कविराज विजय यशवंत सातपुते

? कवितेचा उत्सव # 158 – विजय साहित्य ?

 

शेकोटी… ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

शेकोटीचा

न्यारा ढंग

चेतविती

अंग अंग .. . . //१//

शिळोप्याच्या

गप्पा भारी

मजामस्ती

मौज न्यारी .. . //२//

सुखदुःख

शिलगली

अंतरास

बिलगली . . . //३//

शिणवटा

करी दूर

शेकोटीचा

न्यारा सूर .. . //४//

ऊबदार

कपड्यात

घेऊ मजा

गारठ्यात . . . //५//

काटक्यांचा

करू जाळ

आठवांशी

जोडू नाळ . . .//६//

शब्द धन

थोडे देऊ.

अनुभव

थोडे घेऊ.. . //७//

शेकोटीत

होई धूर

रोगराई

पळे दूर. . . . //८//

आप्त सारे

शेकोटीला

आठवांच्या

पंगतीला. . . . //९//

भवताप

विसरूया

शेकोटीचे

जमवूया . . . . //१०//

© कविराज विजय यशवंत सातपुते

सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  8530234892/ 9371319798.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments