श्री विजय गावडे
कवितेचा उत्सव
☆ पंचात्तरीची शोढषललना… ☆ श्री विजय गावडे ☆
स्वतंत्रते भगवती गाठशी पंच्याहत्तरि जरी l
अजून दिसशी शोढष ललना, विरांगना भुवरी ll
आरक्त नयनी तुझ्या विलसते तेज दशदिशांचे lll
राखू अबाधित तव स्वातंत्र्या वचन असे आमुचे ll1ll
नकळे कितीदा असतील झाले आघात तव भू वरि l
घे वचना तव रक्षाया करु प्राण नि्छावर तरी II2II
स्वप्न असे तुज प्रस्थापित करु ‘विश्वगुरू’ मातें
भारतभूमी राहो अखंड दिपवूनी विश्वाते ll3ll
आगंतुक अन आक्रसताळी येती भवसंकटे
पुरुनी उरु त्या भेदून, तुडवून मार्गातील काटे ll4ll
घडवू योद्धे, व्यापारी, खेळाडू, अन उमदे शेतकरी
उच्चप्रतिच्या नीतिमत्तेची कास धरू अंतरी ll5ll
स्वदेशीच्या चळवळीस करुनी जीवनाची वाहिनी
होऊ प्रवक्ते स्थानिक वस्तू अन सकळ कलां च्या जनी ll6ll
देशभक्तीची मशाल ठेऊ धगधगती सर्वदा
अनासक्त अन उज्वल घडवू पुढची जनसम्पदा ll7ll
निरोगी, निरामय आयुष्या जन जन करु जागृती
‘योगगुरू’ हि तुझी उपाधी अखंड राखू धरती ll8ll
पुनच्छ वचना उच्चरून घेतली शपथ हि मातें
राखू अबाधित तव स्वातंत्र्या वचन घेई अंते ll9ll
© श्री विजय लक्ष्मण गावडे
कांदिवली, मुंबई
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈