सुश्री प्रभा सोनवणे

? कवितेच्या प्रदेशात # 224 ?

तपस्या ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

पहाट ओली धुक्यातील ही,  धुंद गारवा,सभोवती

वृक्षवल्लरी सुखात गाती, मधुमिलिंदही गुणगुणती

*

गाव कोणते, कुठली वस्ती, सारे काही, अनोळखी

तुझ्यासवे मी इथवर आले, आत्म्यामधली, ही तलखी

*

तहान माझी युगायुगांची, तू माझा रे स्वप्नसखा

या देहावर त्या देहाचा, जणू घातला, अंगरखा !

*

मैथुनातले सुख अनुभवती, मनुष्यप्राणी-पशुपक्षी

या आत्म्यावर, देहावर ही, गोंदवलेली, ही नक्षी!

*

तृप्त जाहले, तव स्पर्शाने, मिटली सारी मम तृष्णा

ओढ, वासना, आसक्तीही, असे तपस्या… रे कृष्णा !

© प्रभा सोनवणे

२ एप्रिल २०२४

संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments