गराजचं शटर रिमोटने अलगद उघडलं. आणि अमिताने तिची पिवळी पोरशे कार गराज मध्ये आणली. शटर बंद झाले आणि अमिता घरात आली. घरात कोणीच नव्हतं. आयलँड वर बराच पसारा पडला होता. सिंक मध्ये भांडी साचली होती. काही क्षण अमिताला वाटलं तिला खूप भूक लागली आहे. सिरॅमिक बोलमध्ये ब्रुनोचे चिकन ड्रुल्स पडले होते. ते तिने पाहिले आणि क्षणात तिच्या काळजात खड्डा पडला. तिने घटाघटा पाणी प्यायले आणि काऊच वर जाऊन ती बसली. एसीचं तापमान ॲडजस्ट केलं आणि डोळे मिटून शांत बसली. छाती जड झाली होती. खरं म्हणजे मोठमोठ्याने तिला रडावंसही वाटत होतं. एकाच वेळी आतून खूप रिकामं, पोकळ वाटत होतं. काहीतरी आपल्यापासून तुटून गेलेलं आहे हे जाणवत होतं.
मोबाईल व्हायब्रेटर वर होता. तिने पाहिलं तर जॉर्ज चा फोन होता.
” हॅलो! जॉर्ज मी आज येत नाही. ऑन कॉल आहे. काही इमर्जन्सी आली तर कॉल कर.”
” ओके. टेक केअर” इतकंच जॉर्ज म्हणाला आणि त्याने फोन ठेवला.
अमिता डेक वर आली. कल्डीसॅक वरचा त्यांचा कोपऱ्यातला बंगला आणि मागचं दाट जंगल. पिट्स बर्ग मध्ये नुकताच फॉल सीजन सुरू झाला होता. मेपल वृक्षावरच्या पानांचे रंग बदलू लागले होते. पिवळ्या, ऑरेंज रंगाच्या अनंत छटा पांघरून साऱ्या वृक्षावरची पाने जणू काही रंगपंचमीचा खेळच खेळत होती. पण अजून काही दिवसच. नंतर सगळी पानं गळून जातील. वातावरणात हा रंगीत पाचोळा उडत राहील कुठे कुठे. कोपऱ्यात साचून राहील. वृक्ष मात्र निष्पर्ण, बोडके होतील. आणि संपूर्ण विंटर मध्ये फक्त या झाडांचे असे खराटेच पाहायला मिळतील. सारी सृष्टी जणू काही कुठल्याशा अज्ञात पोकळीचाच अनुभव घेत राहील. अमिताला सहज वाटलं,” निसर्गाच्या या पोकळीशी आपल्याही भावनांचं साध्यर्म आहे.”
या क्षणी खूप काही हरवल्यासारखं, कधीही न भरून येण्यासारखी एक अत्यंत खोल उदास पोकळी आपल्या शरीराच्या प्रवाहात जाणवते आहे.
हर्षल ला फोन करावा का? नको. तो मीटिंगमध्ये असेल. सकाळी निघताना म्हणाला होता,” बी ब्रेव्ह अमिता! खरं म्हणजे मी तुझ्याबरोबर यायला हवं. पण आज शक्य नाही. आमचा लंडनचा बॉस येणार आहे.”
पण अमिता जाणून होती हर्षलची भावनिक गुंतवणूक आणि दुर्बलताही. त्याला अशा अवघड क्षणांचं साक्षी व्हायचंच नव्हतं खरं म्हणजे.
अमिता त्याला इतकंच म्हणाली होती,” इट्स ओके. मी मॅनेज करेन.”
आणि तिने छातीवर दगड ठेऊन सारं काही पार पडलं होतं.
विभाला फोन करावा का असाही विचार तिच्या मनात येऊन गेला. पण तो विचार तिने झटकला. विभा इकडेच येऊन बसेल आणि ते तिला नको होतं. तिला एकटीलाच राहायचं होतं. निर्माण झालेल्या अज्ञात पोकळीतच राहणं तिला मान्य होतं. तो कठिण,दु:खद अनुभव तिला एकटीलाच घ्यायचा होता. निदान आता तरी.
संध्याकाळी येतीलच सगळ्यांचे फोन. तान्या, रिया. “ब्रूनो आता नाही” हे त्यांना सांगण्याचं बळ ती जणू गोळा करत होती. सगळ्यांचाच भयंकर जीव होता त्याच्यावर आणि तितकाच त्याचाही सगळ्यांवर.
अशी उदास शांत बसलेली अमिता तर ब्रूनोला चालायचीच नाही. अशावेळी तिच्या मांडीवर पाय ठेवून डोक्यानेच तो हळूहळू तिला थोपटायचा. एक अबोल, मुका जीव पण त्याच्या स्पर्शात, नजरेत, देहबोलीत प्रचंड माया आणि एक प्रकारची चिंता असायची. घरातल्या प्रत्येकाच्या भावनांशी तो सहज मिसळून जायचा. त्यांची सुखे, त्यांचे आनंद, त्यांची दुखणी, वेदना हे सगळं काही तो सहज स्वतःमध्ये सामावून घ्यायचा. इतकच नव्हे तर साऱ्या ताण-तणावावरती त्याचं बागडणं, इकडे तिकडे धावणं, खांद्यावर चढणं, कुरवाळणं ही एक प्रकारची तणावमुक्तीची थेरेपीच असायची.
ब्रुनोची आयुष्यातली वजाबाकी सहन होणं शक्य नव्हतं. क्षणभर तिला वाटलं की आयुष्यात वजाबाक्या काय कमी झाल्या का? झाल्याच की. कितीतरी आवडती माणसं पडद्याआड गेली. काही दूर गेली. काही तुटली. त्या त्या वेळी खूप दुःख झाले पण या संवेदनांची त्या संवेदनांशी तुलनाच होऊ शकत नाही.
घरात तसा कुठे कुठे ब्रूनो चा पसारा पडलेला होता. टीव्हीच्या मागे, काऊचच्या खाली, डेक वर,पॅटीओत त्याच्यासाठी आणलेली खेळणी, अनेक वस्तू असं बरंच काही अमिताला बसल्या जागेवरून आत्ता दिसत होतं. मागच्या विंटर मध्ये अमिताने त्याच्यासाठी एक छान जांभळ्या रंगाचा स्वेटर विणला होता. काय रुबाबदार दिसायचा तो स्वेटर घालून आणि असा काही चालायचा जणू काही राणी एलिझाबेथच्याच परिवारातला! या क्षणीही अमिताला त्या आठवणीने हसू आलं.
कधी कधी खूप रागवायचा, रुसायचा, कोपऱ्यात जाऊन बसायचा, खायचा प्यायचा नाही. मग खूप वेळ लक्षच दिलं नाही की हळूच जवळ यायचा. नाकानेच फुसफुस करून, गळ्यातून कू कू आवाज काढायचा. लाडीगोडी लावायचा. टी— काकाच्या डेक्स्टरचे एकदा हर्षल खूप लाड करत होता. तेव्हा ते बघून तर त्याने घर डोक्यावर घेतलं होतं. इतकं की नेबर ने फोन केला,” नाईन इलेव्हन ला बोलावू का?”
नाईन इलेव्हन म्हणजे अमेरिकेतील तात्काळ सेवा. त्यावेळी क्षणभर अमिताला वाटले की भारतीयच बरे. उठ सुट असे कायद्याच्या बंधनात स्वतःला गुरफटून ठेवत नाहीत. इथे जवळजवळ प्रत्येक घरात पेट असतो. प्रचंड माया ही करतात, काळजीपूर्वक सांभाळतातही. पण प्रेमाचे रंग आणि जात मायदेशी चे वेगळे आणि परदेशातले वेगळेच.
तसे ब्रूनोचे आणि अमिताच्या परिवाराचे नाते किती काळाचे होते? अवघे दहा वर्षाचे असेल. असा सहजच तो त्यांच्या परिवाराचा झाला होता.
शेजारच्या कम्युनिटीमध्ये एक चिनी बाई राहायची. एकटीच असायची. तिचा हा ब्रुनो. तेव्हा लहान होता. पण अचानक एक दिवस तिने मायदेशी परतायचं ठरवलं. सोबत तिला ब्रूनोला न्यायचं नव्हतं कारण तिथलं हवामान त्याला मानवणार नाही असं तिला वाटलं. गंमत म्हणजे रिया,तान्या येता जाता त्या चिनी बाई बरोबर फिरणाऱ्या ब्रुनोचे फारच लाड करायच्या. परिणामी त्यांच्याशी त्याची अगदी दाट मैत्री झाली होती. हाच धागा पकडून तिने अमिताला,” ब्रूनोला अॅडॉप्ट कराल का?” असा प्रश्न टाकला.
रिया, तान्या तर एकदम खुश झाल्या. तसे हे सगळेच डॉग लवर्स. त्यांची तर मज्जाच झाली. आणि मग हा डोक्यावरचा भस्म लावल्यासारखा पांढरा डाग असलेला, काळाभोर, मखमली कातडीचा, छोट्या शेपटीचा, सडपातळ, पण उंच ब्रुनो घरी आला आणि घरचाच झाला आणि सारे जीवन रंगच बदलले.
चिनी बाईने मेलवर सगळे डॉक्युमेंट्स स्कॅन करून पाठवले. त्याच्या वंशावळीची माहिती, त्याचं वय, लसीकरणाचे रिपोर्ट्स, बूस्टर डोस च्या तारखा, त्याच्या खाण्यापिण्याच्या सवयी, वेळा , त्याचे ग्रुमिंग या सर्वांविषयी तिने इत्थंभूत माहिती कळवली. शिवाय त्याच्यासाठी ती वापरत असलेले शाम्पू ,साबण ,नखं, केस कापायच्या वस्तूंविषयी तिने माहिती दिली. अमिता, हर्षल, रिया, तान्या खूपच प्रभावित, आनंदित झाले होते. ब्रुनोसाठी जे जे हवं ते सारं त्यांनी त्वरित वॉलमार्ट मध्ये जाऊन आणलंही. पॅटीओमध्ये चेरीच्या झाडाखाली त्याचं केनेलही बांधलं.
सुरुवातीला तो थोडा बिचकला. गोल गोल फिरत राहायचा. कदाचित होमसिक झाला असेल. पण नंतर हळूहळू रुळत गेला. परिवाराचा एक अत्यंत महत्त्वाचा घटक बनला. त्याच्या आणि परिवाराच्या भावभावनांसकट एक निराळंच भावविश्व सर्वांचच तयार झालं.
‘ ब्रूनो जेवला का?”
“ब्रुनोला फिरवून आणलं का?”
“आज त्याला आंघोळ घालायची का?”
” आज का बरं हा खात पीत नाही? काही दुखत का याचं?”
असे अनेक प्रश्न त्याच्याबद्दलचे. हाच त्यांचा दिनक्रम बनला.
सुरुवातीला चिनी बाईच्या विचारणा करणाऱ्या मेल्स यायच्या. तिलाही ब्रुनोची ची आठवण यायची. करमायचं नाही. रिया,तान्याला तर एकदा असंही वाटलं की ही बाई ब्रूनोला परत तर नाही ना मागणार ?
पण मग दिवस, महिने, वर्ष सरत गेली आणि ब्रूनो हा फक्त त्यांचा आणि त्यांचाच राहिला. सगळेच मोठे होत होते. रिया,तान्यांचेही ग्रॅज्युएशन झाले. त्यांची राहण्याची गावं बदलली. हर्षल ,अमिताही आपापल्या व्यापात गुंतत होते, रुतत होते. ब्रुनोही वाढत होता. पण या सर्व परिवर्तनाचा, बदलांचा ब्रुनोही अत्यंत महत्त्वाचा, जवळचा ,एक कन्सर्नड् साक्षीदार होताच. कम्युनिटीतलं कल्डीसॅक वरचं, मागे दाट जंगल असलेल्या त्यांच्या घराचं मुख्य अस्तित्व म्हणजे ब्रूनोचं भुंकण आणि त्याच्या नाना क्रीडा, सवयी, सहवास हे नि:शंकपणे होतच.
☆ सुहास्य तुझे मनास मोही… भाग -2 ☆ श्री विश्वास विष्णु देशपांडे ☆
(— म्हणून ‘एखादी तरी स्मितरेषा…’ असे म्हणावे लागते.) इथून पुढे —-
पण आपण जर खळखळून हसलो तर त्याचे अनेक फायदे होतात. चेहऱ्याच्या स्नायूंना व्यायाम मिळून चेहरा प्रसन्न दिसतो. हृदय, फुफ्फुसानाही अधिक प्राणवायू मिळतो, व्यायाम होतो. असं म्हणतात की चालणाऱ्याचं नशीब चालतं, बसणाऱ्याचं नशीब बसून राहतं. त्याच धर्तीवर हसणाऱ्याचं नशीबही हसतं, रडणाऱ्याचं नशीबही रडतं असं म्हणायला हरकत नाही. हसतमुख असणारी माणसं संकटांना अधिक चांगल्या प्रकारे सामोरे जाऊ शकतात.
नॉर्मन कझिन्स या नावाचा एक पत्रकार होता. तो एका दुर्धर आजाराने बिछान्याला खिळून होता. रुग्णालयात त्याच्यावर अनेक प्रकारचे उपचार सुरु होते. अनेक प्रकारची वेदनाशामक औषधें घ्यावी लागत होती. त्याशिवाय त्याला झोप लागत नव्हती. एक दिवस त्याने चार्ली चॅप्लिनचा चित्रपट बघितला. तो खळखळून हसला. त्याला असे आढळून आले की त्या दिवशी त्याला वेदनाशामक औषधांशिवाय झोप लागली. मग त्याने विनोदी साहित्य वाचायला सुरुवात केली. औषधोपचारांच्या जोडीला रोज तो खळखळून हसू लागला आणि काय आश्चर्य ! काही दिवसांनी तो पूर्ववत बरा झाला. त्याची वेदनाशामक औषधे थांबली. तो पूर्ववत सगळी कामे करू लागला. आपल्या अनाटॉमी ऑफ इलनेस या पुस्तकात त्याने ही सगळी माहिती लिहून ठेवली आहे. त्याला असे आढळून आले की आपण जेव्हा हसतो तेव्हा आपल्या शरीरात एन्डॉर्फिन नावाचा एक स्त्राव स्त्रवतो. हे एन्डॉर्फिन वेदना शांत करण्याचे कार्य करते. मनाची मरगळ दूर करते आणि आपल्याला ताजेतवाने वाटते. खळखळून हसण्याने रक्तदाब आणि रक्तातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी होते. शरीरातील अँटीबॉडीजचे प्रमाण वाढते. प्रख्यात मानसशास्त्रज्ञ डॉ सिगमंड फ्राईड यांनीही हसण्याचे फायदे सांगताना हसण्यामुळे मनातील राग, द्वेष, ताण तणाव यासारख्या नकारात्मक भावना नष्ट होतात असे म्हटले आहे. हसण्याबद्दल लिहिताना नॉर्मन कझिन्स म्हणतो, ‘ हसणं हे एखाद्या ब्लॉकिंग एजंटसारखं आहे. ते जणू बुलेटप्रूफ जाकीट आहे. नकारात्मक भावनांपासून ते तुमचं रक्षण करतं. ‘
विनोदी चित्रपट, विनोदी नाटके यांना लोकांची कायमच पसंती असते ती यामुळेच. तास दोन तास खळखळून हसल्याने मनातली मरगळ निघून जाते, नकारात्मक भावनांचा निचरा होतॊ आणि आपल्याला प्रसन्न वाटू लागते. पु ल देशपांडे, आचार्य अत्रे, मार्क ट्वेन यांच्यासारख्या लेखकांचे विनोदी साहित्य म्हणजे अक्षय आनंदाचा ठेवा आहे. मधुकर तोरडमल हे विलक्षण ताकदीचे कलाकार होते. त्यांच्या ‘ तरुण तुर्क म्हातारे अर्क ‘ या नाटकातील ‘ ह हा हि ही ‘ ची बाराखडी कमालीची मजा आणते. त्यातून वेगळा विनोद, वेगळा अर्थ निर्माण होतो. प्रत्यक्ष जीवनातही आपल्याला या ‘ ह ‘ च्या बाराखडीचा वापर करणारे पुष्कळ लोक भेटतात. त्यांचं बोलणं ऐकताना मोठी मजा येते. प्रसंगी स्वतःच्या चुकांवरही हसता आले पाहिजे. अशी माणसे मनाने निर्मळ असतात.
पूर्वी आमच्याकडे एक दूधवाला दूध घालण्यासाठी यायचा. तो ‘ दूध घ्या ‘ म्हणायच्या ऐवजी त्याच्या खर्जातल्या आवाजात ‘ चला, भांडं घ्या ‘ असं म्हणायचा. मला त्याची खूप गंमत वाटायची. आमच्याकडे भांड्याधुण्यासाठी येणाऱ्या बाई बाहेरच उभ्या राहून फक्त ‘ ताईsss ‘ असा आवाज देतात. मग आपण समजून घ्यायचं की त्यांना भांडीधुणी करायची आहेत. कधी कधी एखाद्या ठिकाणी स्फोटक किंवा तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आणि अशा वेळी कोणी एखादा हलकाफुलका विनोद केला तर वातावरणातील तणाव लगेच निवळायला मदत होते. आमच्या शाळेत घडलेला एक किस्सा आहे. एकदा वार्षिक परीक्षा सुरु असताना झालेल्या पेपर्सचे गट्ठे तपासण्यासाठी शिक्षकांना वाटप करण्यात येत होते. विद्यार्थी आणि वर्गसंख्या वाढल्याने एका शिक्षिकेला तपासण्यासाठी जास्त पेपर्स दिले गेले. साहजिकच त्या चिडल्या. तेथे असणाऱ्या अधिकाऱ्यांचे आणि त्यांचे दोन दोन शब्द झाले. वातावरण तापले. त्या शिक्षिका रागाने त्या अधिकाऱ्याला विचारू लागल्या, एवढे पेपर्स मी कसे तपासायचे ? ‘ एक ज्येष्ठ पण मिश्किल शिक्षक तिथे हजर होते. ते म्हणाले, ‘ लाल पेनने तपासा…’ आणि एकदम हास्याचा स्फोट झाला. तणावपूर्ण वातावरण क्षणात निवळले आणि गंमत म्हणजे त्या शिक्षिकाही हास्यात सामील झाल्या.
हसण्याची क्रिया ही अशी एक क्रिया आहे की ज्यामध्ये आपल्या मेंदूचा डावा आणि उजवा भाग एकाच वेळी काम करतात. आपण ऐकलेली गोष्ट किंवा वाचलेली गोष्ट मेंदूचा डावा भाग समजून घेतो. उजवा भाग ती गोष्ट गंभीर आहे की विनोदी याची छाननी करतो. विनोदी गोष्ट असेल तर आपल्याला हसू येते. अशा रीतीने शरीराचे सर्व अवयव जेव्हा एकत्र येऊन काम करतात तेव्हा ते काम उत्तम होते. व्यायाम, हसणे, चालणे यासारख्या गोष्टीत आपल्या शरीरातील सर्व अवयवांचा सुरेख समन्वय घडतो. आरोग्यासाठी जसा उत्तम आहार आणि व्यायाम महत्वाचा तसाच निरोगी मनासाठी हास्योपचारही महत्वाचा.
सखी शेजारिणी तू हसत राहा या गीतात ते सखी शेजारणीला उद्देशून म्हटले असले तरी ते आपल्या सगळ्यांसाठी पण आहे असे समजायला हरकत नाही. ‘ प्रकाशातले तारे तुम्ही ‘ या कवितेत कवी उमाकांत काणेकर म्हणतात, ‘ रडणे हा ना धर्म आपुला, हसण्यासाठी जन्म घेतला. ‘ पुढे ते म्हणतात, ‘ सर्व मागचा विसरा गुंता, अरे उद्याच्या नकोत चिंता…’ खरंच मागचा सगळा गुंता, समस्या टाकून देऊन हसता आले पाहिजे म्हणजे ‘ आनंदाच्या शिखरावरती खुशाल जाऊन बसा ‘ अशी स्थिती प्राप्त होईल.
☆ इस्रोची “आदित्य एल -१” मोहीम – भाग-1☆ श्री राजीव गजानन पुजारी ☆
१.सूर्य
सूर्य हा आपल्या सर्वात जवळचा तारा आणि सौरमंडलातील सर्वात मोठा गोलक आहे. त्याच्या अनेक नावांपैकी आदित्य हे एक नांव आहे. सूर्याचे वय ४.५ अब्ज वर्षे आहे. हा हायड्रोजन व हेलियम वायूंचा अति उष्ण व तेजस्वी अंतरिक्ष गोलक आहे. तो पृथ्वीपासून १५० दशलक्ष किलोमीटर अंतरावर असून तो आपल्या सौरमंडळाचा ऊर्जा स्त्रोत आहे. आपणास माहीतच आहे की सौरशक्ती शिवाय पृथ्वीवर सजीवांचे अस्तित्व शक्य नाही. सूर्याचे गुरुत्वाकर्षण सूर्यमालेतील सर्व वस्तूंना एकत्र ठेवते. सूर्याच्या मध्यवर्ती भागाला गाभा (core) म्हणतात. तेथील तापमान अगदी १५ दशलक्ष अंश सेंटीग्रेड पर्यंत पोहोचू शकते. या तापमानाला तेथे अण्विक संमिलन (nuclear fusion) नावाची प्रक्रिया घडते. या प्रक्रियेमुळे सूर्याला अव्याहत ऊर्जा मिळत असते. आपणास दिसणाऱ्या सूर्याच्या पृष्ठभागाला दीप्तीमंडल (photosphere) म्हणतात हा सापेक्षरित्या ‘थंड’ असतो. येथील तापमान ५५०० अंश सेंटीग्रेड एवढे असते.
२.सूर्याचा अभ्यास कशासाठी?
सूर्य हा आपला सर्वात जवळचा तारा आहे. त्यामुळे इतर ताऱ्यांच्या तुलनेत त्याचा अभ्यास आपणास सांगोपांगपणे करता येतो. सूर्याच्या अभ्यासामुळे आपल्याला आपल्या आकाशगंगेतील इतर ताऱ्यांविषयी तसेच इतर विविध दीर्घिकांमधील ताऱ्यांविषयी खूप अधिक माहिती मिळू शकते. सूर्य हा खूप चैतन्यशील तारा आहे. आपण पाहतो त्यापेक्षा त्याचा विस्तार खूप मोठा आहे. त्याच्यावर सतत उद्रेक होत असतात, तसेच तो सौरमंडळात अमाप ऊर्जा उत्सर्जित करीत असतो. जर असे उद्रेक पृथ्वीच्या दिशेने घडत असतील तर त्यामुळे आपल्या भूमंडळावर (पृथ्वी जवळचे अंतरिक्ष) दुष्परिणाम होतात. अंतराळयाने आणि दूरसंवाद प्रणालींवर त्यांचा विपरीत परिणाम होतो. त्यामुळे अशा उद्रेकांविषयी आगाऊ सूचना मिळणे श्रेयसस्कर असते. याशिवाय एखादा अंतराळवीर जर थेटपणे या उद्रेकात सापडला तर त्याच्या जीवाला धोका पोहोचू शकतो. सूर्यावर घडणाऱ्या औष्णिक व चुंबकीय घटना अगदी टोकाच्या असतात. त्यामुळे ज्या गोष्टी आपण प्रयोगशाळेत शिकू शकत नाही त्या गोष्टींचा अभ्यास करण्यासाठी सूर्य ही एक नैसर्गिक प्रयोगशाळा आहे.
३.अंतरिक्ष वातावरण
आपल्या पृथ्वीवर सूर्य उत्सर्जन, उष्णता, सौरकण आणि चुंबकीय क्षेत्र यांद्वारे सतत परिणाम करत असतो. सूर्याकडून सातत्याने येणाऱ्या सौरकणांना सौर वारे म्हणतात व ते प्रामुख्याने उच्च उर्जायुक्त प्रकाशकणांनी (photons) बनलेले असतात. आपल्या संपूर्ण सौरमंडळावर सौर वाऱ्यांचा परिणाम होतो. सौरवाऱ्यांबरोबरच सूर्याच्या चुंबकीय क्षेत्राचा पण पूर्ण सौरमंडळावर परिणाम होतो. सौरवाऱ्यांसोबतच सूर्यावर होणाऱ्या उद्रेकांचाही सूर्याभोवतालच्या अंतराळावर परिणाम होतो. अशा घटनांच्या वेळी ग्रहांजवळील चुंबकीय क्षेत्र व भारीतकण यांच्या वातावरणात बदल घडतो. पृथ्वीचा विचार केला तर पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्र व अशा उद्रेकांनी वाहून आणलेले चुंबकीय क्षेत्र यांच्यातील अन्योन्यक्रियेमुळे पृथ्वीजवळ चुंबकीय अस्वस्थता (magnetic disturbance) निर्माण होते, त्यामुळे अंतरिक्ष मालमत्तांच्या (space assets) कामात विघ्न येऊ शकते.
पृथ्वी व इतर ग्रह यांच्या भोवतालच्या अंतरिक्षतील पर्यावरणाच्या स्थितीमधील सतत होणारे बदल म्हणजे अंतरिक्ष वातावरण होय. अंतरिक्ष वातावरण जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. म्हणूनच आपण अंतराळात जास्तीत जास्त तंत्रज्ञानाचा वापर करीत आहोत. पृथ्वीनजीकच्या अंतरिक्ष वातावरणाच्या अभ्यासामुळे आपणास इतर ग्रहांनाजीकच्या अंतरिक्ष वातावरणाच्या वर्तनाचा अंदाज येईल.
४.आदित्य एल-१ संबंधी माहिती
आदित्य एल-१ ही सूर्याचा अभ्यास करण्यासाठी योजलेली अंतराळस्थित वेधशाळा वर्गाची पहिली भारतीय मोहीम आहे. हे अंतराळयान सूर्य-पृथ्वी प्रणालीच्या लँग्रेजीयन बिंदू १ (एल-१) च्या आभासी कक्षेत (halo orbit) स्थित करण्यात येणार आहे. हा बिंदू पृथ्वीपासून १.५ दशलक्ष किलोमीटर अंतरावर आहे. एल-१ भोवतालच्या आभासी कक्षेत यान स्थिर केल्यामुळे ते कोणतेही पिधान (occultation) किंवा ग्रहण (eclips) यांचा अडथळा न येता सतत सूर्याभिमुख राहून सातत्याने सूर्यावरील घडामोडींवर लक्ष ठेवू शकेल. या यानावर सात अभिभार आहेत. हे अभिभार विद्युतचुंबकीय आणि कणशोधक (electromagnetic and particle detectors) वापरून सूर्याचे दीप्तीमंडल (photophere), वर्णमंडल (chromosphere) आणि प्रभामंडल किंवा किरीट (corona) यांचा अभ्यास करतील. एल -१ या सोयस्कर बिंदूचा फायदा घेऊन चार अभिभार थेट सूर्याचा वेध घेतील व उरलेले तीन अभिभार एल -१ या लँग्रेज बिंदू जवळील सौरकण आणि चुंबकीय क्षेत्र यांचा अभ्यास करतील. आदित्य एल-१ वरील अभिभारांमुळे आपणास सूर्याच्या वातावरणाच्या सर्वात बाहेरच्या थराचे म्हणजेच प्रभामंडल किंवा किरीट याचे (corona) अति तप्त होणे, प्रभामंडलामधील वस्तूमानाचे उत्सर्जन (Coronal Mass Ejection- CME), सौरज्वालांपूर्वीच्या व सौरज्वालांवेळच्या घडामोडी व त्यांची वैशिष्ट्ये , सूर्याभोवतालच्या वातावरणाची गतिशीलता (dynamics), सौर कणांचे व चुंबकीय क्षेत्रांचे ग्रहांदरम्यानच्या माध्यमातून प्रसारण (propagation)आदि गोष्टींची अत्यंत महत्त्वाची माहिती मिळेल.
५. आदित्य एल-१ ची महत्वाची वैज्ञानिक उद्दिष्टे
अ ) सूर्याचा सर्वांत बाहेरचा थर (प्रभामंडल) अतीतप्त का होतो (coronal heating) याचा अभ्यास करणे.
ब ) सौर वाऱ्यांच्या (solar winds) प्रवेगाचा अभ्यास करणे.
क ) प्रभामंडलामधील वस्तुमानाचे उत्सर्जन (Coronal Mass Ejection-CME), सौर ज्वाला (solar flares) आणि पृथ्वीसमीप हवामानाचा (near earth space weather) अभ्यास करणे.
ड ) सौर वातावरणाची जोडणी (coupling) व गतीशीलता (dynamics) यांचा अभ्यास करणे.
इ ) सौर वाऱ्यांचे वितरण (distribution) आणि तापमानातील दिक् विषमता (anisotropy) यांचा अभ्यास करणे.
ब ) सौर तबकडीच्या अगदी समीप जाऊन (साधारण १.०५ सौर त्रिज्या) प्रभामंडला मधील वस्तूमान उत्सर्जनाच्या (Coronal Mass Ejection-CME) गतीशीलतेचा अभ्यास करणे व त्यावरून CME च्या प्रवेगीय भागातील माहिती मिळविणे.
क ) यानावरील कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारा सूर्याचे इष्टतम (optimised) वेध घेऊन व इष्टतम विदासाठा (data volume) वापरून प्रभामंडलामधील वस्तूमान उत्सर्जन व सौरज्वाला यांचा शोध घेणे.
ड ) विविध दिशांना केलेल्या निरीक्षणांद्वारे सौर वाऱ्याच्या ऊर्जा दिक् -विषमतेचा अभ्यास करणे.
(संस्कारधानी जबलपुर के हमारी वरिष्ठतम पीढ़ी के साहित्यकार गुरुवर डॉ. राजकुमार “सुमित्र” जी को सादर चरण स्पर्श । वे आज भी हमारी उंगलियां थामकर अपने अनुभव की विरासत हमसे समय-समय पर साझा करते रहते हैं। इस पीढ़ी ने अपना सारा जीवन साहित्य सेवा में अर्पित कर दिया। वे निश्चित ही हमारे आदर्श हैं और प्रेरणास्रोत हैं। आज प्रस्तुत हैं आपके – पर्यावरण पर दोहे…।)
साप्ताहिक स्तम्भ – लेखनी सुमित्र की # 146 – पर्यावरण पर दोहे…
(प्रतिष्ठित कवि, रेखाचित्रकार, लेखक, सम्पादक श्रद्धेय श्री राघवेंद्र तिवारी जी हिन्दी, दूर शिक्षा, पत्रकारिता व जनसंचार, मानवाधिकार तथा बौद्धिक सम्पदा अधिकार एवं शोध जैसे विषयों में शिक्षित एवं दीक्षित। 1970 से सतत लेखन। आपके द्वारा सृजित ‘शिक्षा का नया विकल्प : दूर शिक्षा’ (1997), ‘भारत में जनसंचार और सम्प्रेषण के मूल सिद्धांत’ (2009), ‘स्थापित होता है शब्द हर बार’ (कविता संग्रह, 2011), ‘जहाँ दरक कर गिरा समय भी’ ( 2014) कृतियाँ प्रकाशित एवं चर्चित हो चुकी हैं। आपके द्वारा स्नातकोत्तर पाठ्यक्रम के लिए ‘कविता की अनुभूतिपरक जटिलता’ शीर्षक से एक श्रव्य कैसेट भी तैयार कराया जा चुका है। आज प्रस्तुत है आपका एक अभिनव गीत “रोज यही दोहराती घडियाँ…”)
☆ साप्ताहिक स्तम्भ # 146 ☆।। अभिनव गीत ।। ☆
☆ “रोज यही दोहराती घडियाँ…” ☆ श्री राघवेंद्र तिवारी ☆