कविराज विजय यशवंत सातपुते

? कवितेचा उत्सव # 189 – विजय साहित्य ?

☆ आली गौराई माहेरी ☆ कविराज विजय यशवंत सातपुते

आली गौराई माहेरी

सोनियाच्या पावलाने

तिला पाहून पळाले

दुःख मागल्या दाराने. . . . !

 

परंपरा पुजणारा

सण गोराईचा मोठा

तिची लागता चाहूल

नाही आनंदाला तोटा. . . !

 

ज्येष्ठा कनिष्ठा बहिणी

आदिशक्ती, आदिमाया

मन जाहले अंगण

त्यात सौभाग्याची छाया . . . . !

 

जाई, जुई, मोगर्‍याचा

तिच्या मखरात साज

फराळाच्या पदार्थाने

केली दिवाळी मी आज .. . !

 

खीर,पुरी, कानवले

पंच पक्वान्नाचा थाट

यश, किर्ती, समाधान

बघतात तिची वाट.. . !

 

तिचे सासर सौख्याचे

आणि माहेर मायेचे

अनुराधा, ज्येष्ठा, मूळ

चार दिन नक्षत्रांचे. .. !

 

फुला फळांची आरास

सजविले सालंकृत . आ

अंतराने अंतराला

जणू केले आलंकृत

अशी गौराई साजणी

जणू लक्ष्मीचे रूप

तिचे गुण वर्णिताना

व्हावा अक्षरांचा धूप .. . !

 

देव गणराया सवे

राही माहेरी गौराई

देई दान सौभाग्याचे

तिची लाभू दे पुण्याई. . . . !

© कविराज विजय यशवंत सातपुते

सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  8530234892/ 9371319798.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments