(वरिष्ठ साहित्यकार श्री प्रदीप शर्मा जी द्वारा हमारे प्रबुद्ध पाठकों के लिए साप्ताहिक स्तम्भ “अभी अभी” के लिए आभार।आप प्रतिदिन इस स्तम्भ के अंतर्गत श्री प्रदीप शर्मा जी के चर्चित आलेख पढ़ सकेंगे। आज प्रस्तुत है आपका आलेख – “अबला और बलमा“।)
अभी अभी # 93 ⇒ अबला और बलमा… श्री प्रदीप शर्मा
हर औरत अबला नहीं होती, विशेष कर, वह तो कभी नहीं, जिसका बलमा उसके लिए मोटर कार लेकर आया हो। बला की खुशनसीब औरतें होती हैं वे महिलाएं, जिनके अपने बलम होते हैं। बालम कहें, बलम कहें, अथवा बालमा। कुछ रसिक, तो कुछ, जुल्मी भी होते हैं।
इश्क की ही तरह भाषा पर भी किसी का जोर नहीं चलता। बला और अबला में भले ही जमीन आसमान का अंतर हो, सनम और सजन में भला क्या भेद हो सकता है। सनम ही की तरह केवल सजन अथवा साजन नहीं होते, सजनी भी होती है। हमें नहीं पता था, बम्बई के बाबू ऐसे भी होते थे ;
चल री सजनी अब काहे सोचे
कजरा ना बह जाए रोते रोते
हमने तो ऐसे भी साजन देखे हैं जो बड़े प्यार से अपनी सजनी से कहते हैं ;
एक बात कहता हूं तुमसे
ना करना इन्कार !
क्या ?
आ तोहे सजनी, ले चलूं नदिया के पार ;
और सजनी को भी देखिए जरा ;
तेरे बिना साजन,
लागे ना जिया हमार। ।
स्त्री के प्यार और समर्पण की तुलना कभी पुरुष के प्यार अथवा निष्ठा से नहीं की जा सकती। कितनी भोली होती होगी वह नायिका जो अपने नायक के लिए ऐसे भाव रखती होगी ;
बलमा अनाड़ी मन भाए
काह करूं, समझ न आए
लेकिन इस स्वार्थी पुरुष अथवा तथाकथित मर्द की पसंद कोई अबला, अभागी, दुखियारी नारी नहीं होती। उसे तो बस उसकी रेशमी जुल्फें, गुलाबी गाल और शराबी आंखें ही पसंद आती हैं।
ताली हमेशा दो हाथों से बजती है। क्या आपने सुना नहीं !
भंवरा बड़ा नादान रे। फिर भी जाने ना, कलियन की पहचान रे।
और उधर पुरुष को देखिए ;
कलियों ने घूंघट खोले
हर फूल पे भंवरा डोले ;
यानी हिसाब बराबर, इधर मन डोले, तन डोले, और उधर, ये कौन बजाए बांसुरिया। ।
पुरुष के लिए प्यार हमेशा जिंदाबाद रहा है और रहेगा लेकिन अगर एक बार औरत ने अपनी दास्तान सुनाई, तो आप रो पड़ेंगे।
साहिर तो हमेशा मर्दों के पीछे हाथ धोकर ही पड़े रहते हैं ;
औरत ने जनम दिया मर्दों ने उसे बाजार दिया।
जब जी चाहा, मचला कुचला
जब जी चाहा दुत्कार दिया। ।
साहिर और निराला की वह तोड़ती पत्थर वाली औरत अब समय के साथ चलना सीख चुकी है। मां, बहन, बेटी और पत्नी के अलावा आज उसके कई रंग रूप हैं, कई उत्तरदायित्व हैं। आज वह परिस्थितियों से लोहा लेना सीख गई है।
त्याग और समर्पण के साथ संस्कार परम्परा और संस्कृति का निर्वाह आज भी वह वैसे ही कर रही है, जैसा सदियों से करती आ रही है। कभी पुरुष के हाथ में हाथ, तो कभी मां के रूप में आंचल का प्यार और सर पर हाथ, तो कभी प्रेमिका के रूप में, शायद यह शुभ संकेत देती हुई ;
(आज प्रस्तुत है गुरुवर प्रोफ. श्री चित्र भूषण श्रीवास्तव जी द्वारा रचित बाल साहित्य ‘बाल गीतिका ‘से एक बाल गीत – “भारत हमें है प्यारा…” । हमारे प्रबुद्ध पाठकगण प्रो चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’ जी काव्य रचनाओं को प्रत्येक शनिवार आत्मसात कर सकेंगे।)
☆ बाल गीतिका से – “भारत हमें है प्यारा…” ☆ प्रो चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’ ☆
☆ “सी.सी.टि.व्ही. आणि बुट…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆
तो भुंकण्याचा आवाज आला, आणि घरातली सोडून सगळ्या मोकाट कुत्र्यांना समजलं की आपल्याला एकत्र बोलवलं आहे.
गल्लीत घरांच्या, झाडांच्या आडोश्याला असलेली, कडक उन्हापासून गारवा मिळावा म्हणून गटारीच्या पाण्यात बसलेली, किंवा चारचाकी गाडीच्या सावलीत विसावलेली सगळी कुत्री अंग झटकत, शेपटी, मान, कान हलवून, पुढचे पाय शक्य तेवढे पुढे, आणि मागचे पाय शक्य तितके मागे घेत आळस झटकून तयार झाली.
अस काय झालं? की सगळ्यांना बोलवावं लागतंय याच विचारात ती सगळी आवाजाच्या दिशेने निघाली.
कोणत्याही वेळी सगळ्यांना सहज पळता यावं म्हणून मुद्दामच मोकळ्या पटांगणात झाडाखाली सगळे जमले होते. वेळ सुद्धा भर दुपारची निवडली होती. कारण उन्हामुळे शक्यतो कोणी माणसं बाहेर पडत नाहीत.
जवळपास सगळे आले आहेत याची खात्री झाल्यावर त्यातील वयस्कर कुत्र्याने बोलायला सुरुवात केली.
काल एका कुत्र्याने एका गावात बंगल्यातून बुट पळवल्याच सी.सी.टि.व्ही. मुळे सगळ्यांना समजलं. आणि त्याची बातमी झाली.
एक तरूण कुत्रा – वा मस्त……. त्यामुळे आपली वेगळी बातमी आली…… नाहीतर आजपर्यंतच्या सगळ्या बातम्यांमध्ये आपल्याला मोकाट, भटकी असं म्हणत फक्त भटकतांनाच दाखवलं आहे.
वयस्कर कुत्रा – प्रश्न तो नाहीच. आता आपण बंगल्यातले बुट पळवायला लागलो म्हणून आपलं जगणं अजून कठीण होणार आहे.
आता हि बातमी आणि ते सी.सी.टि.व्ही. मधे झालेलं शुटिंग मोबाईल मुळे गावागावात, गल्ली गल्लीत पसरेल. ज्याने बुट पळवला त्याला तर मारतीलच, पण नाहक इतर कुत्र्यांना सुध्दा मार पडेल.
अरे……. एखादा माणूस चोरी करतांना सापडला तर त्याला लोक बेदम मारतात. वर म्हणतात कुत्र्यासारखं मारलं म्हणून.
आता आपल्याला तसंच मारल्यावर काय म्हणतील ते……… आहे काही बोलायला जागा…….
अरे हि माणसं सुद्धा चोरी करतांना चेहरा दिसू नये म्हणून तोंड झाकून घेतात. आपलं काय?……. आपलं सगळं उघडंच असतं, आणि आपणही उघड्यावर असतो.
मी म्हणतो आपण बंगल्यात जायचंच कशाला? तिथे त्यांची पाळलेली कुत्री असतातच. अजून आपली भर कशाला?… बऱ्याच बंगल्यावर कुत्र्यापासून सावध रहा अशी पाटी असते. जास्त चांगलं समजावं म्हणून कुत्र्याच्या तोंडाच चित्र सुध्दा असतं. मग आपण समजायला पाहिजे नां…………
बरं बुट पळवायचा तर एखादं साधं घर बघितलं असतं. कुत्रा बुट पळवतोय म्हटल्यावर घरातल्या किंवा आजुबाजूच्या कोणी बघितलं असतं तर कदाचित दुसरा बुट अंगावर भिरकावला असता. आता बंगल्यातूनच बुट पळवला म्हटल्यावर आपल्याला दिसतील तिथून दिसतील तसे पकडण्याचा बुट निघाला तर…… मग काय करणार…
आधीच आपलं जगणं कुत्र्याचं त्यात ही जास्तीची धावपळ कशी करणार……. लोकं उरलं सुरलं आपल्याला खायला टाकतातच. किंवा त्यांनी टाकल्यावर आपण ते खायला जातो. मग बुटाचा हव्यास कशासाठी? एक बुट पळवल्यामुळे लोक आता आपल्याला जोड्याने मारतील.
एरवी आपल्या भागात कोणी अनोळखी आल्यावर आपण भूंकतो, त्यामुळे लोकं सावध होतात. आता आपल्या भूंकण्याने लोक सावध होतील, पण अगोदर काठी हातात घेऊन त्यांचे बुट जागेवर आहेत ना हे बघतील.
आधीच माणसांमध्येच माणसं पळवापळवीच्या बातम्या येत आहेत. त्यात आपण हे बुट पळवापळवीचे उद्योग करायचेच कशाला? आता कोणी इतरांनी बुट पळवला तरी आपलंच नांव येईल. त्यामुळे आता पुढील काही दिवस काळजी घ्या. असे म्हणत सगळे परत आपापल्या आडोशाला जायला निघाले.
(विश्वासला मात्र मंदारची अतिशय मनापासून ओढ आणि माया होतीच.त्यांना तो प्रेमाने आपल्या घरी रहायला बोलावी, बाहेरून चांगले पदार्थ मागवी, त्यांच्या लहान मुलांशी खेळण्यात रमून जाई.) इथून पुढे —–
मंदार या काकाला जास्त attached होता त्यातल्या त्यात. त्याची आई सविताही बऱ्यापैकी संबंध ठेवून होती सुधाशी. सुधाचं त्यातल्या त्यात सविताशी पटायचं. माहेरची माणसं, बहिणी, अशा सगळ्यांशी सुधाचं नाहीच पटायचं. त्यामुळे घरी सतत ‘ तू तिथे मी ! ‘ तिला नवऱ्याशिवाय दुसरं विश्वच नव्हतं. तिने कधी आपला ग्रुप, पुस्तक कट्टा असं काही कधी निर्माणच नाही केलं. विश्वासने कितीतरी प्रयत्न केले, पण ही सतत दुर्मुखलेलीच राहिली.
त्यादिवशी मंदार आणि त्याचे कुटुंब सुधाकडे राहायला आले. त्यांच्या लहान मुलाने विश्वासला खूप दमवले, आजोबा मला स्कूटरवरून राईड मारून आणा, बॉल खेळा, आपण शिवाशिवी खेळूया, म्हणत, मुलगा पळत सुटे आणि त्याच्या मागे धावून, विश्वास अगदी दमून गेला . कितीही उसने अवसान आणले तरी वय बोलतेच ना. मंदारही मुलाला रागावला नाही की “ अरे, किती त्रास देतोस आजोबांना. किती चढ उतार करायला लावतोस जिन्यावरून रे !”
शेवटी सुधाच म्हणाली, “ अहो, शांत बसा बघू. आता अजिबात धावू नका त्या पोराबरोबर. काय चाललंय तुमचं?आजारी का पडायचंय?” लाडावलेली ती मुलं बघून सुधाला अतिशय राग यायचा.पण विश्वाससमोर तिचं काही चालायचं नाही. विश्वासचं आंधळं प्रेम होतं या लोकांवर. आपल्याला काही झालं तर हे लोक नक्की धावून येतील याची खात्रीच होती त्याला. पण सुधा ओळखून होती यांना. विश्वासने मृत्युपत्र केले आणि त्यात आपली सर्व मालमत्ता मंदारच्या नावे केली. पण अजून सुधाने सही नव्हती केली म्हणून ते तसेच रखडले होते..दुसरं होतंच कोण त्याला? त्या दिवशी असंच झालं. सुधा पाय घसरून अंगणात पडली. विश्वासने मंदारला फोन केला. मंदार लगेच आला, डॉक्टरला बोलावलं. नशिबाने सुधाला कुठे फ्रॅक्चर झाले नव्हते.
मंदारने जुजबीऔषधपाण्याची सोय केली आणि तो निघून गेला. पुन्हा घरी हे दोघेच म्हातारे उरले. विश्वासला फार वाटले, मंदार आपल्याला घरी रहायला बोलावेल, चार दिवस या म्हणेल. पण तसे झाले नाही. सुधाच आडवी झाल्याने घरची उठबस करून विश्वास थकून गेला. ही तर नुसती झलक होती. पुढे काय? यांच्या घरी असं कायम रहायला येणारं कोणीही शक्यच नव्हतं आणि मंदारचीच आई त्याच्या घरी असल्याने याना तो बोलावणेही अशक्य होतं. सुधा बरी झाली आणि हळूहळू घरातल्या घरात हिंडूफिरु लागली, कामं करू लागली. विश्वासच्या मानाने सुधा प्रॅक्टिकल होती. तिला कोण कसे आहे हे बरोबर समजत होते. पण लग्न झाल्या दिवसापासून तिला समजून चुकले होते, विश्वास अतिशय हेकट आहे. तो दुसऱ्याच्या मताला अजिबात किंमत देत नाही. मी म्हणेन तेच खरे. सुधाला याचा त्रास होई पण इलाजच नव्हता. रोज उठून वाद घालण्यापेक्षा ती गप्प बसणे पसंत करी. कितीही अवसान आणले, तरी आता संध्याछाया भेडसावू लागल्या होत्याच. एकेक करत सगळी म्हातारी माणसे कालवश झाली आणि आपणसुद्धा उताराला लागलो, हे सत्य कटू तर होतेच, आणि पचवायला तर फार अवघड होतेच.
सुधाची मैत्रीण एकदा सुधाकडे आली होती तेव्हा म्हणाली, ” सुधा, कशाला वाईट वाटून घेतेस मूल नाही म्हणून. मला आहेत दोन मुलं ! उपयोग आहे का काही? दोघेही गेलेत अमेरिकेला निघून. मीही एकटीच नाही का रहात घरात? होईल ते होईल. नशिबानं भरपूर पैसा आहे, म्हणून निदान त्यांच्यावर अवलंबून तरी नाही मी ! येते जाऊन वर्षातून एकदा तिकडे, पण मला तिकडे मुळीच आवडत नाही ग कायम रहायला. आपला भारत खरंच महान ! मला तरी कोण आहे ग इथं? मी तर ‘अथश्री’मध्ये फ्लॅट घेऊन ठेवलाय. सध्या दिलाय भाड्याने. मला होईनासं झालं की मी तिकडे जाऊन रहाणार. छान आहे सगळं तिथे. कसलीही काळजी नाही. पैसे द्या, की सगळ्या सुखसोयी आहेतच. कोणाचे आभार उपकार नकोत.” सुधाच्या मनात हाही विचार घर करून राहिला. कोण कोणाचे नसते हल्ली. पुतण्यावर फार भरवसा आहे विश्वासचा, पण एवढी मी आजारी होते, तर म्हणाला का,या विश्रांतीला? आपल्यालाही ही सोय हळूहळू बघावी लागणार. अगदी घरी बायका ठेवल्या तरी आपल्याला दिवसेंदिवस घर सांभाळणे अवघडच जाणार हे कळून चुकले होते सुधाला ! आता फक्त विश्वासला हे कधी समजणार, याची वाट बघणे तिच्या हातात उरले होते.
त्या दिवशी मंदार असाच विश्वासकडे आला. इकडचं तिकडचं बोलून झाल्यावर म्हणाला, ” काका, आपण वाडा विकून टाकूया. मला आता पैशाची गरज आहे फार. तुम्ही तरी अशा जुनाट वाड्यात का राहाताय? वाड्याचे दोन्ही भाग एकदम विकले तर किंमत चांगली येतेय ! आपल्याला फ्लॅट्स आणि वर पैसेही मिळतील. किती दिवस असे भावनिक गुंतवणूक करून, माझ्या आईवडिलांची वास्तू आहे ही, असं म्हणत रहाणार? मनावर घ्या आता. जुनी झाली ती वास्तू आणि त्या भावनाही ! मला आत्ता खरंच गरज आहे पैशाची. बाबा अकाली अचानक गेले,आणि काहीच शिल्लक नव्हती त्यांची. मला आता खूप खर्च आहेत पुढे. मुलांच्या फियाच लाखाच्या घरात असतात हल्ली. तुम्हाला काय कल्पना येणार? बघा विचार करा.” मंदार निघून गेला. विश्वासला हा पहिला झटका होता. सुधा शांतपणे हे ऐकत होती.
नंतर पुढच्या आठवड्यात सविता आली. “वहिनी, काय ठरलं भावजींचं? विकायला आहेत का तयार? बस झालं आता इमोशनली गुंतून पडणे हो ! किती दुरुस्त्या निघत आहेत वाड्याच्या. नका राहू भुतासारखे इथं दोघेच्या दोघे. मंदार म्हणतो तसं आपण वाडा विकून टाकू आणि तुम्ही आमच्याजवळच एखादा फ्लॅट घ्या. म्हणजे मंदारलाही बरे पडेल तुमची देखभाल करायला. सारखा कसा येणार तो तरी इतक्या लांबून !” सुधा म्हणाली, ‘तुमचं बरोबरच आहे, पण हे यांना नको का पटायला? मी सांगून थकून गेले. तुम्ही आणि ते बघा काय ते ! मी तुमच्या कोणत्याही भानगडीत पडणार नाही.” सविता जरा रागावलीच आणि निघून गेली..
– क्रमशः भाग दुसरा.
प्रस्तुती : डॉ. ज्योती गोडबोले
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
संत जनाबाई या चित्रपटातली ही भूपाळी रचली ‘आधुनिक संत ‘ ग.दि .माडगूळकर म्हणजे गदिमांनी .सुधीर फडके म्हणजे बाबूजींचं संगीत आणि स्वरही त्यांचाच. विठ्ठल, चित्रपट ,गदिमा ,बाबूजी अशी मराठी माणसाची सगळी प्रेमं एकाठायी एकवटलेल्या गीताची माधुरी अवीट असणारच !
१९४९ साली हा चित्रपट आला .१ जून १९२९ ला स्थापन झालेल्या प्रभात कंपनीची तुतारी चांगलीच दुमदुमू लागली होती .गदिमा व बाबूजी ही जोडीही गीत संगीतामुळं लोकप्रिय होत होती .पण दुसर्या महायुद्धाच्या काळात कच्च्या फिल्मच्या तुटवड्यामुळे चित्रपटनिर्मितीला परत उतरती कळा लागली .त्यातच हिंदी चित्रपटांची स्पर्धा सुरु झालेली .त्यात टिकून रहाण्याकरता प्रभातनंही अनेक हिंदी चित्रपट काढले .प्रभातचा शेवटचा चाललेला मराठी चित्रपट म्हणजे ‘ संत जनाबाई .’
गदिमांनी चित्रपटांकरता अनेक अभंग लिहिले .अनेकदा ज्या संतावरचा तो चित्रपट आहे त्याच्या रचनांव्यतिरिक्तही काही रचना चित्रपटाची गरज म्हणून हव्या असत . गदिमांच्या या रचना पाहिल्या तर ते त्या संतांचेच अभंग वाटावेत इतक्या त्या शब्द व भाव यांनी संतरचनांच्या जवळ जातात .
प्रभातसमयो पातला ,आता जाग बा विठ्ठला !
विठ्ठलाच्याच निद्रिस्त रूपासारखी भासणारी निशा सरते आहे .. आकाशाचा निळसर काळा पडदा हळूहळू उतरतोय नि तिथं उगवतीचा लालिमा फुटायच्या बेतात आहे .. चंद्रभागेच्या काठची वाळू ओलसर झाली आहे नि तिचं पाणी सुटलेल्या पहाटवार्यांनी हळूहळू हेलकावे घेतं आहे ..वाळवंटात देवळाच्या प्रांगणात विठ्ठलाचे भक्तगण जमलेत. आत तो त्रिभुवनाचा स्वामी निद्रेत आहे .खरंतर तो अहर्निश जागृत आहे म्हणूनच तर हे विश्व चालतंय ..आपण त्याला आपल्या त्रासापासून थोडा काळ मुक्ती देतो ! मग आता परत आपली गार्हाणी ऐकवण्याकरता त्याला सामोरं जायचं तर त्याला आधी हळुवारपणे विनंती करायला हवी ! मग त्याच्या अंगणात दाटी करायची .टाळ मृदंगाचा दंगा न करता हलकेच वीणेच्या एकतारीच्या साथीनं ,हलक्या, मऊ आवाजात भूपाळ्या गायच्या ..जणू देव-देवांगना अन् नारदादि दिग्गज आपल्यासाठी गाताहेत असं ते गायन त्याला कर्णसुखद वाटायला हवं ! डोळे उघडताच त्याला दिंड्या पताकांचे धुमारे दृष्टीस पडायला हवेत ..
…. आणि मग त्याला हलकेच सादावायचं , जाग बा जगजेठी …जाग रे भक्तश्रेष्ठी ..तुझे कमलनयन कधी उघडतात अन तुझ्या कृपादृष्टीचं चांदणं कधी बरसतं याकरता आमची दिठी तहानली आहे ..हजारो नेत्र टक लावून वाट पहात आहेत तुझ्या दर्शनाची ! आमच्या वाणीतून येणारं तुझं नाम ऐकून आमचेच कान धन्य होत आहेत ..आम्ही दीन दुबळे भक्त , तुला अर्पण तरी करणार ! तुझ्या तेजाला ओवाळता येईल अशा ज्योतीतरी कुठून आणणार ! घे ,आमच्या प्राणांनीच आरती करतोय आणि आमच्या नेत्रज्योतींचाच काकडा शिलगावलाय ….स्वीकार ही आरती आणि लवकर आम्हाला तुझं श्रीमुखकमल दिसूदे ! कृपा कर ,दर्शन
☆ इस्रोची तिसरी चंद्रमोहीम – चंद्रयान ३ ☆ श्री राजीव गजानन पुजारी☆
ISRO ही भारत सरकारची प्रमुख अंतराळ संस्था आहे आणि त्याचे बेंगळुरू (कर्नाटक) या शहरात मुख्यालय आहे. १५ ऑगस्ट १९६९ रोजी स्थापना झालेल्या ISRO ने पूर्वीच्या इंडियन नॅशनल कमिटी फॉर स्पेस रीसर्च (INCOSPAR) या संस्थेची जागा घेतली. ही संस्था विज्ञान विभागाकडून व्यवस्थापित केली जाते.
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेची कार्ये देशभरातील विविध केंद्रांमधून संचलीत होत असतात.
प्रत्येक मिशनला लागणाऱ्या संवेदकांचा विकास हा स्पेस एप्लीकेशन सेंटर अहमदाबाद येथे होत असतो तर सॅटेलाईटची रचना, विकास, जुळणी आणि चाचण्या बंगलोर येथील यु.आर. राव उपग्रह केंद्रात केल्या जातात. प्रक्षेपकांचा विकास हा विक्रम साराभाई अंतराळ केंद्र, तिरुअनंतपुरम् येथे केला जातो तसेच उपग्रहांचे प्रक्षेपण श्रीहरिकोटा येथील सतीश धवन केंद्रातून केले जाते. बरीचशी महत्त्वाची प्रशासकीय कामे व विदा व्यवस्थापनेची कामे हसन, भोपाळ आणि हैदराबाद येथून केली जातात.
इस्रोने आजपर्यंत बऱ्याच अंतराळ यंत्रणा विकसीत केल्या असून, सर्वात महत्त्वाच्या INSAT प्रणालीचा (भारतीय राष्ट्रीय उपग्रह यंत्रणा) उपयोग मुख्यतः दूरसंचार, दूरदर्शन प्रसारण, हवामानशास्त्र व नैसर्गिक आपत्ती बाबत पूर्व सूचना देण्यासाठी होतो.
19 एप्रिल 1975 रोजी भारताने सोवियत संघाच्या सहकार्य ने आपला‘आर्यभट्ट’ नावाचा पहिला उपग्रह पृथ्वीच्या कक्षेत स्थापित केला.
1980 साली पूर्णपणे स्वदेशी बनावटीच्या तंत्रज्ञानावर आधारितSLV-3 प्रक्षेपकाद्वारे‘रोहिणी’ हा पहिला उपग्रह अवकाशात सोडण्यात आला.
22 ऑक्टोबर 2008 रोजी भारताची‘चंद्रयान-1’ मोहीम यशस्वीरित्या पार पडली
‘मार्स ऑर्बिटर मिशन (MOM)’ ने 24 सप्टेंबर 2014 रोजी यशस्वीरित्या मंगळ ग्रहाच्या कक्षेत प्रवेश केला आणि पहिल्याच प्रयत्नात आणि खूप कमी खर्चात मंगळ ग्रहाच्या कक्षेत यशस्वीपणे पोहोचणारा पहिला देश ठरला.
२२जुलै २०१९ रोजी इस्रोने चंद्रयान-२ द्वारे चंद्राच्या उत्तर ध्रुवाजवळ अवतरणाचा प्रयत्न केला, पण कांही तांत्रिक अडचणींमुळे तो यशस्वी होऊ शकला नाही.—
— आता याच मोहिमेची अनुसरण मोहीम म्हणून इस्रोने चंद्रयान-३ मोहिमेचे नियोजन केले आहे. सर्वकाही व्यवस्थित पार पडले तर जुलै २०२३ च्या दुसऱ्या आठवड्यातLVM-3 या प्रक्षेपकाद्वारा सतीश धवन अंतराळ केंद्र, श्रीहरीकोटा येथून चंद्रयान-३ चे प्रक्षेपण केले जाईल. ऑगस्ट २०२३ च्या शेवटच्या आठवड्यात यान चंद्राच्या उत्तर ध्रुवानजीक उतरेल.
चंद्रयान-३ मध्ये स्वदेशी लँडर मॉड्युल (LM), प्रॉपल्शन मॉड्युल (PM) आणि रोव्हर यांचा समावेश आहे. प्रॉपल्शन मॉड्युलचे मुख्य काम म्हणजे लँडर मॉड्युलला अगदी प्रक्षेपकापासून विलग झाल्यापासून ते चंद्राभोवतीच्या १०० कि. मी. वर्तुळाकार ध्रुवीय कक्षेपर्यंत नेणे हे आहे. त्यानंतर प्रॉपल्शन मॉड्युल लँडर मॉड्युलला स्वतःपासून विलग करेल. नंतर लँडर मॉड्युल थ्रस्टर्सच्या सहाय्याने चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल. त्यानंतर रोव्हर लँडर मॉड्युलपासून विलग होऊन १४ पृथ्वी दिवसांपर्यंत चंद्राच्या पृष्ठभागावर विहार करून महत्वाची वैज्ञानिक माहिती गोळा करून ती पृथ्वीकडे पाठवेल. प्रॉपल्शन मॉड्युलमध्ये मूल्यवर्धनासाठी चंद्राच्या कक्षेतून पृथ्वीच्या वर्णक्रमीय(spectral) आणि ध्रुवमितीय (polarimeyric) मोजमापांचा अभ्यास करण्यासाठी स्पेक्ट्रो-पोलारिमेट्री ऑफ हॅबिटेबल प्लॅनेट अर्थ (SHAPE) हा वैज्ञानिक अभिभार आहे, जो लँडर मॉड्युल विलग झाल्यावर कार्यान्वित केला जाईल. या मोहिमेचा उद्देश अंतर्ग्रहीय मोहिमांसाठी आवश्यक नवीन तंत्रज्ञान विकसित करणे व त्याचे प्रात्यक्षिक करणे हे आहे. लँडरमध्ये चंद्राच्या विशिष्ठ जागेवर हळुवार उतरण्याची (soft landing) व रोव्हरला चंद्रभूमीवर तैनात करण्याची क्षमता आहे. त्यानंतर रोव्हर त्याच्या वाटचालीदरम्यान चंद्राच्या पृष्ठभागाचे जागेवरच रासायनिक विश्लेषण करेल.
लँडर व रोव्हरवर चंद्राच्या पृष्ठभागावर प्रयोग करण्यासाठी वैज्ञानिक अभिभार आहेत. ते पुढील प्रमाणे :
अ)लँडर वरील अभिभार –
१) चंद्राज सरफेस थर्मोफिजिकल एक्सपेरिमेंट (ChaSTE)- हा अभिभार औष्मिक प्रवाहकता (thermal coductivity) व तापमान यांची मोजणी करेल.
३)लँगमुईर प्रोब (LP)- हा प्लाविकाची (plasma) घनता व त्याच्यातील फेरफार यांचा अंदाज लावेल.
४)नासाकडून प्राप्त पॅसीव लेसर रेट्रोरिफ्लेक्टर ऍरे – हा अभिभार चंद्राचे लेसर श्रेणीय अध्ययन करेल.
ब ) रोव्हर वरील अभिभार – रोव्हर उतरलेल्या जागेची मुलद्रैविक संरचना प्राप्त करण्यासाठी रोव्हरवर अल्फा पार्टिकल एक्स रे स्पेक्ट्रोमीटर (APXS) आणि लेसर इंड्यूस्ड ब्रेकडाऊन स्पेक्ट्रॉस्कोप हे दोन अभिभार आहेत.
चंद्रयान ३ मोहिमेची उद्दिष्टे पुढील प्रमाणे आहेत :
१)चंद्राच्या पृष्ठभागावर सुरक्षित आणि हळुवार उतरण्याचे प्रात्यक्षिक करणे.
ही उद्दिष्टे गाठण्यासाठी लँडरमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. जसे की…
१)उर्ध्वतामापक (Altimeters)- लँडरवर लेसर व रेडिओवारंवारीता आधारीत उर्ध्वतामापक आहेत.
२)वेगमापक (velicitymeters)- लँडरवर लेसर डॉप्लर वेगमापक व लँडर क्षैतिज (horizontal) वेग छायाचित्रक (camera) आहेत.
३)जडत्व मापन (inertial measurement)- लँडरवर एकात्मिक लेसर घुर्णदर्शी आधारित (gyrobased) जडत्व संदर्भयन् आणि प्रवेगमापक (accelerometer) आहेत.
४)प्रणोदन प्रणाली (propulsion system)- लँडरवर ८०० N थ्रोटलेबल द्रव इंजिन, ५८ N ऍटीट्युड थ्रूस्टर्स आणि थ्रोटलेबल इंजिन कंट्रोल इलेक्ट्रॉनिक्स आहेत.
५)दिक् चलन, मार्गदर्शन व नियंत्रण (navigation, guidance and control)- लँडरवर समर्थित अवतरण विक्षेपमार्ग (powered descent trajectory) आराखडा आणि संबंधित सॉफ्टवेअर घटक आहेत.
६)धोका शोधणे आणि टाळणे (Hazard detection and avoidance)- लँडरवर धोका शोधक आणि वर्जक छायाचित्रक आणि प्रक्रिया अज्ञावली (processing algorithm) आहेत.
७)अवतरण पाद यंत्रणा (Landing leg mechanism) यामुळे हळुवार अवतरणाला मदत होते.
पृथ्वीच्या परिस्थितीत वर सांगितलेल्या प्रगत तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक करण्यासाठी लँडरच्या अनेक विशेष चाचण्या नियोजित करून यशस्वीरित्या पार पाडल्या आहेत. त्या म्हणजे ….
१)एकात्मिक थंड परीक्षण (Integrated cold test)- एकात्मिक संवेदक आणि दिक् चलन कार्यक्षमता परीक्षणासाठी परीक्षण मंच म्हणून हेलिकॉप्टर वापरून ही चाचणी केली गेली.
२)एकात्मिक उष्ण परीक्षण (Integrated hot test)- संवेदक(sensors), प्रवर्तक (actuators) व NGC (navigation, guidance and control) यांसह बंद वळसा कार्यक्षमतेच्या परीक्षणासाठी (closed loop performance test) परीक्षण मंच म्हणून टॉवर क्रेनचा वापर करून ही चाचणी केली गेली.
३)अवतरण पाद यंत्रणा परीक्षण (landing leg mechanism test)- चंद्र सदृष्य पृष्ठभाग तयार करून विविध अवतरण परिस्थितीत ही परीक्षणे केली गेली.
चंद्रयानाचे वजनपुढीलप्रमाणे असणार आहे:….
१)प्रणोदन कक्ष (propulsion module)-२१४८ कि.ग्रॅ.
२)अवतरण कक्ष (lander module)-१७२६ कि.ग्रॅ.
३) बग्गी (rover)- २६ कि.ग्रॅ.
लँडर व रोव्हरचे अपेक्षित आयुष्य १४ पृथ्वी दिवस असणार आहे.