श्रीमती रंजना मधुकरराव लसणे 

 ? आनंदाचं फुलपाखरू ?

 

(विगत दिवस आदरणीया श्रीमति रंजना जी को मशाल न्यूज़  नेटवर्क स्पर्धा में पुरस्कार के लिए अभिनंदन। आपने इस आलेख में  मेरे लिए सम्मान जाहिर  किया है  उसके लिए मैं आपका हृदय से आभारी हूँ। आप सभी साहित्यकार मित्रगणों  का स्नेह ही मेरी पूंजी है।  पुनः आपका अभिनंदन एवं  लेखनी को सादर नमन)

आज मशाल न्यूज नेटवर्कने घेतलेल्या स्पर्धेचा निकाल जाहीर झाला  आणि मला या स्पर्धेत दुसरा क्रमांक मिळाला . स्पर्धेला जाताना एक सादरीकरणाची संधी म्हणून गेले. प्रचंड तणाव  असताना सादरीकरण केले.  शुभांगी यशस्वी झाले. व्हिडीओ तयार झाला. त्याची  लिंक आली.

सुरुवातीला भीत भीत मित्र मंडळींना फॕमिली मेंबरला ती लिंक  शेअर केली ,हळूहळू शैक्षणिक समुह काव्य समुहात सुद्धा फिरू माझी कविता घराघरात वाजू लागली .भेटणारा प्रत्येकजण आवर्जून त्या बद्दल बोलू लागला , आणि नकळत आयुष्यातील चाळीशीचे वळण आठवले. या वयात जवळपास आपली मुलं साधारणपणे मोठी झालेली असतात . अगदी दहा  पंधरा वर्षे आई आई करत मागेपुढे घुटमळणारी मुलं शिक्षण, नोकरीच्या निमित्ताने एकाएकाने दूर जाऊ लागतात.

सुरूवातीला शरीराने आणि हळूहळू मनाने कार्यक्षेत्र  बदलते  चर्चेचे विषय बदलतात. बरेच वेळा आपल्याला  त्यांची चर्चा  समजत ही नाही मग मुलं बाबांशी, मित्रांशी थोडीफार चर्चा करतात, त्यांचा सल्ला घेतात, ही गोष्ट सुद्धा मनाला  नक्कीच खटकत असे .

आज पर्यंत आपल्या आवडीने कपडेलत्ते खाणे पिणे करणारी मुलांना मित्र, मैत्रीणींचा , सल्ले घ्यावे लागतात हे पाहून कुठतरी चुकल्या सारखं वाटे. प्रत्येक बाबींवर मनसोक्त चर्चा करणारी मुलं मित्रांना फोनवर नंतर बाहेर आल्यावर बोलू म्हणतात, पुरणपोळी खीर आवडीने खाणारी मुलं पिझ्झा बरगर आवडीने खातात आणि कुठेतरी नवरा देखील त्यांना साथ देतो  ही  आशा अनेक गोष्टी ज्या    आजवर फक्त आपल्या मनाप्रमाणे चाललेल्या होत्या त्यात बदल झालेला असतो कुठेतरी आपल्या हातातून सत्ता निसटून जात आहे  पेक्षा आता आपली कुणालाही गरज राहिली नाही ही भावना  अंतरंगात डोकावत असते . आपण एकटे पडत चालल्याची जाणीव वाढायला लागते. यातून चिडचिड वाढायला लागते आणि घरातील माणसे  दुरावत जातात . कारण आपल्या चिडण्या पेक्षा आपल्या पासून दूर राहाणेच योग्य असे त्यांना वाटायला लागतं.

अगदी जीवन नकोस वाटायला लागले . रिकामा वेळ खायला ऊठला. ज्या मुलांसाठी घरासाठी आपण रात्रीचा दिवस करतो. स्वतःची प्रकृती, शिक्षण छंद कशाचा ही विचार केला नाही परंतु आज मात्र हळूहळू चित्र बदलताना दिसत होतं मन खट्टू झालं.

थोडंस थांबून  शांतपणे विचार केला. आपलं तरूणपण आठवले. हवेत तरंगणारे दिवस आठवले. आणि आर्धी चिडचिड नक्कीच कमी झाली .  लक्षात आले की या घराला सावरण्यात आपल्याला स्वतःसाठी करावयाच्या कितीतरी गोष्टी राहून गेलेल्या आहेत अनेक छंदांना आपण तिलांजली दिली होती.

आता आपल्याकडे भरपूर वेळ आहे. मग कुरकुरत कशाला बसायचं ऊठा लागा कामाला . मुख्य म्हणजे रडणारी आणि चिडणारी माणसं कुणालाही आवडत नाहीत त्यामुळे आता स्वतःसाठी जगायचं असं मनाशी ठरवलं . अगदी वयाच्या बेचाळीसाव्या वर्षी बी.  ए. फायनलचा फॉर्म भरला तेही इंग्रजी ऐच्छिक घेऊन आता आपल्याला झेपेल का भीती होती परंतु जमलं.पुढे बी. एड . सुद्धा केले. गल्लीत महिला बचत गट सुरू केला .यातून बऱ्याच महिलांना शिलाई मशीन मिर्ची पल्वलायझर, शेवयाची मशीन , छोटी गिरणी, छोटे लेडीज एम्पोरियम सुरू करणे अशी अनेक छोटी मोठी कामे यातून सुरू करण्यात आली. मुख्य म्हणजे रिकामा वेळ सार्थकी लागला. नोकरी आणि घर या कसरतीत मैत्री हा प्रकार जीवनातून जणू हद्दपारच झाला होता, तो पुन्हा सापडला .

कामासाठी का असेना पण अनेक जणींशी गप्पागोष्टी वाढल्या आणि एकटेपणा पळून गेला. आठवड्यातून एकदा गुरूवारी व एकादशीला सत्संगाच्या निमित्ताने रात्री एकत्र जमायला लागलो . भजनाच्या निमित्ताने जुना संगिताचा छंद डोकावू लागला वीस वर्षे माळ्यावर ठेवलेली हार्मोनियम खाली आली. नकळत सूर जुळायला लागले. शिक्षणोत्सव सर्व शिक्षा अभियानाच्या निमित्तानं शैक्षणिक साहित्य निर्मिती करणे शैक्षणिक साहित्य जत्रेत स्टॉल लावणे, इत्यादीमुळे बाजुला सारलेली चित्रकला पुन्हा उपयोगात आली . ओळखीच्या मोठ्या मुली शिवण काम शिकवणे, रुखवताचे साहित्य शिकवणे, अशा अनेक गोष्टी त्याही विनामूल्य असल्यामुळे सहाजिकच अनेकजणी जवळ आल्या जगण्याचा सूर कुठेतरी गवसला आनंदाचे वारे पुन्हा वाहू लागले.

यात भर पडली ती स्मार्ट फोनची whats app सुरू झाले सुरूवातीला मैत्रीणींचे समुह नंतर शैक्षणिक समुह जॉईन केले. उत्तम सादरीकरणामुळे अनेक समुहात संचालिका म्हणून कामाची संधी मिळाली. आणि अचानक एक दिवस काव्य समुहाची लिंक मिळाली.समुह जॉईन केला आणि पंचवीस वर्षापूर्वीचं कवी मन नकळत जागे झाले. हा कदाचित दैवयोग असेल परंतु मला या समुहात सुद्धा संचालिका म्हणून काम करण्याची संधी मिळाली . आयुष्यात कधी काव्य संमेलन पाहायला जाण्याचं सुद्धा स्वप्न न पाहिलेली मी परंतु नागपूर शिलेदार समुहाच्या संमेलनात कविता सादरीकरणाची संधी मिळाली आणि खूप आनंद झाला . राज्यस्तरीय समुहातून अनेक कवी कवयित्रींची ओळख झाली .आणि स्वतःचे समुह तयार केले . दररोज लेखन वाढले .

अनेक दिग्गज लेखक कवी कवयित्रींच्या ओळखी झाल्या कवी संमेलनातील सहभाग वाढला आणि आत्मविश्वास सुद्धा वाढला . यातच मशाल न्यूज नेटवर्क ने काव्य स्पर्धा ठेवली आणि गुपचूप लिहिणारी मी नकळत घराघरात पोहचले. या स्पर्धेत सुद्धा राज्यात दुसरा नंबर मिळाल्या मुळे झालेला आनंद नक्कीच शब्दात व्यक्त करणे अशक्य आहे.

दरम्यानच्या काळात हेमंतजी बावनकर यांच्या वेबसाईटवर ब्लॉक लेखिका म्हणून लेख कथा लेखनाची संधी मिळाली. आयुष्यातील पन्नास वर्षात अनुभवलेले अनेक अनुभव नकळत कागदावर उतरायला लागले.मुख्य म्हणजे हेमंतजींच्या प्रोत्साहनामुळे लेखनास चालना मिळाली.

आज मला प्रश्न पडला की आयुष्यात एवढं भरभरून करण्यासाठी बरच काही असताना आपण म्हातारे झालो . आपली कुणाला गरज नाही या विचाराने कुढत का बसावं आपले ज्ञान अपडेट करा . भरपूर वाचन करा ,जमेल तसे लेखन करा. भरपूर व्यायाम करा. तुमच्याकडे इतरांसाठी वेळ नाही हे लक्षात आल्यानंतर घरातल्यांना सुद्धा तुमची किंमत कळेल . मुख्य म्हणजे हे सर्व हसत खेळत करा.

आयुष्यातील या वळणावर जसा जसा वेळ मिळत जाईल तसे तसे एकेक उपक्रम वाढवत जा म्हणजे आयुष्यातील ही पोकळी जाणवणार नाही . मुख्य म्हणजे रडणारी आणि चिडणारी माणसं कुणालाही आवडत नाहीत त्यामुळे संयमाने वागा. लहानात लहान , तरूणांत तरूण होऊन वागावं आपलीच रट लावून धरता.

आपण इतरांचे जर  ऐकायला शिकलो तर  पाहा जे आनंदाचे फुलपाखरू पकडण्यासाठी तुम्ही अकांड तांडव करत होतात . ते फुलपाखरू नकळत तुमच्या खांद्यावर येऊन बसेल अगदी सहजपपणे . . . . !

एक आनंदी सर्व समावेशक समाजशील प्रौढत्व आकाराला येईल जे अगदी प्रसंन आणि परिपूर्ण असेल.

 

©  रंजना लसणे✍

आखाडा बाळापूर, जिल्हा हिंगोली

9960128105

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

11 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Ranjana lasane

मनःपूर्वक धन्यवाद आदरनिय हेमंतजी आपण दिलेली कौतुकाची थाप नक्कीच मला सतात नवीन प्रेरणा देत असते.

महेश मोरे (स्वच्छंदी)

आदरणीय रंजनाताई,
आयुष्यातलं वळणानंतरचं वळण फार सहजतेनं मांडलंय तुम्ही या लेखात.
ज्या वयात सर्वसामान्य गृहिणी ‘आता काय करायचं’ या प्रश्नात अडकलेल्या असतात त्या वयात आपण लेखणी हातात धरलीत आणि आजवर जे काही अनुभवलंय ते शब्दांमध्ये उतरत आहात,व्यक्त होत आहात….
आपल्या लिहित्या मुक्त हाताला शब्दांचंही तितकंच पाठबळ लाभत राहो हीच सदिच्छा……

Ranjana Lasane

मनस्वी धन्यवाद महेश दादा आपलं मार्गदर्शन आणि प्रेरणा असेल तर लेखणी नक्कीच देखणी होईल

आरती गंगावणे

खुप छान अनुभव मांडलेत ताई,आजवर तुम्ही जे अनुभवलं ते किती सहज आणि सरळ शब्दात मांडलेत तुम्ही.तुमचे हे विचार आमच्यासाठी प्रेरणादायी आहेत.

Ranjana Lasane

मनःपूर्वक धन्यवा बेटा. मी फक्त अनुभव शब्दांत मांडण्याचा प्रयत्न केला.

अभिनंदन मॅडम
तुम्ही खरच खुप सुंदर कविता केली आहे
तुमचा हा छंद दिवसेंदिवस वाढत जावो.
आणखी सुंदर अस काव्य निर्मिती तुमच्या हातून होवो
ही हृदयापासून सदिच्छा.?????????

रंजना लसणे

मनःपूर्वक धन्यवाद दादासाहेब आपले आशीर्वाद असतील तर नक्कीच बहरेल

Ranjana Lasane

मनःपूर्वक धन्यवाद दादासाहेब

श्रीमती जोशी रजनी लातूर

आदरणीय मा
सस्नेह नमस्कार
तुमचा आनंदाचे फुलपाखरू हा लेख अतिशय प्रेरणादायी आहे. आपण आपले विचार अगदीच थोडक्यात आणि मार्मिकपणे मांडले आहेत निश्चितच ते सर्व भगिनीसाठी मार्गदर्शक ठरतील यात काही वेळशंकाच नाही. आपल्या पुढील कार्यास खुप खुप शुभेच्छा

Jakapure kiran

अभिनंदन ??. आपल्या पुढील कार्यास खुप खुप शुभेच्छा. हा लेख खूप अप्रतिम आहे. खरच खुप सुंदर अनुभव कथन केलात. पुनश्च एकदा अभिनंदन ? ? ??

नीता कुलकर्णी

लसणेमँडम तुमचे हार्दिक अभिनंदन. या लेखामुळे तुमच्याकडे असणाऱ्या कल्पनाशक्ती व कर्तृत्वशक्तीची माहिती झाली. तुमच्या साहित्यिक वाटचालीसाठी आणि सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या प्रत्येक कार्यासाठी शुभेच्छा.-नीता कुलकर्णी