(श्री श्याम खापर्डे जी भारतीय स्टेट बैंक से सेवानिवृत्त वरिष्ठ अधिकारी हैं। आप प्रत्येक सोमवार पढ़ सकते हैं साप्ताहिक स्तम्भ – क्या बात है श्याम जी । आज प्रस्तुत है आपकी एक भावप्रवण कविता “# जीवन का कटु सत्य #”)
आकाशवाणीच्या बालोद्यान कार्यक्रमातील मुलांचे लाडके नाना म्हणजे, गोपीनाथ तळवलकर . ते पुणे केंद्रावर बालविभागाचे प्रमुख होते. बालोद्यान कार्यक्रम दर रविवारी सकाळी १० वाजता बाळ- गोपाळांच्या गच्च उपस्थितीत सादर होई. अतिशय बालप्रिय आणि लोकप्रिय असा हा कार्यक्रम होता.
मुलांसाठी वा.गो. आपटे यांनी ‘आनंद मासिक काढले होते. गोपीनाथ तळवलकर त्याचे ३५ वर्षं संपादक होते.
त्यांची काही पुस्तके – आकाश मंदीर, छाया प्रकाश, आशियाचे धर्मदीप, चंदाराणी, निंबोणीच्या झाडाखाली (बलवाङ्मय) सहस्त्रधारा ( आत्मचरित्र) त्यांचे आत्मचरित्र त्यांच्या व्यक्तिमत्वाप्रमाणेच सौम्य, ऋजु आहे. त्यात आत्मगौरव, आत्मसमर्थन, अहंकार याचा लावलेशही नाही.
माणूस पाक्षिक सुरू झाल्यावर त्यामध्ये प्रसिद्ध होणार्या कवितांसोबत त्यांचा आस्वाद दिला जाई. ते पान गोपीनाथ तळवलकर लिहीत.
आज त्यांच्या जन्मदिंनानिमित्त त्यांना मन:पूर्वक अभिवादन.
☆☆☆☆☆
माधव ज्युलियन – ( २१ जानेवारी १८९४ – २९ नोहेंबर १९३९)
माधव ज्युलियन हे मराठीतले प्रतिभा संपन्न कवी. त्यांचे नाव माधवत्र्यंबक पटवर्धन. रविकिरण मंडळाची स्थापना त्यांनी केली. या मंडळाबद्दल अत्रे एकदा म्हणाले होते, या मंडळात रवी एकच आहे. बाकी सगळी किरणे आहेत. तो रवी म्हणजे माधव ज्युलियन.
माधव ज्युलियन यांनी शिक्षणानंतर फर्ग्युसन इथे १९१८ ते १९२४ फारसी भाषा शिकवत. मुंबई विद्यापीठात मराठी साहित्यात डी. लिट. पदवी मिळवलेले ते पहिले साहित्यिक. ‘छंदोरचना’ या ग्रंथासाठी त्यांना १ डिसेंबर १९३८ मधे माधव ज्युलियन डी. लिट. मिळाली.
माधवराव पटवर्धन यांनी ज्युलियन नाव का घेतले, याबद्दल अनेक दंतकथा आहेत.
त्यांचे काही लिखाणइंग्रजीतही आहे. कवितांव्यतिरिक्त त्यांनी भाषाशास्त्रीय लिखाणही केले आहे. ‘भाषाशुद्धीविवेक’ या त्यांच्या ग्रंथात, कालबाह्य झालेल्या मराठी भाषेतल्या शेकडो शब्दांची सूची दिलेली आहेत. काव्यचिकित्सा व काव्याविहार आशी आणखी दोन पुस्तके काव्याची चिकित्सा करणारी आहे. याशिवाय त्यांची आणखी पुस्तके –
उमरखय्यामच्या रुबाया – १९२९ – अनुवादीत २. तुटलेले दिवे ( यात एक सुनितांची मालाहे दीर्घ काव्य आणि अनेक स्फुट कविता आहेत. ) ३. नकुलालंकार – १९२९ –. दीर्घकाव्य ४. विरहतरंग – खंडकाव्य ५. मधुलहरी हे रुबायांच्या अनुवादाचे दुसरे पुस्तक त्यांच्या निधनानंतर रुबायांच्या अनुवादाचा तिसरा संग्रह निघाला.
त्यांचे २९ नोहेंबर १९३९ ला निधन झाले. त्यांच्या निधंनांनंतर त्यांच्यावर ३ चरित्र ग्रंथ प्रकाशित झाले. १. स्वप्नभूमी माधव ज्युलियन- शंकर. के. कानिटकर ( कवी गिरीष), २. डॉ. पटवर्धन ऊर्फ माधव ज्युलियन ३. माधव ज्युलियन- गं. दे. खानोलकर
त्यांच्या पत्नी लीलाताईंनीही ‘आमची ११ वर्षे या पुस्तकात त्यांच्या सहजीवनाच्या आठवणी दिल्या आहेत.
त्यांच्या कवितांपैकी त्यांच्या गाजलेल्या कविता म्हणजे- प्रेमस्वरूप आई , मराठी असे आमुची मायबोली.
☆☆☆☆☆
रियासतकार सरदेसाई – (१७ मे १८६५ – २९नोहेंबर १९५९)
रियासतकार सरदेसाई यांचं नाव गोविंद सखाराम सरदेसाई . यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील कमशेत इथे झाला. ते मराठी इतिहासकार व लेखक होते. त्यांनी मराठी साम्राज्याचा इतिहास, ‘मराठी रियासत’ या नावाने ८ खंडात लिहिला आहे. ‘मुसलमानी रियासत’ ३ खंडात मांडली आहे व ब्रिटीश रियासत २ खंडात. यातून महाराष्ट्राचा सुमारे १००० वर्षांचा इतिहास लिहिला आहे. भारतीय केंद्रशासनाने इतिहासविषयक साहित्याच्या योगदानासाठी त्यांना १९५५ मधेपद्मभूषण पुरस्कार देऊन गौरवले आहे.
रियासतकर सरदेसाई आणि माधव ज्युलियन यांचा आज स्मृतिदिन. या निमित्त या दोघांनाही मानाचा मुजरा.
☆☆☆☆☆
श्रीमती उज्ज्वला केळकर
ई – अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
संदर्भ : १.शिक्षण मंडळ कर्हाड: शताब्दी दैनंदिनी २. माहिती स्त्रोत – इंटरनेट
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
(भूक_अशी असते जी माणसाला काही पण करायला लावते,मढयावरील अथवा त्याला अर्पण केलेलं अन्न कधी कोणी खाल्लं तर त्यात नवल कसलं.शेवटी ती भूक आहे,आणि भूक माणसाला कुठे घेऊन जाईल याचा भरवसा नाहीच.)
आपल्याला प्रत्येकाला हवीहवीशी वाटते भेटवस्तू, छान छान गोष्टी भेट म्हणून मिळाव्यात अशी इच्छा असतेच सगळ्यांचीच. . भेट म्हणजे काय हे न समजणाऱ्या अजाणांची आणि आत्तापर्यंत अनेक गोष्टी भेट म्हणून मिळालेल्या सुजाण ज्येष्ठांची देखील. बाहुला-बाहुली, चेंडू, खेळणी या बालभेटीतून सुरु होत असलेला हा खजिना . . . वयानुसार कात टाकतो. . महागड्या, आराम देणाऱ्या, मौल्यवान वस्तूंची लयलूट भेट म्हणून केली जाते. कपडे, दागिने, मोबाईल एवढंच कशाला काहींना तर चारचाकी सुध्दा दिली जाते बरं का भेट म्हणून… . काहींना मात्र चॉकलेट, बिस्किटे, लाडू, पिझ्झा, केक अशा रसदार, चवदार पदार्थांची भेट घ्यायला आवडते.
असो.आस प्रत्येकाची, हो ना?
मी ही काही वेगळी नाही बरं. मलाही गिफ्टस् द्यायला आवडतात. घ्यायला तर त्याहूनही आवडतात. काही खास दिवस, खास लोकांनी गिफ्ट दिलीच पाहिजे असा आग्रह नसला तरी आस लागलेली असतेच मनात.. . माझ्या एका वाढदिवसाला मला अशीच एक आगळी भेट मिळाली. वाढदिवसाच्या निमित्तानं मी नानामामांना भेटायला गेले होते. त्यांना नमस्कार करताच भरभरून तोंडभरून आशीर्वाद मिळाला.”अगं, ते पाकीट दे तुझ्या कडं ठेवायला दिलंय ते.”, मामांनी सुमनमामींना सांगितले. मामींनी दिलेलं पाकीट पर्स मध्ये ठेवतच होते तोच मामा म्हणाले,
“अगं, उघडून बघ ना बाळ.”
मामी हसून म्हणाल्या, “हो ना, काय आहे त्या पाकिटात मलाही माहित नाही. तुझ्या मामांनी बघू दिलंच नाही.”
सुमन मामी नेहमी हसून बोलत.”अय्या! खरंच.” माझी उत्सुकता आता शिगेला पोहोचली. मी चटकन उघडलं पाकीट. अरे हे काय? उघडंच तर होतं ते. आतून एक फोटो बाहेर आला. तो बघून माझ्या हातातलं ते रिकामं पाकीट गळून पडलं. तो फोटो दोन्ही हातात अलगद धरुन मी मामींच्या शेजारी बेडवर बसले. दोघींच्या डोळ्यात पाणी आलं. गळा भरुन आला. ओठांवर मात्र किंचितस स्मित होतं.
फोटो माझ्या लग्नातला होता. कार्यालयात शालू नेसून बसलेली मी आणि माझ्या शेजारी माझी आजी. . . . हा फोटो कुणी काढला ? मला कळलंच नव्हतं तेंव्हा. नानांनी तो जवळपास दहा वर्षे सांभाळून ठेवला. इतका आनंद झाला म्हणून सांगू. आठवणी फेर धरुन नाचू लागल्या.
नऊवारी नेसणारी, उंच, कृश, गोरी आजी. तिचा सात्त्विक साधा चेहरा. घट्ट दुमडलेली लहान, नाजूक जिवणी. मऊसूत, गुलाबी सायीचे हात.मी एकदा खेळताना जोरात आपटले होते. हातपाय मोडले नाहीत, पण त्यांनी काही दिवस अस्मादिकांशी असहकार पुकारला होता. याच हातांनी तेंव्हा माझे दात घासले होते.. . . फोटोतून माझ्याकडं बघून हसणारे तिचे डोळे एकदा माझ्यासाठी रडले होते. फॅशन च्या नावाखाली लांब केस कापून मी घरी गेले तेंव्हा. तशी हळवी वाटणारी आजी; कृष्णाच्या, रामाच्या गोष्टी रंगवून सांगताना, आयुष्याचं तत्त्वज्ञान सहज सांगून जात असे ती. किती रविवार गेले तिच्या बरोबर रेडिओ वरची प्रवचनं ऐकण्यात. जास्त करुन तिच्या तल्लीन चेहऱ्यावरील भक्ती निरखण्यात. तिची भक्ती श्रीकृष्णावर आणि माझी तिच्यावर. नारळ कसा खवणावा इथंपासून ते पुरणपोळी जिभेवर विरघळण्यासारखी झाली पाहिजे पर्यंत स्वैपाकघरातल्या खास टिप्स तिनं दिल्या. याबरोबरच व्यवहारज्ञान दिलं. नुसती डिग्री नको प्रोफेशनल डिग्री प्रत्येक मुलीनं घेतली पाहिजे या बाबतीत ती आग्रही होती. काम केल्यानं बोटं झिजत नाहीत, असं म्हणे ती.. पाय जमिनीवर ठेवा. . प्लेगच्या साथीत आई वडील, भाऊ गमावल्यामुळं की काय. . . नाती जपण्यात, भावनांची कदर करण्यात तिला समाधान लाभे.
. . . अशा कितीतरी गोष्टी तिच्याकडूनच शिकले.
इतकंच कशाला हसतमुख, प्रेमळ सुमनमामी आणि आमचे नानामामा यांची पहिली भेट तिच्याच घरी झाली. माझी आजी म्हणजे नानामामांची काकू. माझी आई आणि नाना मामा चुलत बहीण भाऊ. माझे हे मामामामी मेड फॉर इच अदर. नात्यातला गोडवा वानप्रस्थाश्रमापर्यंत टिकून राहिला होता. किंबहुना जुन्या मोरावळ्यागत मुरला होता. पण हे स्वतः तच गुरफटलेलं, रमलेलं जोडपं नव्हतं.काही माणसांना देव आनंद वाटण्यासाठी या जगात पाठवत असावा. समाधानाचा पिंपळ त्यांच्या अंगणात सदैव सळसळत असे. प्रसन्न चेहरा, प्रसन्न व्यक्तिमत्त्व, लाघव अशा स्वभाव वैशिष्ट्यांमुळे कुणालाही वश करत असत दोघं. सगळ्यांच्या आवडीनिवडी लक्षात ठेवून तशा गिफ्ट्स देण्याचा त्यांचा आग्रह असे . त्यात त्यांना परमानंद मिळे. त्यांच्या भेटीत आपुलकीचा ओलावा जाणवे. कोरडा व्यवहार न बघता, हिशेब न ठेवता, भावनेची कदर करणाऱ्या त्यांच्या भेटींनी कितीक रेशीम बंध गुंफले!!
पारिजातकाच्या फुलांच्या सड्यासारख्या आजोळच्या आठवणींनी मनाच्या अंगणात केशरसडा शिंपला. या स्मृती फुलांनी माझं मन सुगंधीत केलंय. महागड्या, मोठ्या, किंमती वस्तूंपेक्षा नानामामांनी दिलेला तो फोटो माझ्यासाठी अमूल्य आहे. आजीची आठवण जागवणारा तो फोटो मी मनापासून जपून ठेवलाय.
केतकीचं काय बिनसलं होतं, कोणास ठाऊक. सारखी भांडत असायची, भांडतच असायची कार्तिकबरोबर. पार डिव्होर्सपर्यंत पोहोचली होती मजल.
आताही रात्री घरी पोहोचायला उशीर झाला, तेव्हा कार्तिक खूप दमला होता. जेवण्याचंही त्राण नव्हतं त्याच्यात. पण मग “तू बाहेरून खाऊन आला आहेस.घरात बनवलेलं वाया जातं…..”वगैरे म्हणत केतकी भांडायला सुरुवात करणार, म्हणून तो जेवायला बसला.
“तू जेवलीस?” तोंडातून शब्द निघाल्यावर त्याच्या लक्षात आलं की आपण घोडचूक केलीय.
“मी तुझ्यासाठी थांबायचं सोडून दिलंय हल्ली. तू काय? मनात आलं, तर बाहेरूनच खाऊन येणार. बायको थांबली असेल जेवायची……”
केतकीची बडबड चालूच होती.
शेवटी असह्य झालं, तेव्हा कार्तिकचंही तोंड उघडलं, ” पुरे आता. गप्प बस. दमून घरी यावं, तर…… “
“मग यायचं ना वेळेवर. उशिरापर्यंत बाहेर वेळ काढत बसलं की…..”
” बाहेर वेळ कसला काढणार? ऑफिसमध्ये चिक्कार काम असतं. त्यामुळे थांबण्याशिवाय गत्यंतरच नसतं. “
” हो, हो. कशी असणार? लाडावलेली मुलगी तू. एकुलती एक म्हणून डोक्यावर बसवून ठेवलंय आईवडिलांनी. “
“मला अगदी कंटाळा आलाय, तुझी कुजकट बोलणी ऐकायचा. केव्हा एकदा त्या डिव्होर्सच्या फॉर्मॅलिटीज कम्प्लिट होतायत, असं झालंय.”
“पण तू तुझ्या आईबाबांना सांगितलंस का हे?”
“तू मला विचारत असतोस सारखा, ते तू तुझ्या घरच्यांना सांगितलंस का?”
“माझ्या घरच्यांना काय, नंतर सांगितलं तरी चालेल. इन फॅक्ट, एवढ्यात मी सांगणारच नाहीय त्यांना. तुझी गोष्ट वेगळी आहे. तुला माहेरी जाऊन राहायचं आहे. आणि तिथे राहायला जाण्यापूर्वी सगळ्या गोष्टी तुझ्या आईबाबांच्या कानावर घालणं आवश्यक आहे. पण तू तर टाळाटाळ करतेयस.”
“टाळाटाळ कशाला करणार?”
“मग का नाही सांगितलंस अजून? वरचेवर तर जात असतेस तिकडे.”
“या गोष्टी रागरंग बघून सांगायच्या असतात. कधी कोणी आलेलं असतं तिकडे, कधी बाबांची तब्येत बरी नसते, तर कधी आई नरमगरम असते.”
” हे तर चालूच राहणार ना. मला तर वाटतं, तुला रिकन्सिडर करायचं आहे. दॅट्स व्हाय यू आर बायिंग टाइम. “
“रिकन्सिडर माय फूट! उलट जेवढ्या लवकर तुझ्या कचाट्यातून सुटता येईल, तेवढं बरं. एक एक दिवस मोजतेय मी.”
“तेव्हा लग्नाच्या वेळीही मोजत होतीस एक एक दिवस.”
“माझ्यापेक्षा तुलाच जास्त घाई झाली होती तेव्हा.”
“मी मूर्ख होतो त्यावेळी.”
“होतो कशाला? अजूनही आहेस. अशा मूर्ख माणसाबरोबर आयुष्य नाही काढायचं मला. मध्ये ऍबॉर्शन झालं, तेव्हा खचून गेले होते मी. पण आता वाटतं, देव करतो, ते बऱ्यासाठी. उगीच त्या जिवाचीही परवड झाली असती.”
“…………..”
“उचकट ना आता तोंड. आता का गप्प बसलास?”
“मी क्रूर नाहीय तुझ्यासारखा, असल्या गोष्टीचा आनंद व्हायला.”
रोजच्यासारखं हे भांडण रात्री 2-2.30पर्यंत चाललं असतं. आणि मग कंटाळून कार्तिक गेस्टरूममध्ये झोपायला गेला असता. रोजच्यासारखाच.
(मागील भागात आपण पाहिलं-त्यांनी जाई ही स्वतंत्र कादंबरी लिहिली. त्याचाच पुढचा भाग मेनका लिहिली. अनुपा, अभुक्ता, दिग्या शा अनेक कादंबर्या त्यांनी पुढे लिहून प्रकाशित केल्या.- आता इथून पुढे ) —-
बा. द. सातोस्कारांची महत्वाची पुस्तके मात्र सागर साहित्यानी नाही, ‘शुभदा सारस्वत’चे प्रकाशक, गोगटे यांनी काढली आहेत. ही पुस्तके केवळ लेखक सातोस्कर यांची नाहीत, तर लेखक आणि संशोधक सातोस्करांची आहेत. ‘मराठी मासिकांचे पहिले शतक’ हे त्यांचे पुस्तक १९८६ साली प्रकाशित झाले. हे पुस्तक माहितीपूर्ण आहेच, पण संदर्भ साहित्य म्हणूनही उपयोगी आहे. गोमंतकीय मराठी साहित्याचे आधुनिक शिल्पकार हे पुस्तक ‘सागर साहित्या’ने ७५साली काढले. अर्वाचीन गोव्याचा इतिहास त्यांनी ३ खंडात लिहिला आहे. त्यांचे सर्वात महत्वाचे संशोधनपर पुस्तक म्हणजे गोमंतक प्रकृती आणि संस्कृती – ३ खंड. हे ग्रंथ ‘शुभदा सारस्वत’ ने प्रकाशित केले आहेत . यात गोव्याचा प्राचीन इतिहास आहे, गोव्याचे प्राकृतिक वर्णन आहे. समाजव्यवस्था, लोकांची संस्कृती, सण , उत्सव सगळे आहे. या ग्रंथाचा पहिला खंड १९७९ साली प्रकाशित झाला. याला ‘केसरी मराठा संस्थेचा तात्यासाहेब केळकर पुरस्कार प्राप्त झाला होता. त्यानंतर प्रकाशित झाले, ते ’बादसायन’ हे त्यांचे आत्मचरित्र. हे आत्मचरित्र म्हणजे काही केवळ ‘बा.द. सातोस्कर’ यांचे स्वत:चे चरित्र नाही. त्याला गोव्याचे अस्तर आहे. गोमंतकीय समाज , तिथले लोकजीवन, तत्कालीन गोव्याचे वातावरण , गोव्याचा निसर्ग याला जोडून ते येते. ‘’बादसायन’ प्रकाशित झाले १९९३ मधे . ‘शुभदा सारस्वत’ नेच ते प्रकाशित केले. या दरम्यान त्यांनी रामायणाचा अभ्यास करून ‘अभिराम’ ही कादंबरी लिहिली. यावेळी त्यांचे वय होते ८० .त्याच अभ्यासातून पुढे ‘रामायणकालीन जमाती व संस्कृती असे एक छोटेखानी पुस्तकही लिहून टाकले.
१९८५ च्या दरम्यान दादा आजारी पडले. प्रकाशनासाठी करावी लागणारी दगदग त्यांना सहन होईना. आई आधीच गेली होती. मग त्यांनी ‘सागर साहित्य प्रकाशन’ बंद केले. ते शेवटचे माझ्या घरी आले, तेव्हा विषादाने म्हणाले होते, “ गोव्यात गेलो, तेव्हा दोन गोष्टी डोळ्यापुढे होत्या. मराठी हीच गोव्याची भाषा आहे, हे सिद्ध करायचे. आणि भाषिक व सांस्कृतिक एकतेच्या आधारावर महाराष्ट्र आणि गोवा यांचे एकीकरण घडवून आणायचे.” पण त्यांना हे शक्य झालं नाही, आणि याची बोच त्यांनी कायमची आपल्या काळजात वागवली.
पुढे माझ्या बहिणीने- लताने गोव्यातलं आपलं बिर्हाड – बाजलं हलवून पुण्याला मांडलं. मग गोव्यात जाणं झालंच नाही. नंतर दादा अर्धांगाने आजारी असल्याचे कळले. आई आधीच गेली होती. दादांना भेटून यावं, असं खूप मनात होतं. पण त्यांना भेटायला जाणं नाहीच जमलं. नंतर दादा गेल्याचीच बातमी पेपरमध्ये वाचली.
दादा म्हणजे, प्रकाशक, लेखक, संपादक, संशोधक, गप्पिष्ट, माणसांचे लोभी, कृतिप्रवण अशा व्यक्तिमत्वाच्या विविध पैलूंनी झळझळणारे लोलकाचे लखलखते झुंबर. ते मालवलं आणि गोव्याचं माझं माहेरही सरलं —-
आज गौराईचे विसर्जन . प्रत्यक्ष जगत्जननी माहेरपणाला आली होती . तीन दिवस तटस्थ व्रतस्थपणे उभी होती . माझे घर न्याहाळत होती . नुसत्या कुंकवाचा तिलक लावल्यामुळे किती तेजस्वी व प्रसन्न दिसत होती . घरभर फिरली . दृश्य अदृश्य गोष्टी पाहात होती . अगदी तिच्या स्वागतासाठीचा माझा आटापिटाही तिने पाहिला असेल . मी केलेल्या पाहुणचाराने ती खूश झाली असेल ना ! आज तिने निरोप घेतला . तरीही तिच्या अस्तित्वाचा सुवास सुगंध घरभर दरवळत आहे . माझ्या मनातही तो रेंगाळून राहिला आहे . गौराईचा निरोप घेताना डोळे भरून तर येतातच . आरती मधील शेवटच्या कडव्यांचे उच्चारही कधी कधी नीट होत नाहीत . मन भरून येते .
चतुरानने कुत्सित कर्माच्या ओळी॥
लिहिल्या असतील माते माझे निज भाळी॥
पुसोनि चरणातळी पदसुमने क्षाळी ॥
मुक्तेश्वर नागर क्षीरसागरबाळी ॥
हे आई , माझ्या नशिबात सर्वच कुशल मंगल असणार नाही हे मी जाणते . पण तू माझ्याजवळ असलीस तर सर्व अमंगल आपोआप पुसून जाईल . प्रथम आम्हाला स्वतःमधील वाईट गुणांचे , वाईट सवयींचे विसर्जन केले पाहिजे . चराचरातील प्रत्येकाकडे सहृदयतेने पाहिले पाहिजे . तूच दिलेल्या दिव्य शक्तीची आम्हाला जाणीव झाली पाहिजे .
‘ थोडी श्रद्धा व विश्वास माझे ठायीं ठेवा म्हणजे या संसाररूपी खेळात तुम्हाला आनंद मिळेल,’ असेच काही तू सांगत होतीस ना !
खरेच आई आज थोडे थोडे कळते आहे . जीवनातील हा संसाररूपी खेळ म्हणजे एक श्रेष्ठ शाश्वत सत्य आहे . या सृष्टीत माणसाने सुखाने जगावे म्हणून तू किती भरभरून दिले आहेस . तुझी प्रत्येक निर्मिती रसपूर्ण , सौंदर्य युक्त आणि परिपूर्ण आहे . पण आम्हाला हे समजून घेण्याला किती काळ जाईल कोणास ठाऊक ? चराचरात तुझ्यामुळे व्यापून असलेला आनंद आम्हाला कधी ओळखता येणार ? भरभरून देण्यामधले समाधान आम्हाला कधी कळणार ? केवळ ममतेने जग जिंकता येते हे कधी अनुभवता येणार ? प्रत्यक्षात पृथ्वीतलावर स्वर्ग लोकाची अनुभूती येईल असा सुदिन लवकर येवो, म्हणजे तुझ्या आरतीचा अर्थ खऱ्या अर्थाने आम्हाला कळेल .