सुश्री नीलांबरी शिर्के
कवितेचा उत्सव
☆ बहरसमृद्धीची गाणी… ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆
☆
मेघ जाहला कृष्ण सावळा
बिजली झाली राधा गोरी
जलथेंबातुन नृत्य गोपींचे
उल्हासीत वसुंधरा जाहली
शिवारातुनी नदीनाल्यातुन
संगीताची मैफील सजली
सुर तयांचे वातावरणी
उत्साहाची चौफेर पेरणी
निसर्गाच्या ओठावरती
बहरसमृद्धीची गाणी
🌹
© सुश्री नीलांबरी शिर्के
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈