श्री आशिष  बिवलकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

?– रक्षाबंधन… – ? ☆ श्री आशिष  बिवलकर ☆

दगडांच्यात आयुष्य,

दगडाचा बसायला पाट !

पारणं डोळ्यांचं फिटलं ,

पाहून रक्षाबंधनाचा थाट !

रस्ता बनवता बनवता,

मुलं बाळं वाढती रस्त्यावर !

सणवार त्यांनाही असतात,

पण हक्काचे कुठे नाही घर !

विंचवासारखे बिऱ्हाड,

फिरे गावोगाव पाठीवर !

पोटासाठी मोलमजुरी,

नशिबाने बांधल्या गाठीवर !

रंक असो वा राव ,

भावा बहिणीत तेवढीच ती ओढ !

आपल्या आपल्या परीने ते,

साजरा करती सण आनंदाने गोड !

राखीचा धागा,

सोन्याचा असो वा रेशमचा !

मनगटाला शोभे,

भाव दोघांच्या मनी आपुलकीचा !

औक्षणाचे ताट  नसले तरी,

नेत्रज्योतीने बहीण करते औक्षण !

रक्षण कर छोट्या भाऊराया,

तुझे प्रेम तिच्यासाठी जगी विलक्षण !

चिंधी बांधे द्रौपदी,

हरी धावला तिच्या रक्षणाला !

रक्ताचे नव्हते नाते,

जागला चिंधीच्या बंधनाला !

© श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments