श्री शेखर किसनराव पालखे

☆ साप्ताहिक स्तम्भ – शेखर साहित्य # 7 ☆

☆ हा तुझा एकटीचा प्रवास  ☆

हा तुझा एकटीचा प्रवास

एकटीचा नाहीये बाळा

साताठशे मैलांचा जो

तू पित्यासह केलेला-

हा आहे एक चिरंतन प्रवास

जो जीवनाकडून जीवनासाठी जीवनाकडे झालेला—

शेकडो मैलांच्या या प्रवासात भेटली तुला ती होती सर्व

मेलेली माणसे-जी

मेलेल्या नजरेनेच तुला  न्याहाळत होती षंढपणे …

अशी सणसणीत चपराक तुझी

त्यांच्या ही कानाखाली

ज्यांची लाचार पत्रकारिता

नाचली फुटपाथच्या भवताली

अशी असावी जिद्द-

असावा असा कणखरपणा

आमच्याकडे का नसावा

एवढा मजबूत कणा?

इतकी प्रखर जीवनआस

कुठून बरं येते?

जन्मदात्यालाही जन्म द्यायची

ताकद कुठून येते?

दूर देशीच्या ‘राज’ कन्येनं

या ‘देश’ कन्येचं कौतुक करावं

आणि इथल्या बेशरम प्रजेला

हे अगदी उशिरा कळावं?

गर्भातल्या उमलत्या कळ्यांना

गर्भातच खुडणाऱ्यांना

आतातरी यावं आत्मभान

‘दिवट्या’ पेक्षा ‘ज्योती’ बरी

यातच सुचावं शहाणपण

अशी सणसणीत चपराक

ज्याची वाट बघावी

की आठवणीने आपली आपण रोज मारून घ्यावी?

 

© शेखर किसनराव पालखे 

पुणे

25/5/20

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

1 Comment
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Shekhhar Palakhe

This poem was dedicated to the girl Jyoti who took her sick father on a bicycle from Gurgaon Haryana to her native place Bihar.Hats off to her!!!