श्री प्रमोद वामन वर्तक
कवितेचा उत्सव
😞 का य दा ! 😂 श्री प्रमोद वामन वर्तक
कोण हा ?
याचा नाही तबल्याशी
संबंध जराही काडीचा,
कोर्ट कचेऱ्या पोलीस
यांना हा फार जवळचा !
याचे राज्य असेल जिथे
सुखी असते म्हणे जनता,
पण उल्लंघन याचे करती
सगळेच लोकं येता जाता !
सापडू नये कचाट्यात
म्हणून सारे काळजी घेतात,
चुकून कोणी सापडताच
वकीलाकडे धावतात !
याची पुस्तके अभ्यासून
वकील यावर पोट भरती,
खोट्याचे खरे ठरवताच
वाढे बघा त्यांची कीर्ती !
आहे सगळ्यांना समान
तो पुस्तकात कागदावर,
पण ठराविक ‘स्वयंभू नेते’
घेत नाहीत यास मनावर !
आहे जिथे याचे अस्तित्व
तिथेच असतात पळवाटा,
म्हणून न्याय मिळवण्यास
घालाव्या लागती हेलपाटा !
© प्रमोद वामन वर्तक
दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.)
मो – 9892561086
ई-मेल – [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈