कविराज विजय यशवंत सातपुते

? कवितेचा उत्सव # 249 – विजय साहित्य ?

☆ दृष्टी…!

 

निसर्गाची दृष्टी ,

देई रवी जगताला ‌

जाग सृजनाला,

पदोपदी…! १

 *

वात्सल्याची दृष्टी ,

जणू मायबाप हाक.

नजरेचा धाक,

लेकराला…!२

 *

वासनेची दृष्टी

जोड व्यसनांची जडे

घरदार रडे

रात्रंदिस…!३

 *

आंधळ्यांची दृष्टी ,

दृकश्राव्य तिची भाषा .

जगण्याची  आशा ,

वागण्यात…!४

 *

कवितेची दृष्टी ,

तिचा सर्वत्र संचार .

व्यासंगी विचार ,

लेखनात…! ५

 *

दृष्टीहीन जन ,

लोटू नका दूर

गवसेल सूर ,

जीवनाचा…!६

 *

कलाकार  दृष्टी ,

तिचा सार्‍याना आदर .

होतेस सादर ,

रगमंची…!७

© कविराज विजय यशवंत सातपुते

सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  8530234892/ 9371319798.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments