सौ.वनिता संभाजी जांगळे

?  कवितेचा उत्सव ?

☆ कोकणची भूमी… ☆ सौ.वनिता संभाजी जांगळे ☆

कोकणची भूमी थोर पुण्यवती

झाडे, वेली गगन चुंबती

विळखा घालत अंगाभोवती

दर्‍या-खोर्‍यातून सरिता धावती

 

ताडी, माडी, नारळी ,पोफळी

निळसर नभी सलामी घालती

चार घरांचे खेडे कौलारू

दूर नजरेआड झुडपात वसती

 

सदाबहार पर्ण रंग हिरवाई

लेवून उभी घनगर्द वनराई

ॠतू-ॠतूचा रंग ढंग आगळा

तो तो हर्ष मानसी वेगळा

 

तर्‍हा -तर्‍हा रंगरूपांची किती

इवल्या चोचित सुरांची महती

अबाधित असे स्वातंत्र्य तयांचे

नाही कुणा पारध्याची भिती

 

सळसळ वारा बेधुंद वाहूनी

दर्‍याखोर्‍या घुमून जाती

अथांग सागराचा शुभ्र किनारा

थबके सह्याद्रीच्या छातीवरती

 

गरिब, कष्टाळू लोक कोकणी

कडक बांधा साधी राहणी

सण, उत्सव, कला संस्कृतीचे

जतन होई खेड्यापाड्यातूनी

 

हर्ष भरल्या मनी, सढळ हाती

वसुंधरेवर नंदनवन उभारले

स्वर्गाहून सुंदर अशी सौंदर्यवती

असे विश्वकर्माने कोकण घडविले .

 

© सौ.वनिता संभाजी जांगळे

जांभुळवाडी-पेठ

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments