श्री सुहास रघुनाथ पंडित

? कवितेचा उत्सव ?

☆ जखमा मनातल्या या... ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित 

जखमा मनातल्या या उघड्या करु कशाला

हृदयातल्या व्यथेला मी जागवू कशाला

*

गीतातल्या स्वरांचा बेसूर नाद आला

जे सूर नाही जुळले ते आळवू कशाला

*

लावून एक रोप केले तयास मोठे

हातात आज माझ्या घुसतात मात्र काटे

*

बागेतल्या फुलांचा हरवून रंग गेला

वणवाच वेदनांचा जाळीत अंग गेला

*

स्वप्नातल्या सुखाची धुंदी अजून ओली

सत्यातल्या व्यथेला ही जागा आज आली

*

नाही मनात आशा डोळ्यात नाही स्वप्न

मी वेचतो तयांचे अवशेष आज भग्न

© श्री सुहास रघुनाथ पंडित 

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈


Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments