कविराज विजय यशवंत सातपुते
कवितेचा उत्सव # 218 – विजय साहित्य
☆ श्री स्वामी समर्थ ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆
[माझी अभंग रचना – ( ६ , ६ , ६ , ४ )]
☆
श्री स्वामी समर्थ ।
गुणातीत नाम।
भक्तीचे हे धाम ।
गुणातीत ।।१।।
*
स्वामी लिला सारी ।
दैवी अवतार ।
सद्गुण साकार ।
निजरूपी ।।२।।
*
करी भक्तोद्धार ।
अक्कलकोटात।
कीर्ती त्रिखंडात।
पसरली ।।३।।
*
कलियुगीचे हे ।
दिगंबर रूप।
काम, क्रोध, धूप |
जाळीयेला || ४ ||
*
चिंता आणि चिता ।
जगाचा संसार।
त्यागिला विकार ।
नामजपी ।।५।।
*
नित्य ध्यान, पूजा ।
श्री. स्वामी समर्थ।
अंतरी शब्दार्थ ।
फलदायी ।।६।।
*
श्री. स्वामी समर्थ ।
द्योतक स्नेहाचे ।
मंदिर सुखाचे ।
अंतर्यामी ।।७।।
*
भिऊ नको मंत्र।
अंतरीचा ठसा।
घेतलाय वसा ।
नामजपी ।।८।।
*
स्वामींचे वचन |
गरजूला दान ।
कलेचा सन्मान ।
सेवाव्रती ||९||
*
स्वामी चरीत्राचे ।
अध्यायी पठण।
संकट हरण।
गुणकारी ।।१०।।
*
श्रद्धेने धरीली |
अध्यात्माची कास।
दर्शनाची आस।
अंतरात ।।११।।
*
कविराज शब्दी |
भक्ती रस देणे।
अक्षरांचे लेणे।
मनांगणी ।।१२।।
☆
© कविराज विजय यशवंत सातपुते
सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे. 411 009.
मोबाईल 8530234892/ 9371319798.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈