सूचना/Information 

(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)

? श्री सुहास रघुनाथ पंडित – अभिनंदन ?

💐 संपादकीय निवेदन 💐

आपल्या समूहाचे साक्षेपी संपादक, चतुरस्त्र लेखक आणि कवी श्री सुहास रघुनाथ पंडित यांचा … “ प्रेम रंगे, ऋतूसंगे “ …  हा दुसरा काव्यसंग्रह आज प्रकाशित होतो आहे.

💐श्री. पंडित यांचे आपल्या सर्वांतर्फे अगदी मनःपूर्वक अभिनंदन, आणि उत्तरोत्तर त्यांच्या हातून अशीच दर्जेदार साहित्य-निर्मिती होत राहू दे अशा असंख्य हार्दिक शुभेच्छा !!💐

हा प्रकाशन समारंभ सांगलीमध्ये संपन्न होत आहे, त्यामुळे सांगलीतील काव्य-रसिकांसाठी या कार्यक्रमाची माहिती देणारी पत्रिका  —

या नव्या संग्रहातली एक नवी कोरी सुंदर कविता आपल्या सर्वांसाठी सादर —

? शब्दरंग… ?

कुंचल्याचे रंग ओले उतरले शब्दांतून

रंग शब्दांतून फुलले कल्पनांचे पंख लेऊन

मोरपंखाची निळाई  पसरली ओळींतून

पाखरांची पाऊले ही खुणविती पंक्तीतून

पुष्पगुच्छांच्या परि ही जोडलेली अक्षरे

झेप घेती शब्द  जैशी आसमंती पाखरे

शब्दवेलीतून फुटते कल्पनेला पालवी

स्पर्श  होता भावनांचा अर्थ  भेटे लाघवी

गर्भितार्थाच्या  गुहेतून अर्थवाही काजवे

गंधशब्दांतून  येती जणू फुलांचे ताटवे

प्रकृतीच्या हर कृतीतून गीत जन्मा ये नवे

अंतरंगातून उडती शब्द  पक्ष्यांचे थवे

रंगले हे शब्द आणि शब्दांतूनी  रंगायन

शब्द  आणि रंग यांचे अजब हे रसायन

कुंचला  की लेखणी ? मी धरू हातात आता

शब्द  फुलले,रंग खुलले,मी अनोखे गीत गाता.

सुहास रघुनाथ पंडित 

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

संपादक मंडळ, ई-अभिव्यक्ती (मराठी)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments