श्री तुकाराम दादा पाटील
कवितेचा उत्सव
☆ आत्मबल… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆
☆
मिथकामधल्या आधारावर
सभेत मारू नको भरारी
शब्दामधुनी व्यक्त व्हायला
स्वानुभवाची हवी शिदोरी
*
जिंकायाचा वाद तुलातर
हवी तेवढी ठेव तयारी
आवेगाने आवेशाने
मांडत मुद्दे सगळे भारी
*
वावरताना इकडे तिकडे
हिनकस बुद्धी नको अघोरी
राखत संयम शांतपणाणे
बनतजायचे पूर्ण विचारी
*
आत्मबलाची हवी मजबुती
नजर आणखी तशी करारी
पाजरलेली शस्त्रे अगणीत
जमवत जावी भवती सारी
*
विजयाने मग विनम्र व्हावे
मंजूळ व्हावा सूर बासरी
आनंदाचे येता भरते
स्थिती व्हायला नको बावरी
☆
© प्रा. तुकाराम दादा पाटील
मुळचा पत्ता – मु.पो. भोसे ता.मिरज जि.सांगली
सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३
दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈