस लागले होते.
केसांच्या काळ्याभोर लाटांमध्ये अचानक चांदीच्या तारा दिसायला लागतात आणि हळुच लक्षात येते…..
देवाने काय मस्त सोय केली आहे नैसर्गिक हायलाईट्सची
कालपरवापर्यंत ताई म्हणणारे अचानक काकू मावशी वगैरे म्हणायला लागतात आणि हळूच लक्षात येते…..
किती छान .. आता आपण अल्लड न रहाता प्रगल्भ झालोय .
टी व्ही वर छान कार्यक्रम बघत निवांत भाजी निवडणे चालू असते. अचानक कशासाठी तरी उठावे लागते आणि बारीकशी कळ गुडघ्यात येते आणि हळूच लक्षात येते….
की हाय हील्स ऐवजी आज वाॅकिंग शूज घालावेत.
टीव्ही वर मॅचमध्ये भारत जिंकतो आणि मुलांबरोबर जल्लोष करताना बारीकसा दम लागतो आणि हळूच लक्षात येते…..
आज जिमला जायला विसरले.
बसमध्ये प्रवास करताना कुणी तरी पटकन उठून जागा देते आणि ‘ बसा मावशी ‘ म्हणते आणि हळुच लक्षात येते….
संस्कार शिकवणाऱ्या माझ्यासारख्या आयाही आहेत तर.
शाळेत घ्यायला गेले की अनेक छोटी कोकरे पाहून मन मस्त प्रफुल्लीत झालेले असते. आपली उंची क्राॅस करून गेलेले आपले कोकरू पुढ्यात उभे राहून म्हणते ‘ लक्ष कुठे आहे तुझे? ‘ आणि हळूच लक्षात येते….
कोकराला “हाय फाइव” द्यायची वेळ झाली आहे.
एखाद्या काॅलेजजवळ पाय आपोआप रेंगाळतात. त्या तरूणाईचा उत्साह आणि मस्ती बघून मन पण उल्हसित होते.. पण हळूच लक्षात येते….
की आपण केलेली धमाल आपली मुलंही करू शकतात.
देवाजवळ सांजवात लावताना, स्तोत्र म्हणताना आपोआप डोळे पाणावतात आणि हळूच लक्षात येते….
देव किती चांगला आहे व किती सुंदर त्याचे चमत्कार.
कैरीचे लोणचे घालताना सगळे बाजूला ठेवून कैरीच्या करकरीत फोडी मीठाबरोबर पटकन तोंडात जातात. एखाद्या दातातून निघालेली कळ ‘ आई गं….’ आणि हळूच लक्षात येते….
लोणच्यात मीठ जरा जास्त झालंय या खेपेस.
बाहेर पाऊस चालू असतो .. कुरकुरीत कांदा भजी गरम गरम सगळ्यांना खाऊ घालावी. स्वतः घेताना मात्र वाढलेले वजन हळूच लक्षात आणून देते.. नको इतकी, कारण….
पुढच्याच महिन्यात असलेल्या वर्गाच्या ३० वर्षाच्या रीयूनियनसाठी घेतलेल्या गाऊनमध्ये फिट व्हायचंय.
काॅफीचा मग मात्र सांगत असतो.. कितीही वय झाले तरी तुझी माझी सोबत मात्र कायमकरता आहे….
घे बिनधास्त….
आणि मी गाणे गुणगुणायला लागते ….
दिल तो बच्चा है जी .. ..
लेखक : अज्ञात
संग्रहिका : सुश्री सुनीला वैशंपायन
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
(संस्कारधानी जबलपुर के हमारी वरिष्ठतम पीढ़ी के साहित्यकार गुरुवर डॉ. राजकुमार “सुमित्र” जी को सादर चरण स्पर्श । वे आज भी हमारी उंगलियां थामकर अपने अनुभव की विरासत हमसे समय-समय पर साझा करते रहते हैं। इस पीढ़ी ने अपना सारा जीवन साहित्य सेवा में अर्पित कर दिया। वे निश्चित ही हमारे आदर्श हैं और प्रेरणास्रोत हैं। आज प्रस्तुत हैं आपका एक अप्रतिम गीत – बैठ गया जब तेरे पास…।)
साप्ताहिक स्तम्भ – लेखनी सुमित्र की # 175 – गीत – बैठ गया जब तेरे पास…
(प्रतिष्ठित कवि, रेखाचित्रकार, लेखक, सम्पादक श्रद्धेय श्री राघवेंद्र तिवारी जी हिन्दी, दूर शिक्षा, पत्रकारिता व जनसंचार, मानवाधिकार तथा बौद्धिक सम्पदा अधिकार एवं शोध जैसे विषयों में शिक्षित एवं दीक्षित। 1970 से सतत लेखन। आपके द्वारा सृजित ‘शिक्षा का नया विकल्प : दूर शिक्षा’ (1997), ‘भारत में जनसंचार और सम्प्रेषण के मूल सिद्धांत’ (2009), ‘स्थापित होता है शब्द हर बार’ (कविता संग्रह, 2011), ‘जहाँ दरक कर गिरा समय भी’ ( 2014) कृतियाँ प्रकाशित एवं चर्चित हो चुकी हैं। आपके द्वारा स्नातकोत्तर पाठ्यक्रम के लिए ‘कविता की अनुभूतिपरक जटिलता’ शीर्षक से एक श्रव्य कैसेट भी तैयार कराया जा चुका है। आज प्रस्तुत है आपका एक अभिनव गीत “पेड़ सभी बन गये बिजूके...”)
☆ साप्ताहिक स्तम्भ # 173 ☆।। अभिनव गीत ।। ☆
☆ “पेड़ सभी बन गये बिजूके...” ☆ श्री राघवेंद्र तिवारी ☆