कवितेचा उत्सव
☆ सुंदर नाती… ☆ सौ. मुग्धा कानिटकर ☆
माझी कविता
प्रकार:
आठ अक्षरी कविता
सुंदर नाती जपती
सगेसोयरे सोबती
नेसावी प्रत्येक साडी
जशी दिली त्यांनी तशी
तिची आनंदी किनार
दिसे सुखाचा पदर
नको लेबल किंमती
अन् चर्चा क्वालिटीची
ठेवा आदर वयाचा
जाणा भाव अंतरीचा
जोडावा प्रेमाचा धागा
किंतु न आणावा मना
साडी एक दिसे चीज
क्षण एक असे मौज
*सुंदर नाती जपती
सगेसोयरे सोबती*
© सौ. मुग्धा कानिटकर
सांगली
फोन 9403726078
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈