सुश्री प्रणिता प्रशांत खंडकर
कवितेचा उत्सव
☆ हरे कृष्णा! ☆ सुश्री प्रणिता खंडकर ☆
जन्म तुझा कारागृही, बालपण नंदा – घरी,
तूच बाळकृष्ण आणि, थोर युगंधर तूची !
तुझ्या सावळ्या रूपाची, भूल प्रत्येक मनाला,
धून बासरीची तुझ्या, पाय धरतात ठेका !
जमवूनी गोपालांना, दही, दूध, लोणी, काला,
भेदाभेद जाती लया, एकवटले गोकुळा !
प्रिती राधेची आगळी, भक्ती मीरेची वेगळी,
भामा-रूक्मिणीचा पती, उद्धरी सोळा-सहस्त्रांसी !
द्रौपदीचा भाऊराया, अर्जुनाचा तू सारथी,
मारिलेस तूच कंसा, मैत्री भाव सुदाम्याशी !
रूपं आगळी-वेगळी, तुझी वर्णावी किती?
तूच द्वारकेचा राजा , आणि विठू पंढरीसी !
© सुश्री प्रणिता खंडकर
संपर्क – सध्या वास्तव्य… डोंबिवली, जि. ठाणे.
ईमेल [email protected] केवळ वाॅटसप संपर्क.. 98334 79845.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈