श्री सुहास रघुनाथ पंडित

? कवितेचा उत्सव ?

☆ आमुची लिपी – कवी : सोपानदेव चौधरी ☆ प्रस्तुती : श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

 

लिपी आमुची नागरी । स्पष्ट उच्चारांचे वर्ण ।

महाराष्ट्रीयां  लाभली । वाणी तैसी ही संपूर्ण ।।

 

नसे उच्चारांची व्याधी । नसे लेखनात अढी । 

जात धोपट मार्गाने । स्वर-व्यंजनांची जोडी ।।

 

अहो, हिची जोडाक्षरे । तोड नाही त्यांना कुठे । 

उच्चारातली प्रचीती । जशी ओठांवरी उठे ।।

 

जैसे लिहू तैसे वाचू । जैसे बोलू तैशा खुणा ।

जे जे लेखी तेच मुखी । ऐसा मराठीचा बाणा ।। 

 

सर्व उच्चारांचे शोधा । शास्त्रज्ञांनो, यंत्र एक । 

तेच दिसेल तुम्हाला । महाराष्ट्रीयांचे मुख ।। 

 

नाद-ध्वनी उच्चारांना । देत सदा आवाहन । 

लिपी ऐसी ही प्रभावी । माझ्या भाषेचे वाचन ।। 

 

कवी : सोपानदेव चौधरी 

प्रस्तुती : श्री सुहास रघुनाथ पंडित

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments