image_print

मराठी साहित्य – चित्रपटावर बोलू काही ☆ The Chorus ☆ सुश्री तृप्ती कुलकर्णी ☆

सुश्री तृप्ती कुलकर्णी  चित्रपटावर बोलू काही  ☆ The Chorus ☆ सुश्री तृप्ती कुलकर्णी ☆ १९८२ सालची इराणची ‘द कोरस’ ही शॉर्ट फिल्म पाहण्यात आली.  तर मंडळी ही फिल्म खूप जुनी असल्यानं ती बऱ्यापैकी ब्लर दिसते. पण यातले प्रमुख पात्र ‘आजोबा’ आहेत त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव मात्र काही काही प्रसंगात स्पष्ट दिसतात. आणि त्यावरून फिल्मच्या मूळ चित्रीकरणाचा दर्जा लक्षात येतो.  ऐकू येत नाही म्हणून कानाला मशीन लावावं लागणारे आजोबा एका घोडागाडीच्या खाली येता येता वाचतात. नंतर मात्र ते न विसरता कानाला यंत्र लावतात आणि काही बाजारहाट करून घरी जातात. इथं एक गोष्ट मला फार आवडली की फिल्ममध्ये संवाद अत्यल्प आहेत. जवळ जवळ नाहीच असं म्हणलं तरी चालेल. पण आजोबांनी कानाला मशीन लावलं की आपल्याही आवाजाची तीव्रता वाढते आणि काढलं की कमी होते. हा साउंड इफेक्ट इथं फारच परिणामकारक वापरला आहे. कारण संवादाच्या अनेक जागा या ‘साउंडनं’ भरून काढल्या आहेत. किंबहुना आवाज हाच या फिल्मचा आत्मा आहे असं म्हणायला हरकत नाही. या फिल्ममध्ये जाणवलं की व्यक्ती म्हणजे त्यांचे पोशाख, हुद्दा, त्यांचे चेहरे वगैरे गोष्टी इथं महत्त्वाच्या नाहीत पण ‘त्यांनी ऐकणं’ आणि त्यावर प्रतिक्रिया देणं जास्त महत्त्वाचं आहे.   तर...
Read More

मराठी साहित्य – चित्रपटावर बोलू काही ☆ राकेट्री (हिंदी सिनेमा) – दिग्दर्शक – आऱ्. माधवन ☆ श्री उदय गोपीनाथ पोवळे ☆

श्री उदय गोपीनाथ पोवळे  चित्रपटावर बोलू काही  ☆ Rocketry (हिंदी सिनेमा) - दिग्दर्शक - आऱ्. माधवन ☆ श्री उदय गोपीनाथ पोवळे ☆ आज Rocketry हा हिंदी सिनेमा बघण्याचा योग आला. योगच म्हणावे लागेल कारण गेल्या आठवड्यापासून तो सिनेमा बघण्याचे मनात असले तरी वेळ काढता आला नाही. आज मात्र ठरवून रॉकेट्री सिनेमा बघितला. डॉक्टर विक्रम साराभाईंनी ज्यांच्यावर मुलासारखं प्रेम केलं, ज्यांच्या प्रचंड बुद्धीमत्तेवर विश्वास ठेवला, ज्यांचा विक्षिप्तपणा सांभाळून घेतला, तेच डॉ. नंबी नारायणन ह्यांच्या आयुष्यावर चित्रित केलेला हा सिनेमा. आर. माधवन ह्या अभिनेत्याने हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे , आणि स्वतःच डॉ. नंबी नारायणन ह्यांची भूमिका केली आहे. हा सिनेमा बनवून, त्याने आपल्या भारत देशातील सगळ्या देशवासीयांसमोर एक असा काही नजराणा ठेवला आहे की तो आपण प्रत्येकाने स्वीकारून त्याचा नुसता आस्वाद न घेता, त्याचे स्मरण आपल्या आयुष्यात कायम राहील ह्याची खात्री बाळगली पाहिजे.  डॉ एस. नंबी नारायणन (जन्म १२ डिसेंबर १९४१ ) हे रॉकेट वैज्ञानिक आणि एरोस्पेस अभियंता होते , ज्यांनी भारतीय अंतराळ संशोधन संस्था ( ISRO ) इथे काम केले आणि विकास रॉकेट इंजिनच्या विकासात योगदान दिले. २०१९ मध्ये...
Read More

मराठी साहित्य – चित्रपटावर बोलू काही ☆ मेजर… निर्देशक – शशि किरण टिक्का ☆ श्री उदय गोपीनाथ पोवळे ☆

श्री उदय गोपीनाथ पोवळे  चित्रपटावर बोलू काही  ☆ मेजर… निर्देशक - शशि किरण टिक्का ☆ श्री उदय गोपीनाथ पोवळे ☆ मेजर संदीप उन्नीकृष्णन आज दिनांक ६-६-२०२२ ला असा एक सिनेमा बघण्याचा योग आला की तो सिनेमा बघून भूतकाळात घडलेले ते दोन, तीन  दिवस पुन्हा डोळ्यांसमोर आले. २६-११-२००८ ते २९-११-२००८ ह्या तीन दिवसांत पाकिस्तानमधल्या लष्करे तयबा ह्या इस्लामिस्ट टेररिस्ट ऑर्गनाजेशनच्या दहा अतिरेक्यांनी जवळजवळ १६६ जणांना जीवानिशी मारले होते आणि त्या दिवशी तुकाराम ओंबळे साहेबांमुळे एक अतिरेकी जिवंत पकडला गेला तर बाकीच्या ९ अतिरेकीना मुंबई पोलिसांनी आणि आपल्या NSG कमांडोनी यमसदनास पाठविले होते. जे काही घडले होते आणि ज्यांनी कोणी टीव्ही वर ते पहिले होते, ते कोणीही, कधीही विसरू शकणार नाहीत पण त्या दिवशी ज्यांनी कोणी आपले प्राण पणाला लावून ह्या आपल्या देशासाठी, आपल्या देशातल्या माणसांसाठी आपल्या आयुष्याची आहुती देऊन त्या अतिरेक्यांना मारून शहीद झाले त्यांच्याबद्दल आपल्याला खूप कमी माहिती असते आणि आज आम्ही जो सिनेमा बघितला त्या सिनेमाने आम्हांला आज अशाच एका शहीद झालेल्या आपल्या जवानाची खरी ओळख करून दिली. अशोकचक्रवीर मेजर संदीप उन्नीकृष्णनवर आलेला सिनेमा,  "...
Read More

मराठी साहित्य – चित्रपटावर बोलू काही ☆ दि बुक थीफ… दिग्दर्शक – ब्रायन पर्सिवल ☆ परिक्षण – सुश्री तृप्ती कुलकर्णी ☆

सुश्री तृप्ती कुलकर्णी 🎞️ चित्रपटावर बोलू काही 🎞️ ☆ दि बुक थिफ … दिग्दर्शक - ब्रायन पर्सिवल ☆ परिक्षण – सुश्री तृप्ती कुलकर्णी ☆ युद्धातल्या खऱ्या रम्यकथा… मार्कस झुसॅक यांच्या कादंबरीवर आधारित दिग्दर्शक - ब्रायन पर्सिवल सध्या आपण रशिया आणि युक्रेन यांच्या युद्धाच्या बातम्या ऐकतो आहोत, पाहतो आहोत आणि या युद्धाचे इतर देशांवर होणारे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष, गंभीर-किरकोळ स्वरूपाचे परिणामदेखील पहात आहोत, अनुभवत आहोत. यावरून माझ्या एकच लक्षात आलं की आता युद्ध ही संकल्पना कुठल्याही ठराविक भौगोलिक, सांस्कृतिक, राजकीय किंवा सामाजिक सीमेपुरती मर्यादित राहिलेली नाही. तर ती पृथ्वीच्या कुठल्याही एका बिंदूपासून सुरू होऊन हळूहळू संपूर्ण पृथ्वीला कह्यात घेते... आणि एका विषयापासून सुरू होऊन इतर अनेक विषयांनाही कवेत घेते. भूतकाळ, वर्तमानकाळ, भविष्यकाळ या तीनही काळांचा संबंध युद्ध या संकल्पनेशी घट्ट रुजलेला आहे. त्यामुळे आधी घडून गेलेल्या काही युद्धांच्या कथा जरी अत्यंत विनाशकारी असल्या तरी आजही पुन्हा पुन्हा आठवल्या जातात. त्यावर पुन्हा पुन्हा चर्चा घडत राहते. आणि हळूहळू या कथा निरनिराळ्या साहित्यकृतींचं ही आकर्षण ठरतात. दुसरं महायुद्ध हे आजही अनेकदा चर्चिलं जातं, आणि त्याबरोबरच चर्चिला जातो तो या युद्धाचं केंद्रस्थान असलेला,...
Read More

सूचनाएँ/Information – ☆ रंगमंच/Theatre ☆ विवेचना, जबलपुर का 27 वां राष्ट्रीय नाट्य समारोह – 23 से 27 मार्च 2022 ☆ श्री हिमांशु राय ☆

सूचनाएँ/Information (साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार) ☆ विवेचना, जबलपुर का 27 वां राष्ट्रीय नाट्य समारोह - 23 से 27 मार्च 2022 ☆ श्री हिमांशु राय ☆   6 नायाब नाटकों का मंचन होगा 23 से 27 मार्च 2022 तकविवेचना का 27 वां राट्रीय नाट्य समारोह वसंत काशीकर की स्मृति को समर्पित है यह समारोह अमृतसर, जम्मू, दिल्ली और भोपाल के बहुरंगी नाटकों से सजा है समारोह भगतसिंह पर केन्द्रित नाटक वसंती चोला से होगी शुरूआत पंजाब के लोकगायक गाएंगे वीरों की गाथा काव्य पाठ, नृत्य, संगीत से सजा होगा प्रतिदिन पूर्वरंग विवेचना थियेटर ग्रुप (विवेचना, जबलपुर) का 27 वां राष्ट्रीय नाट्य समारोह इस वर्ष 23 से 27 मार्च 2022 तक आयोजित होगा। समारोह की शुरूआत 23 मार्च को भगतसिंह शहादत दिवस पर भगतसिंह पर केन्द्रित नाटक ’बसंती चोला’ से होगी। इस नाटक का निर्देशन देश के जाने माने नाट्य निर्देशक केवल धालीवाल ने किया है। 23 मार्च शहादत दिवस के लिए पंजाब के प्रसिद्ध लोकगायकों का दल जबलपुर आ रहा है जो ’बसंती चोला’ के मंचन से पहले वीरों की...
Read More

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ नाट्यछटा ☆ श्री आनंदहरी ☆

श्री आनंदहरी  जीवनरंग  ☆ नाट्यछटा ☆ श्री आनंदहरी ☆ " आलिया भोगासी असावे सादर !…." (रेडिओवर गाणे लागले आहे, नवरा नको ग बाई मला दादला नको ग बाई…गाणे बंद करते ) अगदी खरं आहे बाई तुझे.. नवरा नको ग बाई मला दादला नको ग बाई.. अगदी असंच वाटतं बघ.. काय म्हणालात ' असं का गं ?' काय सांगायचं तुम्हांला ? अहो, आमच्या ह्यांशी संसार करणे म्हणजे सोपी का गोष्ट आहे.. "अहो,  एक काम धड करतील तर शपथ..साधे कपडे धुवायला टाकताना कपडे सरळ सुद्धा करणार नाहीत.. जीव अगदी मेटाकुटीला येतो हो !...हा संसाराचा गाडा ओढायचा ओढायचा म्हणजे किती ओढायचा एकटीने.. (कपडे उचलण्याचा,सरळ करण्याचा अभिनय ) दोन दिवस वाण सामान आणण्यासाठी यांच्या कानी-कपाळी ओरडतेय.. पण ऐकू जाईल तर शप्पत ! आले आपले हात हालवत.. विचारलं तर म्हणतात कसं ?. अगं ऑफिसमध्ये काम जास्त होतं .. गडबडीत विसरलो… बरं झालं बाई, आज ऑफिसला जातानाच वाणसामानासाठी हातात पिशव्या दिल्या यांच्या ते… पिशव्या पाहून तरी आठवणीनं आणतील सामान.. अहो, वाणसामानाचं दुकान का जवळ आहे ? आणि घरातलं सारं आवरून परत इतक्या लांब जायचं म्हणजे खूप वेळ...
Read More

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ गटुळं – भाग-7 ☆ श्री आनंदहरी ☆

श्री आनंदहरी  जीवनरंग  ☆ गटुळं – भाग-7 ☆ श्री आनंदहरी ☆ (रंगाचा सोपा.. शक्य असेल तर सोप्यात धुरपदाचा हार घातलेला फोटो.. बाकी नेपथ्य पूर्ववत ) भामा  :- ( हातात धुरपदाचं गटूळं )  बरं झालं बाई.. म्हातारी गेली तवा कुनाच्याबी नदरंला पडायच्या आगुदरच म्या गटूळं लपीवलं त्ये.. न्हायतर सारजीची नदार त्येच्यावं पडली असती तर समदंच केल्यालं पान्यात गेलं आसतं.. म्हातारीचं समदं दिस होस्तंवर .. पावनं पै जकडल्या तकडं जास्तंवर..  गटूळं कवा बगतीया.. आन  माळ- पैका आडका कवा घितीया आसं झालं हुतं .. आता  गटूळयातलं पैकं आन माळ  समदं माजं येकलीचंच.. (खाली बसते.. गटूळं उलगडते.. काहीच दिसत नाही.. अविश्वासाने गटूळ्यातला एकेक कपडा इकडं तिकडं टाकते...माळ दिसते तशी खुशीत येऊन माळ उचलते.. ) भामा :-   आँ ss ! येक पैका बी न्हाय गटूळ्यात.. तवा तर म्हातारीनं शंभराची नोट काडलीवती.. पर माळ घावली ही ब्येस झालं.. (खुशीत माळ गळयात घालू लागते तेवढ्यात काहीतरी जाणवून माळ डोळ्यासमोर घेऊन पाहते…) आँ ss !  ही सोन्याची न्हाय … असली माळ तर धा-इस रुपैला बाजारात मिळती .. ( माळ दूर भिरकावते आणि कपाळावर हात मारून घेत...
Read More

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ गटुळं – भाग-6 ☆ श्री आनंदहरी ☆

श्री आनंदहरी  जीवनरंग  ☆ गटुळं – भाग-6 ☆ श्री आनंदहरी ☆ ग्रामीण एकांकिका :-   गटुळं (धुरपदा अंगणात कडेलाच थाटीत तांदूळ निवडत बसलेली असते .. रंगा अंगणात येतो...तिच्याजवळ जाऊन बसतो.. ) रंगा :- आयेss काय करतीयास गं ? “ धुरपदा :- काय न्हाय रं .बस वाईच..चुलीवं भात ठेवायचा हाय.. तांदूळ निवडाय घेतल्यात....   खातूस का वाईच गरम गरम ? (रंगा काहीच बोलत नाही . गप्प राहून जमिनीकडं बघत बसतो.) धुरपदा :-  ( मायेने, काळजीने ) रंगा, लेकरा,  गपगुमान का रं बसलायस ? काय हूतंय काय तुला ? “ रंगा  :- काय न्हाय ग आये , काय हुतंय मला..? ती  तांदळाचं ऱ्हाऊंदेल…. चल आदी घरात .. धुरपदा :-     आरं , माजी लाकडं ग्येलीती म्होरं मसनात, आता घरात काय आन दारात काय ?..येकच की रं “ रंगा :-   आये, उगा कायबाय कशापाय बोलाय लागलीयास  गं ? चल, घरात चल.. धुरपदा :-  लेकरा,  माजं काय रं , तूमी ठयेवशीला ततं आन तसं ऱ्हायाचं… पर बायकूला ईचारलंस का आगुदर ? रंगा :-   तिला काय ईचारायचं हाय ? घर काय तिच्या बा चं हाय वी ? तू चल … धुरपदा :-  तसं...
Read More

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ गटुळं – भाग-5 ☆ श्री आनंदहरी ☆

श्री आनंदहरी  जीवनरंग  ☆ गटुळं – भाग-1 ☆ श्री आनंदहरी ☆ ग्रामीण एकांकिका :-   गटुळं (रंगाचे घर.. सोपा .. नेपथ्य पहिल्या प्रवेशा सारखे..) भामा :- (आतूरतेनं रंगाची वाट पाहत.. सोप्यात फेऱ्या घालतेय .. मधूनच दारातून बाहेर पाहते.) अजून कसं आलं न्हायती ? आज  याला लईच वखुत झालाय ह्यास्नी... ( दारातून रंगा येताना दिसतो.  भामा खुश होते .. रंगा आत येताच ती दार लावते..) आज लईच येळ काम करीत हुतासा वी.. का वाटत कुनी गाठ पडलंवतं ? रंगा :- तसं कायच न्हाय.. पर आसं का वाटतंया तुला ? भामा :-  तुमास्नी याला लईच येळ झाला न्हवका ... रंगा :-   ( आश्चर्याने ,तिच्या मनाचा अंदाज घेण्याचा प्रयत्न करीत ) आग..रोजच्याच येळंला तर आलूय न्हवका.. भामा :-  बरं ती जाऊदेल.. म्या काय म्हनते.. अवो, आज म्हातारीकडं शंभर रूपै बघितलं म्या.. आन त्या गटूळ्यात  का न्हाय सोन्याचा डाग बी हाय.. रंगा :- भामे, काय सांगतीयास काय ? सपान बिपान तर बघितलं न्हाईस न्हवंका ? भामा :- तुमी कवा इसवासच ठयेवत न्हाईसा माज्याव.. अवो, म्या ह्या डोळ्यानं बगीतलंया .. म्हातारीनं गटूळयातनं पैका काडताना. अवो, तवा धाकली नव्हती ततं.. ही लई ब्येस झालं...
Read More

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ विवेक साहित्य # 113 ☆ रंगमंच – नर्मदा परिक्रमा की कथा ☆ श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’

श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’  (प्रतिष्ठित साहित्यकार श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ जी के साप्ताहिक स्तम्भ – “विवेक साहित्य ”  में हम श्री विवेक जी की चुनिन्दा रचनाएँ आप तक पहुंचाने का प्रयास करते हैं। श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र जी, अतिरिक्त मुख्यअभियंता सिविल  (म प्र पूर्व क्षेत्र विद्युत् वितरण कंपनी , जबलपुर ) से सेवानिवृत्त हैं। तकनीकी पृष्ठभूमि के साथ ही उन्हें साहित्यिक अभिरुचि विरासत में मिली है। आपको वैचारिक व सामाजिक लेखन हेतु अनेक पुरस्कारो से सम्मानित किया जा चुका है। आज प्रस्तुत है श्री विवेक जी  द्वारा रचित नाटक नर्मदा परिक्रमा की कथा। इस विचारणीय विमर्श के लिए श्री विवेक रंजन जी की लेखनी को नमन।) ☆ साप्ताहिक स्तम्भ – विवेक सहित्य # 113 ☆ नाटक - नर्मदा परिक्रमा की कथा (समाहित संदेश...  नदियो का सामाजिक महत्व) नांदी पाठ...   पुरुष स्वर... हिन्दू संस्कृति में धार्मिक पर्यटन का बड़ा महत्व है, नदियो, पर्वतो, वनस्पतियों तक को देवता स्वरूप में कल्पना कर उनकी परिक्रमा का विधान हमारी संस्कृति की विशेषता है.नदियो का धार्मिक महत्व प्रतिपादित किया गया है, जिससे जन मन में जल...
Read More
image_print