श्री सुहास रघुनाथ पंडित

? कवितेचा उत्सव ?

☆ जाणा-या पावसाकडे पाहून ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

 

खुळ्यासारखा ,जाता जाता,कोसळला आज पुन्हा

जाता जाता सोडून गेला ,पाऊस हिरव्या गर्द खुणा //

 

येताना हा असाच आला,सारे काही धुऊन गेला

येणे जाणे विसरू नका हो,किती सांगतो कुणा कुणा

जाता जाता सोडून गेला पाऊस हिरव्या गर्द खुणा /1/

 

ओली चिंब झाडे झुडपे,अंगावरती थेंब टपोरे

तनासंगती मनास अपुल्या भिजवून गेला पुन्हा

जाता जाता सोडून गेला पाऊस हिरव्या गर्द खुणा//

 

गाशील तू जर विरह तराणे,तरीच होईल माझे येणे

पाठ वळविता, आठवणीचा धरतीला निरोप देई जुना

जाता जाता सोडून गेला पाऊस हिरव्या गर्द खुणा//

 

पुन्हा एकदा येई दुरावा,तरीच मिळतो शालू हिरवा

सृजनशक्तिचा घेऊन येईल तिजसाठी नजराणा

जाता जाता सोडून गेला पाऊस हिरव्या गर्द खुणा//

 

खुळ्यासारखा,जाता जाता, कोसळला आज पुन्हा 

जाता जाता सोडून गेला, पाऊस हिरव्या गर्द खुणा//

 

©  श्री सुहास रघुनाथ पंडित

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments