सुश्री प्रभा सोनवणे

? कवितेच्या प्रदेशात # 237 ?

☆ सागर आणि लाटा ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

लोक किल्ले बांधती वाळूत, बांधो बापडे

सागरामध्ये स्वतःच्या मस्त तरले आजवर

प्रभा 🌊

? ☆ सागर आणि लाटा ☆ ?

☆  

अथांग निळ्याशार समुद्राचं आकर्षण –

मनात खोलवर  ….

मग घरच उचलून आणलं सागरतिरी ….

सागरिकांबरोबर झुलणं हा एकच छंद!

त्या बेमुरव्वत लाटांची गाज

आणि बेधडक उसळण थेट घरापर्यंत!

मन सवयीचे गुलाम…

झेलत राहिले अविरत,

लाटांचे प्रहार !

रौद्र लाटांचे तांडव-

घराच्या छतापर्यंत ….

नाकातोंडात पाणी जाताच…

घराने दाखविला…

संकटकाळी बाहेर जाण्याचा मार्ग,

आणि सापडली जिवंत रहाण्याची दिशा!

घरही  आता खंबीर,

लाटांपासून दूर नेणारं,

सुरक्षित कवच बनून!

भल्या बु-याची जाण देणारं—तरीही निसटलेल्या क्षणांचा हिशोब मागणारं….

परखड…काहीसं कठोर,

पण अश्वासक!

प्रौढ अनुभवांनी मिळवलाय विजय–

मनातल्या चवचाल लाटांवर!

समोर सावध काठ  आणि किनारे,

लाटांकडे पाठ ,तरीही —

पाठराखण करतोच  आहे….

हा अथांग  अर्णव–समुद्र….सागर  !!!

☆  

© प्रभा सोनवणे

२५ जानेवारी २००७

संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

1 Comment
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Ram Sarvagod

Very Nice