मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “टक टक…” – लेखक : श्री अविनाश देशमुख ☆ श्री मोहन निमोणकर ☆

श्री मोहन निमोणकर 

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ “टक टक…” – लेखक : श्री अविनाश देशमुख ☆ श्री मोहन निमोणकर ☆

…काळीज पिळटवून टाकणारी एक घटना….

एका घरामधे पेपर टाकायला मुलगा गेला होता, पण त्या गृहस्थाची बाहेर लावलेली टपालपेटी बंद करून टाकलेली होती. म्हणून त्या मुलाने दरवाजावर टक टक केले. एका वयस्कर व्यक्तीने लटपटत्या पायाने चालत हळुवारपणे दरवाजा उघडला. मुलाने विचारले, “टपालपेटी का बंद ठेवली आहे. ती व्यक्ती उत्तरली, “मी ती मुद्दामच बंद ठेवली आहे.” आणि पुढे हसून सांगितले, “मला तू वर्तमानपत्र रोज दरवाजा वाजवून अगर बेल वाजवून माझ्या हातात द्यायला हवं.

तो मुलगा विचारात पडला व म्हणाला, “आपल्या दोघांनाही ते गैरसोईचे आहे आणि माझा जास्त वेळ जाईल”. ते गृहस्थ म्हणाली, “मी तुला जादा रू.५००/- दरमहा दरवाजा वाजवणे किंवा बेल वाजवण्याचे देईन”. त्या व्यक्तीने पुढे म्हटले, “जर असा एखादा दिवस आला की, तू दरवाजा वाजवलास व मी उघडला नाही, तर तू पोलिसाना कळव”.

त्या मुलाला धक्का बसला व त्याने विचारले, “का”? ते गृहस्थ म्हणाले, “माझी बायको हल्लीच वारली, मुलगा परदेशी असतो व म्हणून मी एकटाच आहे. कुणास ठाऊक माझा नंबर कधी येईल ते”! मुलाला त्या गृहस्थांच बोलण हे जड मनाने व डोळ्यात अश्रू आणून केल्याच दिसल. त्या गृहस्थाने पुढे सांगितले, “मी कधीच पेपर वाचत नाही व फक्त दरवाज्यावरील टकटक ऐकण्यासाठी किंवा बेलचा आवाज ऐकण्यासाठी, तसेच ओळखीच्या माणसाला पाहणे व त्याच्याशी दोन शब्द बोलण्यासाठी पेपर सुरू केला आहे”. पुढे त्या गृहस्थाने त्या मुलाचे हात हातात घेऊन व त्याला आपल्या मुलाचे कार्ड देऊन सांगितले, “जर एखाद्या दिवशी मी दरवाजा उघडू शकलो नाही तर, पोलिसांना सांग व माझ्या मुलालाही कळव”.

म्हणजे जगात अशी एकटे राहणार्‍या बर्‍याच वृद्ध व्यक्ती आपल्या आजूबाजूला असतील. तुम्हाला वाटेल की, अशा व्यक्ती तुम्हाला रोज सकाळ-संध्याकाळ व्हाट्स ॲप वर का संदेश पाठवीत असतील? खर तर हे दरवाजावर टकटक करण किंवा दरवाजावरील बेल वाजवण्यासारखेच आहे. आपण अजून सुखरूप असण्याचा संदेश देणेच आहे.

आपण आपल्या आसपासच्या वृद्ध गृहस्थांना व्हाट्स ॲप वापरायला शिकवा, म्हणजे एखाद्या दिवशी संदेश आला नाही तर ती व्यक्ती आजारी असू शकेल किंवा त्या व्यक्तीच काही बरवाईट झाल असेल अस वाटून तुम्ही चौकशी तरी करू शकाल. आता तुम्हाला रोज संदेश पाठवण्यामागच कारण लक्षांत आल असेलच!

लेखक : अविनाश देशमुख,  शेवगाव

सामाजिक कार्यकर्ता / पत्रकार

संग्राहक : श्री मोहन निमोणकर

संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो.  ८४४६३९५७१३.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – आलेख ☆ अभी अभी # 183 ⇒ प्रशंसक… ☆ श्री प्रदीप शर्मा ☆

श्री प्रदीप शर्मा

(वरिष्ठ साहित्यकार श्री प्रदीप शर्मा जी द्वारा हमारे प्रबुद्ध पाठकों के लिए साप्ताहिक स्तम्भ “अभी अभी” के लिए आभार।आप प्रतिदिन इस स्तम्भ के अंतर्गत श्री प्रदीप शर्मा जी के चर्चित आलेख पढ़ सकेंगे। आज प्रस्तुत है आपका आलेख – “प्रशंसक”।)

?अभी अभी # 183 ⇒ प्रशंसक? श्री प्रदीप शर्मा  ?

गुण के गाहक सहस नर !

यह मनुष्य का स्वभाव है कि उसे जो चीज पसंद आती है, वह उसका प्रशंसक बन जाता है। हमें तुमसे प्यार कितना, ये हम नहीं जानते, मगर जी नहीं सकते तुम्हारे बिना ! यह हकीकत भी हो सकती है और अतिशयोक्ति भी, लेकिन इसमें भी प्रशंसा का भाव ही निहित है। गुणगान भी प्रशंसा ही है, और तो और किसी चीज का विज्ञापन भी प्रशंसा ही। भले ही प्रशंसा आजकल पेशा बन गया हो, लेकिन सच तो यह है कि प्रशंसा हर इंसान की कमजोरी है। कुछ पति इतने कंजूस होते हैं कि दुनिया भर की तारीफ करेंगे, लेकिन कभी अपनी पत्नी की प्रशंसा में एक शब्द नहीं बोलेंगे। दो मीठे बोल ही तो प्रशंसा है। प्रशंसा जीवन का टॉनिक है। तारीफ करूं क्या उसकी जिसने तुम्हें बनाया। हम सब में एक प्रशंसक छुपा है।

कल अमिताभ बच्चन के प्रशंसकों का दिन था। अमिताभ की एक पुरानी फिल्म थी, सौदागर, जरा उसके इस गीत पर गौर फरमाइए ;

हर हंसीं चीज का मैं तलबगार हूं।

रस का, फूलों का,

गीतों का बीमार हूं।।  

कुछ ऐसे ही भाव इस गीत में भी देखे जा सकते हैं ;

आने से उसके आए बहार

जाने से उसके जाए बहार

बड़ी मस्तानी है, मेरी महबूबा।

मेरी जिंदगानी है, मेरी महबूबा ;

रुत ये सुहानी है, मेरी महबूबा।।  

एक प्रशंसक कोई संपादक, समीक्षक, आलोचक अथवा समाज सुधारक नहीं होता। एक प्रशंसक के लिए कोई स्कूल, कॉलेज नहीं, कोई कोचिंग क्लास नहीं, कोई डिग्री डिप्लोमा नहीं, उसका कवि, लेखक अथवा साहित्यकार होना भी जरूरी नहीं ! एक अंगूठा छाप, निरक्षर भी किसी का प्रशंसक हो सकता है। प्रशंसा पर किसी का कॉपीराइट नहीं।।  

प्रेम में तो फिर भी ढाई अक्षर है, फैन जी हां, फैन में तो सिर्फ दो अक्षर है।

किसी का मुरीद होना, अथवा प्रशंसक होना क्या इतना आसान है। हमें पता ही नहीं चलता, हम कब किसके प्रशंसक बन जाते हैं। उसकी तारीफ के पुल बांधने लगते हैं, उसकी बुराई नहीं सुन सकते, लोगों से लड़ने लग जाते हैं। क्या किसी का प्रशंसक होना, उसकी गिरफ्त में होना नहीं। ऐसे ही प्रशंसक जब किसी गलत व्यक्ति या विचारधारा के प्रशंसक हो जाते हैं, तो गिरफ्तार भी हो जाते हैं।

मैं भी एक इंसान हूं, और किसी का प्रशंसक भी ! एक लंबी चौड़ी फेहरिस्त है, जो अगर शुरू हुई, तो खत्म होने का नाम नहीं लेगी। कहीं मेरी स्मरण शक्ति जवाब दे देगी तो कहीं मेरे शब्द और मेरी जुबां। एक शब्द है चुनिंदा जिसमें शामिल हैं मोहम्मद रफी, महमूद और अमीन सयानी, लता, सुरैया और खुर्शीद, मंटो, मोहन राकेश और शैलेश मटियानी, अज्ञेय, निर्मल वर्मा और कृष्ण बलदेव वेद, परसाई, शरद जोशी और श्रीलाल शुक्ल, विनोद खन्ना, जगजीत सिंह और गिरीश कर्नाड। पंडित जसराज, भीमसेन जोशी और कुमार गंधर्व, साहिर, शैलेंद्र और संगीतकार उषा खन्ना।।  

जो इन चुनिंदा में शामिल नहीं, उन सबमें वे शामिल हैं, जिनके आप भी प्रशंसक हैं। सूर, तुलसी, कबीर और मीरा बाई के तो सब प्रशंसक हैं, अगर छूट जाती हैं तो सहजोबाई। इन्हें सुना नहीं जाता, गुना जाता है। जब किशोरी अमोणकर गाती हैं, म्हारो प्रणाम, बांके बिहारी जी, तो वही प्रशंसा स्मरण, कीर्तन और भजन में परिवर्तित हो जाती है। सहज समाधि लग जाती है।

प्रशंसा क्या है, राम का गुणगान, कृष्ण का ध्यान ही तो उस निर्गुण, निराकार, ओंकार की आराधना है। जहां साकार निरंकार एक होते हैं, यही वह सृष्टि है, वही सगुण है और वही निर्गुण।

जो घट घट में व्याप्त है, हम तो वास्तव में उसी के प्रशंसक हैं ;

जाकी रही भावना जैसी।

प्रभु मूरत, तिन देखी तैसी।।  

♥ ♥ ♥ ♥ ♥

© श्री प्रदीप शर्मा

संपर्क – १०१, साहिल रिजेंसी, रोबोट स्क्वायर, MR 9, इंदौर

मो 8319180002

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ अमिताभ….’शहेनशहांचा शहेनशहा’… ☆ श्री राहूल लाळे ☆

श्री राहूल लाळे

?  विविधा ?

अमिताभ….’शहेनशहांचा शहेनशहा’… ☆ श्री राहूल लाळे ☆

हा ‘शहेनशाह’, ‘दि ग्रेट गॅंबलर’, ‘खुद्दार’, ‘देशप्रेमी’ च नाही ‘महान’ नायक आहे, जो ‘कभी-कभी’ ‘मजबूर’ ‘एकलव्य’ ही होता.   ‘अग्निपथ’ वर हा ‘आज का अर्जुन’ बनून या ‘नमक हलाल’  ने ‘गंगा की सौगंध’ घेत  ‘नि:शब्द’  ‘आखिरी रास्ता’ पार पाडत  ‘मुकद्दर का सिकंदर’ बनला. याच्या ‘नसीब’ ने या  ‘अजूबे’, ‘जादूगर’ ला कधी  ‘डॉन’ बनवून  ‘जंजीर’ मध्ये  ‘गिरफ्तार’ केलं  तर कधी ‘शराबी’ समजून ‘जुर्माना’ लावत  ‘अंधा कानून’ च्या  ‘खाकी’ वर्दीच्या  हवाली केलं.  आयुष्यात कितीही चढ उतार  झाले तरी  ‘कभी खुशी कभी गम’ ची  ‘दीवार’ या  ‘मर्द’ माणसाच्या  ‘जमीर’ च्या  ‘शान’ ला  ‘ब्लॅक’ करू शकली नाही.  या  ‘कालिया’ च्या यशाचा  ‘सिलसिला’ ‘सात हिंदुस्तानी, ‘अजूबा ‘, ‘अमर अकबर अँथनी ’, ‘गंगा जमुना सरस्वती, ‘बॉम्बे टू गोवा’ पर्यंत अजूनही गायला जातो.

‘आनंद’ ने ‘खून-पसीना’ गाळला  नसता तर तो  ‘अकेला’ ‘हेरा-फेरी’ करून सुद्धा  ‘कुली’ च्या पुढं  पाऊल टाकू शकला नसता, पण हा  ‘लावारिस’ ‘रेश्मा और शेरा’ बनून  ‘वक्त’ च्या  ‘कसौटी’ ला खरा उतरून त्याच्या ‘मंजिल’ पर्यंत पोचला आणि  ‘हम’ सारे  बोललो  ‘गॉड तुसी ग्रेट हो’

रामगोपालच्या ‘आग ‘ चे ‘शोले ‘ आणि त्यातला ‘बदला ‘ विसरून तो ‘पिकू’ चा  ‘पा’ बनला.  ‘एक अजनबी’ मधला अंगरक्षक ‘आँखे ‘ करारी ठेवत ‘पिंक ‘ मध्ये काळा  डगला चढवून ‘गहरी  चाल’ खेळला.

एवढा ‘तुफान ‘ गाजावाजा होत असताना ‘चुपके चुपके ‘ चा  ‘याराना ‘ ‘दोस्ताना ‘ याला  ‘राम  बलराम’ पर्यंत  आणि ‘लावारिस ‘ ‘लाल बादशाह’ ला ‘खुदा गवाह ‘ आहे ‘सूर्यवंशम’ पर्यंत घेऊन गेला.

‘त्रिशूल*धारी  हा  ‘देशप्रेमी’  कधी ‘मि  नटवरलाल ‘ च्या खोड्या करत ‘ ठग ऑफ हिंदुस्तान’ झाला . आईचा ‘सुहाग ‘जपत  ‘काला पथ्थर ‘ फोडून लोकांच्या ‘रोटी कपडा  और मकान ‘ साठी लढला.  . ‘बरसात कि एक रात ‘  मधल्या पावसासोबत या *’बागबान’ ने  ‘ मोहोब्बते ‘ ने रसिकांच्या मनात प्रेमाच्या बागा फुलवल्या.

अजब हा ‘भूतनाथ’ ‘बडे मियाँ ‘ ‘छोटे मियाँ ‘ च्या *झुंड मध्ये ‘ करोडपती’  करत ‘शहेनशहांचा शहेनशहा’ बनला…आणि एवढं सगळं करुन *बुढ्ढा होगा तेरा बाप म्हणायला हा तयारच

दादासाहेब फाळके अवॉर्ड विजेत्या महानायक ” फॉरेव्हर अँग्री यंग  मॅन शहेनशाहोंके शहेनशाह अमिताभ बच्चनला ‘ वाढदिवसाच्या आभाळभर  शुभेच्छा !!!

© श्री राहुल लाळे

पुणे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ कुक्कुट ध्यानम् !… ☆ श्री सतीश मोघे ☆

श्री सतीश मोघे

? मनमंजुषेतून ?

कुक्कुट ध्यानम् ! ☆ श्री सतीश मोघे

मागच्या आठवड्यात एका मित्राच्या शेतातल्या घरी मुक्कामाला गेलो होतो. दुपारी १२ वाजता तिथे पोहोचलो. टुमदार कौलारू घर, आजूबाजूला भात शेती.आंबा, आवळा, पिंपळ अशी वृक्षांची मांदियाळी. हे सर्व पहाता पहाता नजर स्थिरावली ती त्याच्या घराच्या अंगणातच असलेल्या एका झाडावर आणि त्याला टेकून उभ्या केलेल्या शिडीवर.

रानातलेच झाड ते. जमिनीपासून आठ फूट उंच आणि तिथून वर फांदयांना सुरुवात. फांदया आणि पाने एवढी दाट की आत कुणी पक्षी असला तरी दिसणार नाही. या झाडाला टेकूनच एक शिडी ठेवली होती. त्या शिडीला प्रत्येकी दोन फुटांवर एक पायरी. शिडी एवढी भक्कमही नव्हती की त्यावरून माणूस चढेल. रानातल्याच वाळलेल्या काटक्यांपासून बनविलेली. मित्राला विचारले, ‘ही शिडी कुणासाठी रे?’ तो हसला. म्हणाला, ‘ संध्याकाळ होऊ दे, मग समजेल ‘.

संध्याकाळ झाली. अंधाराचे राज्य सुरू झाले. तसे मित्रासमोर तीन कोंबड्या, एक कोंबडा आणि चार छोटी पिल्ले येऊन उभी राहिली. त्याने पिल्ले उचलली. एका खोलीत मोठ्या टोपल्याखाली झाकली. त्यावर वजन ठेवले. कोंबड्या हे दुरुन पहात होत्या. पिलांची सोय झाली आहे,याची खात्री पटताच एकेक कोंबडी आणि तो कोंबडा क्रमाक्रमाने त्या शिडीवर उड्या मारत मारत झाडावर पोहोचले.

“ आता खाली कधी उतरणार? “ माझा प्रश्न. 

“ सकाळी उजाडल्यावरच. रात्रभर त्या झाडावरच झोपणार “ , मित्राचे उत्तर.

थोड्या वेळाने झाडाखाली जाऊन मी पाहिले, तर खोडाला फांदी जिथे जोडली जाते, तिथे त्या डोळे मिटून पायावर बसून विश्रांती घेत होत्या.  गावातले भटके कुत्रे आणि रानातले मुंगूस यापासून त्यांना जीवाला धोका. मग त्यांनीच ही सुरक्षित जागा शोधली. रोज प्रयत्न करून त्या छतावर, तिथून झेप घेऊन झाडावर जायच्या. मग मित्रानेच ही शिडी ठेवून त्यांचा मार्ग सुकर केला. आता रोज रात्री त्या  झाडावर जातात. ध्यानस्थ होऊन विश्रांती घेतात. उजाडल्यावर खाली येतात. पहाटेची बांगही झाडावरूनच…. मित्राने ही  माहिती पुरविली. 

हे ‘ कुक्कुट ध्यान ‘ मनात घर करून राहिले. पिलांची काळजी नाही.. ती घ्यायला मालक सक्षम आहे, याची खात्री. उद्याची चिंता नाही. शत्रूपासून सुरक्षित ठिकाण शोधायचं. तिथे ध्यानाची ‘खोड’  लावून घ्यायची की  फांदीवरचा तोल समन्वयाने आपोआप राखला जातो. जीवाला स्वस्थता आणि विश्रांतीही. 

सहज मनात आलं, आपणही राग, लोभ, मोह, हे आत‌ले शत्रू आणि स्पर्धा, असूया, मत्सर हे बाहेरचे शत्रू यांच्यापासून दूर, सुरक्षित ठिकाण शोधून तिथे निश्चिंतपणे, असेच ‘कुक्कुट ध्यान’, रात्रभर नको …पण दिवसातून थोडा वेळा तरी केलेच पाहिजे. या ध्यानातून मिळणारी स्वस्थता ही ऊर्जा प्रदान करणारी असेल. आत उजेड निर्माण करणारी असेल. उजाडताच पुन्हा नव्या ऊर्जेने उगवलेल्या दिवसाला सामोरी नेणारी असेल. हेच आपले एका दिवसाचे ‘ उजेडी राहिले उजेड होऊन ‘, असे होणे… असे रोज व्हावेसे वाटत असेल तर रोज हे ‘कुक्कुट ध्यानम्’….. 

© श्री सतीश मोघे

मो – +91 9167558555

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ‘शास्त्रीजी…’ ☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ ‘शास्त्रीजी…’ ☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर

 … फार आग्रह केल्यानंतर वरदक्षिणा म्हणून फक्त चरखा मागणारे शास्त्रीजी 

…  परिवहन मंत्री असताना भारतातल्या पहिल्या महिला कंडक्टर ची नेमणूक करणारे शास्त्रीजी

… गृहमंत्री म्हणून काम करताना लाठी ऐवजी पाणी वापरण्यास सांगणारे शास्त्रीजी

… वयाच्या दीड वर्षी वडील गमावल्यानंतर कित्येक मैल भर दुपारी अनवाणी चालत काॅलेजला जाणारे शास्त्रीजी

… पुस्तके डोक्यावर बांधून दररोज दोन वेळा नदी पोहून शाळेत जाणारे शास्त्रीजी

… एका रेल्वे अपघातात अनेक जणांना जीव गमवावा लागल्यामुळे  स्वत:ला जबाबदार ठरवत रेल्वेमंत्री पदाचा राजीनामा देणारे शास्त्रीजी

… गरीब लोकांची घरे पाडावी लागू नये म्हणून घरी पायी जाणारे पंतप्रधान शास्त्रीजी 

… पंतप्रधान असताना मुलाच्या काॅलेज अर्जावर आपला हुदा सरकारी कर्मचारी लिहिणारे शास्त्रीजी

… पाकिस्तानला सर्वात प्रथम पाणी पाजणारे, जय जवान जय किसान जयघोष करत सैनिकांसाठी पुर्ण देशासोबत दर सोमवारी उपवास करणारे शास्त्रीजी 

… पंतप्रधान असताना खासगी कामासाठी सरकारी गाडी वापरल्यावर लगेच त्याचे पैसे सरकारी तिजोरीत जमा करणारे शास्त्रीजी.

मृत्यू नंतर त्यांच्या नावावर घर जमीन मालमत्ता काहीच नव्हते, होते फक्त फियाट घेण्यासाठी घेतलेले कर्ज. आणि बँकेने ते कर्ज शास्त्रीजींच्या पश्चात त्यांच्या पत्नीकडून वसूल केले.

साध्या पण निग्रही, मृदु स्वभावाचे पण कर्तव्यकठोर वृत्तीचे, सगळ्यात कमी कालावधीत मोठा प्रभाव टाकणारे आपले दुसरे पंतप्रधान लालबहादुर शास्त्रीजी, ….  त्यांना अनंत दंडवत….

प्रस्तुती : श्री अनंत केळकर.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ मी मज हरवून बसले गं… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ मी मज हरवून बसले गं… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

कालिंदीची तटी  एकांती असता…

जळी पाहता पाहता मी मजला विसरून गेले गं..

प्रतिबिंबात माझ्या दिसे मज निळा सावळा कान्हा..

जलही झाले निश्चल तन मनात रुतले रूपही सुंदर..

मी तू पणाचे भान हरपले अद्वैताचे निधान गवसले…

कुठली राधा कुठला कृष्ण प्रेमभावनेचे उदीत उष्ण…

धुन मंजुळ बासरीची धुंद झाल्या लहरी लहरी..

श्यामल वर्णाचा शेला नभी पांघरला..

अन आज राधा नाही गेली घराला..

हुंबरती वासरे गोठयाला डोळे लावूनी वाटेला..

सासवेचा राग तो तांबडालाल झाला..

अनयाचे कुंकुमतिलकाचे नाव संसाराला

हद्द झाली  राधेची कान्हाने संसार तो नासला ..

  असे फुकाचे बोल कितीही लाव लाविला… परी

राधेच्या जिवनी तो कृष्ण एकची ठसावला…

राधा दामोदर आले नावरुपाला . .

©  नंदकुमार पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ जागतिक मानसिक आरोग्य दिन (दहा ऑक्टोबर)… ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

सुश्री विभावरी कुलकर्णी

🌸 विविधा 🌸

जागतिक मानसिक आरोग्य दिन (दहा ऑक्टोबर)… ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

१० ऑक्टोबर १९९२ रोजी प्रथम हा दिवस साजरा करण्यात आला. माणसाला जसे शरीरिक आजार होतात तसे मानसिक व्याधी सुद्धा होत असतात.पण या वैयक्तिक पातळीवर असल्याने लवकर दिसून येत नाहीत.

आपण मुलांच्या विषयी विचार करु. व काही छोट्या छोट्या गोष्टीं मधून मुलांचे आरोग्य लहानपणी पासूनच योग्य राखू या.

मुलांचे मानसिक आरोग्य मुलांना सुद्धा मानसिक ताण असतात.कोणत्या प्रकारचे ताण असतात बघू या.

लहान बाळाला काहीतरी करून दाखवायला लावणे .

बोलायला लावणे.

पाहुण्यांच्या समोर वस्तू दाखवायला लावणे.

वेगवेगळ्या कृती करायला लावणे.

बडबड गीते म्हणायला लावणे.

 लहान वयातच शाळा,पालक,समाज त्यांच्या कडून मोठ्या अपेक्षा ठेवतात.

बरेचदा पालक दुसऱ्या मुलांच्या बरोबर तुलना करतात.

काही पालक सतत मुलांची काळजी करतात.

या मुळे मुलांवर ताण येतो.आपल्या साठी या सगळ्या सोप्या गोष्टी असल्या तरी मुलांच्या साठी मनावर ताण आणणाऱ्या परीक्षा असतात.काही मुले तर आईला काळजी वाटेल हा विचार सतत करतात आणि त्यातून स्वकेंद्री होतात.आपण एखादी गोष्ट केली तर आईला काय वाटेल या मानसिक दबावाखाली असतात.कधी घरात मतभेद असतील आणि मुलांच्या समोर भांडणे होत असतील तर मुले कोमेजून जातात.

मग अशी मुले अबोल होतात.सगळे येत असून व्यक्त होत नाहीत.आणि या गोष्टीची आई वडील जास्त काळजी करतात.असे एक वर्तुळ तयार होते.आपल्याला हेच वर्तुळ मोडायचे आहे.त्या साठी काही गोष्टी आपल्याला करायच्या आहेत.त्या बघू या.

मुलांना रिलॅक्स व्हायला मदत करायची त्या साठी पुढील गोष्टी करु शकतो

१) चित्रे काढणे

२) चित्रे रंगवणे

३) डान्स करणे

४) व्यायाम करणे

५) मॉर्निग/इव्हिनिंग वॉक

६) त्यांच्याशी गप्पा मारणे

घरातील वातावरण

१) मुलांच्या समोर वाद करु नयेत

२) घरात एकमेकांशी सुसंवाद असावा.

३) सर्वांनी एक वेळेस तरी एकत्र जेवावे

४) जेवताना आनंदी विषय बोलावेत

५) घरात हास्य विनोद असावेत.

६) एकमेकांशी सुसंवाद असावा

मुलांना ताणा मधून बाहेर कसे यायचे ते शिकवणे

१) हे शिकवणे न कळत व्हायला हवे.

२) त्या साठी कोणतीही गोष्ट मुलांनी प्रथम घरात सांगण्यासाठी त्यांच्या मनात विश्वास निर्माण करायला हवा.

३) मुलांशी मोकळे पणाने संवाद साधावा.

४) कोणत्याही परिस्थितीत मी तुझ्या सोबत आहे हा विश्वास त्यांना द्यायला हवा.

अभ्यास विषयक मानसिकता बदलणे

१) मोठ्या माणसांनी टीव्ही,मोबाईल किंवा अन्य गोष्टी बघत “तू अभ्यास कर” असे मुलांना सांगणे टाळावे.

२) आपण अभ्यास करु असे म्हणावे.

३) अभ्यासातून मधे ब्रेक द्यावा.थोडा वेळ खेळू द्यावे किंवा आवडीची गोष्ट करु द्यावी.

मुलांना मोकळे पणाने बोलण्याची संधी द्यावी.

म्हणजे ते त्यांच्या भावना विचार व्यक्त करु शकतील.व त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण होईल.

मुलांप्रती प्रेम व्यक्त करणे

प्रेम तुमच्या मुलांना कधीच बिघडवत नसते तर त्यांना चांगल माणूस होण्यास मदत करते. जर तुमचे तुमच्या मुलावर प्रेम असेल तर ते मुलाला दाखवा. त्याच्यासमोर ते व्यक्त करा. जेणेकरून तुमच्या मुलांना हे समजेल आणि पुढे जाऊन याची त्याला जाणीव होईल. आपल्या मुलावर प्रेम करणे, त्याला मिठी मारणे, त्याच्यासोबत वेळ घालवणे आणि दररोज त्यांच्या समस्या गांभीर्याने ऐकणे इतके सोपे असू शकते. यामुळे मुलांच्या शरीरात ऑक्सिटोसिनसारखे फील-गुड हार्मोन्स वाढतात आणि यामुळे त्यांना आनंदी आणि सकारात्मक माणूस बनण्यास मदत होते.

मुलांना समाजिक राहण्यास मदत करणे

मुलांच्या मानसिक विकासासाठी तुम्ही त्यांना सामाजिक राहण्यास सांगणे आवश्यक आहे. यासाठी त्यांची लोकांशी ओळख करून द्या आणि त्यांच्याशी बोलायला शिकवा. त्यांना त्यांच्या मित्रांसमोर आणि नातेवाईकांसमोर मोकळेपणाने वागायला शिकवा. तसेच त्यांना बाहेरची कामे करू द्या. यामुळे ते बाहेरील लोकांशी मोकळेपणाने वागायला शिकतील आणि त्यामुळे त्यांचा आत्मविश्वासही वाढेल. अशा प्रकारे ते सामाजिकदृष्ट्या मजबूत बनतील.

त्यांच्या समस्या त्यांना सोडवू द्या

मुलांना त्यांच्या समस्या स्वतः सोडवू द्या.

यामुळे मुलांमध्ये सकारात्मक बदल अनुभवायला मिळतात. मुलांना त्यांना त्यांच्या परिस्थितीला स्वतःहून सामोरे जाण्यास शिकवा. याचा सकारात्मक बदल तुम्हाला पाहायला मिळेल.

यानंतर त्यांच्यासमोर कोणतीही समस्या आली तर ते मानसिक आजारी होणार नाहीत, तर समस्या समजून घेऊन त्याशी लढा देतील.

मुलांना शॉपिंगला न्यावे

हे सध्या बऱ्याच घरात होते.पण जे करत नसतील त्यांनी जरुर सुरुवात करावी.मोठ्यांच्या किंवा घरातील वस्तू घेताना सुद्धा त्यांचे मत विचारावे.

अशा काही गोष्टी करुन मुलांमधील आत्मविश्वास वाढवू.व त्यांना मानसिक सशक्त होण्यास मदत करु.

© सुश्री विभावरी कुलकर्णी

हिलिंग, मेडिटेशन मास्टर, समुपदेशक.

सांगवी, पुणे

मोबाईल नंबर – ८०८७८१०१९७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “पितृपक्ष… नवा विचार…” ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

??

☆ “पितृपक्ष… नवा विचार…” ☆ सौ राधिका भांडारकर 

गणपती बाप्पाचे विसर्जन होते आणि त्यानंतरचा पुढचा पंधरवडा पितृपक्ष म्हणून मानला जातो. 

भाद्रपद महिन्यातल्या कृष्ण पक्षातले हे पंधरा दिवस पितरांच्या स्मरणार्थ व्यतीत केले जातात. 

आत्मा अमर आहे हे आपण मानतो.  तसेच मृतात्म्यांचे ऋणानुबंध,  मृत्यूनंतरचे अस्तित्व, या संकल्पनांनाही आपण नाकारत नाही.  आयुष्य जगत असताना कधी कधी असे अनुभव येतात की अशा अतिंद्रिय घटनांचाही विचार करावा लागतो.  कित्येक वेळा, ही सारी पूर्वजांची पुण्याई असे उद्गारही मुखातून निघतात.  याचाच अर्थ कुठल्याशा अदृश्य अस्तित्वाला आपण मनाशी बाळगतो.  त्याच्याशी आपण जोडले जातो. 

आपले पूर्वज  हे आपलं मूळ असतं. (ओरिजिन).  शास्त्रीय दृष्टीने सुद्धा त्यांचे जीन्स,  क्रोमोझोम्स,  पेशी या आपल्या शरीरात जन्मत:च स्थित  असतात.  आणि याच बरोबर आपल्यातले गुण, स्वभाव ,आवडीनिवडी, आपलं कर्तृत्व,  आपल्या जगण्याच्या,  विचार करण्याच्या दिशा या याच धाग्यांची निश्चितपणे निगडित असतात.  ज्याला आपण जन्मजात गुण असेही म्हणतो. 

आपले सण, आपले उत्सव  हे ऋतूचक्र आणि शास्त्रीय विचारांवरच आधारलेले आहेत.  आणि बहुतांशी ते साजरे करत असताना निसर्गाच्या पंचतत्वांशी कृतज्ञता व्यक्त करणे हेच केंद्रस्थानी असते.  पितृपक्ष हा असा पंधरवडा आहे की,तो पाळण्यामागे  आज या जगात आपण ज्यांच्यामुळे जन्म घेतला आहे त्यांचे स्मरण आणि कृतज्ञता व्यक्त करणे हेच अपेक्षित आहे.  पितृपक्ष मानण्याचा हा एक मुख्य हेतू आहे.

आपण वरचेवर एकमेकांना थँक्यू सॉरी म्हणतच असतो ना?  मग जे आपल्या जीवनात होते आणि आज नाहीत, शिवाय ज्यांना आपण बघितलेही नाही, पण त्यांच्या कथा मौखिक पद्धतीने आपण ऐकत आलो आहोत,  त्या सर्व पितरांसाठीही अंतःकरणापासून आपल्याला थँक्यू म्हणायचं आहे.  त्याच वेळी सॉरीही म्हणायचं आहे. कारण अनेक वेळा आपण त्यांना नकळतपणे दुखावलं आहे.  त्यांचा अवमान केलेला आहे.  त्यांची आबाळहीआपल्या हातून झालेली आहे,  म्हणून या अदृश्य आत्म्यांना मनापासून सॉरी म्हणून पुढच्या  पिढीलाही संदेश द्यायचा आहे की, बुजुर्गांचा, वाडवडिलांचा ते असतानाच मान ठेवायला हवा.  त्यांनी जे कष्ट आपल्यासाठी उपसले आहेत त्याची जाणीव ठेवायला हवी.  आमच्या हातून ज्या  चुका झाल्या त्या तुमच्या हातून होऊ नये.. असे रचनात्मक संस्कार पुढच्या पिढीवर या पितृपक्षाच्या निमित्ताने करावेत.

दर्भाहुती,  तर्पण, अग्नि कुंडातला घास, यामागे विकारांचे दहन आणि झालेल्या चुकांसाठी क्षमायाचना  हाच उद्देश जाणावा. 

भाद्रपद महिना हा पशु पक्षांचा जनन काळ असतो.  (ब्रीडिंग सीजन ), कावळ्याच्या विष्ठेतून वड, पिंपळ वृक्षांचे पुन्हा पुन्हा नैसर्गिकरित्या बीजारोपण होत असते. म्हणूनच वृक्षासम सावली देणाऱ्या पूर्वजांना कावळ्याच्या मुखातून घास भरवून  निसर्गवर्धनाची  भूमिका जाणून घ्यावी.

ही  अंधश्रद्धा नसून मनातल्या अबोल भावनांना व्यक्त करण्याचं हे एक साधन आहे.  आणि आपलं जीवन सार्थ, सुखी आणि सुरक्षित करणारे एक माध्यम आहे असा सकारात्मक विचार करून पितृपक्षाची ही परंपरा यथाशक्ती राखावी असे मला वाटते. 

या काळात शुभकार्य करू नयेत, वाहन खरेदी, वस्त्र खरेदी, गृह खरेदी करू नये, प्रवास करू नयेत या संकल्पनांचा मात्र नक्की पुनर्विचार व्हायला हवा. पितृपक्ष या काळाला अशुभ  कशासाठी मानायचे यावर चर्चा व्हावी. या संकेतांना कितपत महत्व द्यावं हे व्यक्तीगत असावं.

आणखी एक विचार मांडावासा वाटतो की, ग्लोबलायझेशन झाले आणि जीवनपद्धतींची देवाणघेवाण झाली. त्यात मदर्स डे, फादर्स डे साजरे होऊ लागले.  मग आपली ही पितृपक्ष परंपरा,  मातृ-पितृ दिन, फादर्स डे, फोर फादर्स डे म्हणून मानायला काय हरकत आहे? घरातल्या वृद्ध बुजुर्ग मंडळींचा सन्मान त्यांच्या हयातीतच या दिवसात का करू नये? स्वर्गस्थांचे स्मरण आणि हयातांचा सन्मान पितृपक्षात जाणीवपूर्वक व्हावा  यात न पटण्यासारखे काय आहे?

© सौ. राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७

मो. ९४२१५२३६६९

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘भाषांतर दिन’… लेखक – अज्ञात ☆ सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

? इंद्रधनुष्य ?

☆ ‘भाषांतरदिन…’ – अज्ञात ☆ सौ. गौरी गाडेकर

विसाव्या शतकाच्या पूर्वार्धापासून भारतातून फारसी भाषेचं महत्त्व कमी होत गेलं. पण त्यापूर्वीच भारतातील असंख्य ग्रंथांची भाषांतरं फारसीत झालेली होती. हीच भाषा होती जिच्यामुळे भारतीय भाषेतल्या साहित्याची मौलिकता पाश्चिमात्त्यांना कळली. ‘सिरीं-ए-अकबर’ या नावानं दारा शिकोहनं पासष्ट उपनिषदांचं फारसीत भाषांतर केलं होतं. त्याच्या प्रस्तावनेत तो म्हणतो, ” ही उपनिषदं म्हणजे अद्वैताची भांडारं होत. मी त्यात काहीही फेरबदल न करता शब्दशः भाषांतर केलं आहे.” 

‘सिरीं ए अकबर’ एका फ्रेंच प्रवाश्याच्या हातात पडलं. त्याचं नाव होतं आंकतिल द्युपेरां. त्यानं ते फ्रेंचमध्ये आणि लॅटिनमध्ये केलं. ते आर्थर शॉपेनहॉअरसारख्या लेखकाच्या हातात पडल्यावर तो आनंदानं वेडा झाला. 

दारा शिकोहनं बरीच पुस्तकं लिहिली. सूफी आणि हिंदू तत्त्वज्ञानातील सामायिकतेचा तो शोध होता. त्यानंच योगवसिष्ठ आणि प्रबोधचंद्रिकेचं भाषांतर केलं. तसेच भगवतगीतेचं भाषांतर ‘मज्मुअल बहरैन’ या नावानं केलं होतं. 

अकबरानं तर भाषांतरासाठी खातंच सुरु केलं होतं. त्याच्या काळात रामायणाची बरीच भाषांतरं झाली. अब्दुल कादर बदायुनी आणि नकीबखाननं केलेल्या भाषांतरांत चक्क मध्यपूर्वेतल्या दंतकथा आणि संदर्भही आले होते. ही भाषांतरं म्हणजे मूळ संहितेची पुनर्कथनं होती. याच काळात मुल्ला मसीह कैरानवीनं स्वतंत्रपणे रामायणाचं भाषांतर केलं. मुल्ला शेरी आणि नकीबखाननं महाभारताचं ‘रज्मनामा’ या शीर्षकानं भाषांतर केलं. ते जयपूरच्या संग्रहालयात पाहता येतं. बदायुनीनंनं सिंहासनबत्तिशी ‘नामां-ए-खिरद अफ़जा’ या नावानं फारसीत नेलं (१५७५). मुल्ला शेरीनं हरिवंशाचंही भाषांतर केलं होतं. बदायुनी, हाजी इब्राहिम आणि फैजी या तिघांनी मिळून अथर्ववेदाचं भाषांतर १५७६ साली केलं होतं. सगळ्यात रोचक म्हणजे यातला फैजी हा सर्जक कवी होता. त्याला नलदमयंती आख्यान अतिशय आवडलं होतं. सोळाव्या शतकाच्या अखेरीला (१५९५) त्यानं ते ‘नलदमयंती’ या नावानं भाषांतरित केलं. 

दक्षिणेत गोवळकोंड्याचा अकबरशहा (१६७२-८७) हा साहित्यप्रेमी होता. (तो गुलबर्ग्याचे संत बंदेनवाज गेसूदराज यांचा वंशज). त्याला तेलुगू, हिंदी, संस्कृत, पर्शिअन, दखनी या भाषा येत. त्यानं ‘शृंगारमंजिरी’ हा ग्रंथ लिहिला. त्यासाठी त्यानं रसमंजिरी, आमोद, परिमल, शृंगारतिलक, रसिकप्रिय, रसार्णव, प्रतापरुदीय, सुंदरशृंगार, दशरूपक या हिंदी-संस्कृत ग्रंथांचा आधार घेतला होता. मूळ ग्रंथ तेलुगूत लिहून त्यानं तो संस्कृतमध्ये नेला. त्याची प्रत तंजावरच्या म्युझियममध्ये पाहता येते. 

भारतात सोळाव्या-सतराव्या शतकांत हजारो फारसी ग्रंथ लिहिले गेले. त्यातल्या काही बखरी आहेत, राज्यकारभाराचे वृत्तांत आहेत. बादशहांची चरित्रं आहेत. प्रवासवर्णनं आहेत. पर्यावरण, औषधीविज्ञान, इतिहास, दास्तां असा त्यांचा विस्तार आहे. 

त्या सगळ्या भाषांतरकर्त्यांचंही आजच्या दिवशी स्मरण….. 

.

शहाजहान आणि दाराशिकोहचं रेम्ब्रांनं केलेलं ड्रॉईंग खाली दिलेले आहे. 

 सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ‘ळ‘ चा लळा… ☆ प्रस्तुती – श्री सुहास सोहोनी ☆

श्री सुहास सोहोनी

? वाचताना वेचलेले ?

☆ ‘ळ‘ चा लळा…☆ प्रस्तुती – श्री सुहास सोहोनी ☆

ल आणि ळ ही दोन स्वतंत्र अक्षरे. या दोन अक्षरांचे उच्चार जवळपास पूर्ण मिळते जुळते.

त्यामुळे अनेकदा ळ चा उच्चार काही लोक सहजपणे ल सारखा पण ल नाही, * ल * व  *ळ * च्या मधला करतात. तर काही वेळेस  ल  करतात. ल हा उच्चार जगातील सर्व भाषांमधे आहे.

पण ळ हा उच्चार भारताबाहेर फक्त  नेपाळमधे आहे, बाकी जगात कोठेही नाही.

भारतातदेखील ळ हा उच्चार सर्वत्र नाही.

संस्कृतमधे सध्या ळ नाही. हिंदी, बंगाली, आसामी मधे ळ नाही. सिंधी, गुजराती मधे ळ आहे,पण माझ्या अंदाजानुसार फारसा वापरात नाही. मराठी व दक्षिण भारतातील सर्व भाषात ळ आहे व वापर भरपूर आहे.

ल व ळ च्या उच्चारातील सारखेपणामुळे ळ च्या ऐवजी ल बोलले लिहिले तर कुठे बिघडते ? असे अनेकांना वाटत असेल कदाचित. हिंदीत कमल व मराठीत कमळ … ल काय , ळ काय..काय फरक पडला?

पण तसे मराठीत होत नाही. ल की ळ यावरून अर्थामध्ये  फरक पडतो.

काही शब्द पाहू…. 

अंमल – राजवट // अंमळ – थोडा वेळ

वेळ  time //  वेल- झाड, सायलीचा वेल वगैरे

खल- गुप्त चर्चा किंवा खलबत्ता मधील खल //  खळ- गोंद

पाळ – कानाची पाळ //  पाल -. सरडा, पाल वगैरे

नाल.- घोड्याच्या बैलांच्या खुरांना मारतात ती धातूची पट्टी // 

नाळ – बाळ आईच्या पोटात असताना अन्न पुरवठा वगैरे करणारा बेंबीशी संबंधीत अवयव

कल – निवडणूकीचा कल, झुकाव //  कळ – वेदना,पोटातील कळ किंवा यंत्राचे बटण

लाल – लाल रंग // लाळ – थुंकी

ओल – पावसात भिंतीला येणारा ओलसरपणा // ओळ – रेघ

मल – शौच //  मळ – कानातला, त्वचेचा मळ ..  यापासून गणपती झाला.

माल – सामान //  माळ – मण्यांची माळ, हार

चाल – चालण्याची ढब .. त्याची चाल ऐटदार आहे वगैरे // चाळ –  नर्तकीच्या पायातील घुंगरांचा दागिना

दल.- राजकीय पक्ष, संघटना .. जनता दल, पुरोगामी लोकशाही दल // 

दळ – भाजी अथवा फळाचा गर , वांग्याचे दळ वगैरे

छल.- कपट //  छळ – त्रास

काल – yesterday //  काळ – कालखंड वगैरे, मृत्यु

गलका – ओरडा आरडा //  गळका – पाण्याचा पाईप लिकेज असणे वगैरे

 

…. तरी आपली भाषा जपा… इंग्रजी, हिंदीचे आक्रमण रोखा.

इंग्रजी, हिंदीच्या नादी लागून थाळीला थाली म्हणू नका.

खाली म्हणजे वरतीच्या विरुद्ध under, down,

हिंदीत.खाली म्हणजे रिकामे

मराठीत गाडी रिकामी होते.. खाली होत नाही.

 

ळ अक्षर नसेल तर पळ वळ मळ जळ तळ .. ह्या क्रिया कशा करणार ?

तिळगुळ कसा खाणार ?.. टाळे कसे लावणार ?.. बाळाला वाळे कसे घालणार  ?

चाळे कसे करणार ? .. घ डया ळ नाही तर सकाळी डोळे कसे  उघडणार  ?

वेळ पाळण।र कशी ?

मने जु ळ ण।र कशी ?.. कोणाला गळ कशी घालणार ?

तळे भरणार कसे ?.. नदी सागराला मिळणार कशी ?

हिवाळा उन्हाळा पावसाळा .. नाही उन्हाच्या झळा.. नाही पागोळ्या

 

कळी कशी खुलणार  ?.. गालाला खळी कशी पडणार ?.. फळा शाळा मैत्रिणींच्या गळ्यात गळा

सगळे सारखे.. कोण  निराळा ?

दिवाळी होळी सणाला  काय ?.. कड़बोळी पुरणपोळी ओवाळणी पण नाही ?

भोळा सांब सावळा श्याम.. जपमाळ नसेल तर कुठून रामनाम ?

मातीची ढेकळे नांगरणार कोण.. ढवळे पवळे बैल जोततील कोण ?

निळे आकाश , पिवळा  चाफा.. फळा फुलानी बहरलेला .. नारळ केळी जांभूळ  आवळा 

 

काळा  कावळा पांढरा बगळा

ओवळी बकुळी वासाची फुले.. गजरा  माळणे होईल पारखे

अळी मिळी गुपचिळी .. बसेल कशी दांतखिळी

नाही भेळ नाही मिसळ.. नाही जळजळ नाही मळमळ

पोळ्या लाटल्या जाणार नाहीत .. टाळ्या आता वाजणार  नाहीत

जुळी तिळी होणार नाहीत.. बाळंतविडे बनणार नाहीत

तळमळ कळकळ वाटणार  नाही.. का ळ जी कसलीच  उरणार नाही.. 

.. पाठबळ कुणाचे  मिळणार  नाही

 

* ळ * जपा .. !

मराठीचे सौंदर्य जपा…!  

“ ळ “ शिवाय सगळेच  * बळ * निघून जाईल आणि काहीच कळेनासे होईल..!! 

” कळलं ” ?? 

संग्राहक – सुहास सोहोनी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares