श्री आशिष मुळे
कवितेचा उत्सव
☆ “प्रेरणा” ☆ श्री आशिष मुळे ☆
गेला होऊन एक महान कलंदर
कोणी म्हणती अलेक्झांडर,
कोणी मिलिंद तर कोणी म्हणती सिकंदर
नौकेला त्याच्या माहीत नव्हते कुठले बंदर
आकांक्षेच्या पंखांना त्याच्या
नव्हते मोठे कुठलेच अंतर
आद्य निर्माता जागतिकीकरणाचा
झाला अवघ्या तिसाव्या वर्षी
सम्राट तो त्या मागासलेल्या जगाचा
भाषा पिरामिडची नव्हती उमगत जगाला
दिला त्याने दगड रोझेटाचा
अन इतिहास कळे आपल्याला
दिले दाखवून अडाणी मनाला
शक्य काय आहे
या जगात विचारी मानवाला
होती शिकवण अरिस्टोटलची
सोडली नाही संगत त्याने
तर्क आणि उच्च विचारसरणीची
फक्त बत्तिसाव्या वर्षी निवर्तला आहे
पण आजही जगाला तो
“प्रेरणा” महान बनायची देत आहे…
© श्री आशिष मुळे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈