सुश्री प्रभा सोनवणे

? कवितेच्या प्रदेशात # 131 ?

☆ निवांत क्षण… ☆

(वृत्त- पृथ्वी)

कसे उमलणे फुलास कळते नसे आरसा

कुणा समजले तुरूंग बनली कशी नर्मदा

तुला जमतसे स्वतःत रमणे सदासर्वदा

 

फुले बहरती तशीच सुकती असा जीव हा

मला  समजले तुला उमगले  तरी दूर का

तुझे परतणे असे  बहरणे नसे हा गुन्हा

असेच जगणे निखालसपणे मिळे ना पुन्हा

 

कशात असते कुणास मिळते इथे शांतता

परी बरसते उगा तरसते मनी भावना

सदैव करते तुझ्याच करिता अशी प्रार्थना

तुलाच सगळी सुखे अन मला मिळो आर्तता

 

 जगात असते असेच गहिरे अथांगा परी

मनी विलसते तिथेच फुलते  जपावे तरी

नसे कळत का तुला चिमुकल्या मनाची व्यथा

मिळेल जर ना निवांत क्षण तो हवा एकदा

 

© प्रभा सोनवणे

संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments