श्री शरद कुलकर्णी
कवितेचा उत्सव
☆ आता कशाला शोधावे ? ☆ श्री शरद कुलकर्णी ☆
☆
शोध नात्याचा मी घेता,
नभी मेघ कसे आले.
मोर स्मृतींचे नाचून,
मन पावसाचे झाले.
वारा घालतो उखाणे,
कसे गर्भार वृक्षांना.
पुन्हा ऐकण्यास गाणे,
बोलवा ना त्या पक्षांना
घर बांधीन स्वप्नांचे,
त्याला चांदण्यांचे दार.
चंद्र आकाशी येइल,
जसा प्रेम अपरंपार.
आता कशाला शोधावे,
नाते नव्याने आपले.
भिंती अदृश्य आधार,
स्वप्नी सदृश्य जपले.
☆
© श्री शरद कुलकर्णी
मिरज
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈