सुश्री प्रभा सोनवणे
कवितेच्या प्रदेशात # 275
☆ नाणं… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆
☆
आयुष्य– एक चलनी नाणं!
इतके दूरवर चालून आल्यावर,
मागे वळून पहाताना,
आठवतात सारे सारे क्षण,
घडून गेलेले—-
किती निरागस बालपण,
भल्यामोठ्या घरातलं!
किशोरवयीन कालावधीत,
तू भेटलीस सखे—-
सुंदर, फुलपंखी दिवस अनुभवले,
काही गवसले, काही निसटले,
तू आणि मी,
एका नाण्याच्या दोन बाजू!
गेलीस निघून,
न परतीच्या वाटेवर!
तेव्हापासून माझं नाणं,
खोटंच झालंय,
आणि मी ही….
नाही प्रयत्न केला….
ते चलनी नाणं बनवायचा!
☆
© प्रभा सोनवणे
संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार
पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011
मोबाईल-९२७०७२९५०३, email- sonawane.prabha@gmail.com
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈