सुश्री प्रभा सोनवणे

? कवितेच्या प्रदेशात # 272 ?

☆ अर्थ नाही… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

 

त्यागुन इथे सुखाला जगण्यात अर्थ नाही

मारुन मना विरक्ती धरण्यात अर्थ नाही

 *

माझी मला कळाली गलतीलगेच येथे

तक्रार तू नव्याने करण्यात अर्थ नाही

 *

आता नका तुम्ही त्या सांगू जुन्याच गप्पा

भातासवे कढी तीचरण्यात अर्थ नाही

 *

“झाली बुलंद शेते” गावात बोलबाला

कोणी उगाच आता कसण्यात अर्थ नाही

 *

जो तो इथे शहाणा पंडीत जाहला की

गझला पुन्हा नव्याने रचण्यात अर्थ नाही

© प्रभा सोनवणे

संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार

पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments