सौ. जयश्री पाटील
कवितेच्या उत्सव
☆ शीर शीर कापावे… ☆ सौ. जयश्री पाटील ☆
☆
कसली पाशवी वृत्ती
कसला हा भ्याड हल्ला
धर्मांधतेचा बुरखा
निष्पाप जीवांवर बेतला
*
आता तरी जागे व्हावे
रण मैदानी ललकारावे
अग्नीचे लोळ उठवावे
उन्मत्त शीर शीर कापावे
*
परंपरा क्षात्रतेजाची
आठवुणी धरावे शस्त्र
रणनीती अशी आखावी
अन उगारावे अस्त्र
*
पेटुनी उठावा कणकण
शक्ती लावूनी पणाला
अतिरेकी हैवानांना
धाडावे यमसदनाला
*
इतिहास घडवावा पुन्हा
कृष्ण शिवबा राणा यांचा
मर्दुमकी अशी गाजवावी
फडकवावा झेंडा विजयाचा
☆
© सौ. जयश्री पाटील
विजयनगर.सांगली.
मो.नं.:-8275592044
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈