श्री अशोक श्रीपाद भांबुरे
अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 284
☆ बापाचं हृदय… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆
☆
आहे बापाचं हृदय
का ही पाषाणाची मूर्ती ?
आहे दैवत ते माझं
त्याची अगाध ही कीर्ती
*
लोक म्हणती दगड
माझ्यावर तो प्रसन्न
त्याचे मुख पाहताना
होतो आत्मा माझा धन्य
*
दिसे फणसासारखा
गऱ्यासारखा तो गोड
आत मधाळ इतका
कुठे नाही त्याला तोड
*
मला वाटे बाप माझा
हिमालयाची सावली
त्याच्या वागण्यात मला
कधी दिसते माउली
*
बाहेरून तो वाटतो
जसे काटेरी कुंपण
आत येउनी पहा ना
आहे कुसुमांचे वन
☆
© श्री अशोक श्रीपाद भांबुरे
धनकवडी, पुणे ४११ ०४३.
मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈