श्री रवींद्र सोनावणी

? कवितेचा उत्सव ?

☆ पैलतिरावर जाणे ☆ श्री रवींद्र सोनावणी ☆ 

सूर विखुरले दाही दिशांना, आता कुठले गाणे ?

तीर दिसेना ऐलतिरावर, पैलतिरावर जाणे ||धृ||

 

कुठे कशाचे बंध न उरले, 

सुखस्वप्नांचे स्वप्नही विरले,

दिशाहीन तो फिरे कारवां, घुमवित जीवन गाणे ||१||

 

पर्णहीन त्या कल्पतरूवर,

धुंडीत फिरतो मधू मधुकर,

आकांक्षेच्या स्वैर वारूवर, भिरभिरतात दिवाणे ||२||

 

फुलपंखांनी लहरत यावी,

माळावर त्या रिमझिम व्हावी,

आणि कोरले जावे अवचित, खडकावरती लेणे ||३||

 

शिशिरानंतर वसंत यावा,

चैतन्याचा मयूर झुलावा,

आणि अचानक बरसत यावे, भूवर गगन तराणे ||४||

 

© श्री रवींद्र सोनावणी

निवास :  G03, भूमिक दर्शन, गणेश मंदिर रोड, उमिया काॅम्पलेक्स, टिटवाळा पूर्व – ४२१६०५

मो. क्र.८८५०४६२९९३

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments