मेहबूब जमादार
कवितेचा उत्सव
☆ माझं गाव… ☆ मेहबूब जमादार ☆
☆
मी तुला जपेन सखे तू मला जप
अशीच निघून जावोत तपावर तप
☆
मी तुझ्या डोळ्यात तू माझ्या डोळ्यात
असंच तू बरस ना भर पावसाळ्यात
☆
नको कुठली दूरी नको मध्ये दरी
प्रेमानेच भरुया जीवनाच्या सरी
☆
प्रिये तुझ्या रेशमी केसातील मोगरा
विसरून जातो मी जगाचा पसारा
☆
तुझ्या येण्या सारा आसमंत बहरतो
माझ्या गीतात मी तुझे गीत गातो
☆
माझं गाव सखे तुझं ही होऊन जावं
आपल्या प्रेमाचं गाणं आभाळानं गावं
☆
© मेहबूब जमादार
मु. कासमवाडी,पोस्ट -पेठ, ता. वाळवा, जि. सांगली
मो .9970900243
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈