कविराज विजय यशवंत सातपुते

? कवितेचा उत्सव # 198 – विजय साहित्य ?

☆ विचारढंग… ☆ कविराज विजय यशवंत सातपुते  ☆

आपलं अनुभव विश्व संपन्न करणारा

आपल्या जीवनाचा कोरा कागद

चारही कोपऱ्यातून‌ अनुभव‌संपन्न होत जातो.

जन्मापासून या कागदांवर

अगदी..आपली पावलं उमटली

तेव्हा पासून हा कागद…

अंगवळणी पडलाय..

पहिली काहि वर्षे…

याने टिपकागदासारखं

टिपून घेतलं आपल्याला..;

आपलं उनाड बालपण…!

तरूणपणात मात्र ..

का कोण जाणे…?

गुलाबी होत गेला …

सुवासिक फुले जपत गेला

दोन शब्द प्रेमाचे खुलवत गेला

हा अबोल कागद…!

प्रौढपणी मात्र…

उन्हाळे पावसाळे झेलताना

गुलाबी, रूपेरी, सोनसळी

अनेक रंगात रंगत गेला…

आणि आज या कागदानं. ….

हट्टच धरलाय..म्हणतोय…

“अनुभवांची अक्षरे

चाळ जरा..

बघ मागे वळून..

आणि वाच मला…

तुझ्या कक्षा रुदावल्यात…

तू आता माणूस

वाचायला शिकलांस

माणूस जोडायला शिकलांस

लिहून जा असं काही

सुख दुःख काही‌बाही..

दोन शब्द अनुभवी

पुढच्या पिढीला द्यायला हवे

मनमोकळे करताना…

नव्या उमेदीने जगायला हवे

होय..कागदाचं म्हणणं

तंतोतंत पटलंय

जीवनाचं कोडं

नकळत उलगडलंय..

या जीवनप्रवासात

खूप काही‌ मिळवलंय

बरंच काही गमावलंय

आता जे आहे..

ते जपायला हवं..

पहायला हवं जग नवं

माणूस म्हणून जगताना…

करू जगाला आपलेसं

आपला जीवनरंग , शब्दसुता

आणि अंतरातूनआलेला

अनुभूतीचा ताजातवाना

आदर्शवत आणि अनुकरणीय चिरपरिचित विचारढंग…!”

© कविराज विजय यशवंत सातपुते

हकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  8530234892/ 9371319798.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments