ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ ५ नोव्हेंबर – संपादकीय – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

प्राचीवरती सूर्य उगवला

अथांग सागर पुढे पसरला

पाण्यावरच्या लाटांसह हा 

जीवनसागर भासे मजला 

 – नीलांबरी शिर्के

? || शुभ दीपावली || ?

 

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? ५ नोव्हेंबर –  संपादकीय  ?

आज ५ नोव्हेंबर-— चोखंदळपणे एका वेगळ्याच वाटेवरून जात, मराठी साहित्यात निसर्गसाहित्याची अनमोल भर घालणारे वन्यजीव अभ्यासक श्री. मारुती चितमपल्ली यांचा आज जन्मदिन.( सन १९३२ ) वनाधिकारी म्हणून ३६ वर्षे केलेल्या नोकरीसह आयुष्यातली ६५ वर्षे जंगलांच्या सान्निध्यात राहून, तेथील प्राणीजीवन , आणि त्या जीवनातले बारकावे टिपून, ते आपल्या अतिशय ओघवत्या शैलीत, बारकाव्यांसहित रेखाटणारे त्यांचे लेखन वाचकांना आवडायलाच हवे असेच— याचे कारण असे की, याविषयीच्या तपशीलवार माहितीला त्यांच्या लालित्यपूर्ण लेखनशैलीचे सुंदर कोंदण लाभलेले आहे. 

“ क्षणोक्षणी पडे, उठे परि बळे, उडे बापडी —-” ही कविता आपल्यापैकी बऱ्याच जणांनी शाळेत शिकलेली आहे. पण त्यातले अतीव कारुण्य मनाला अतिशय भिडल्यामुळे जंगलातील पक्ष्यांबद्दल कमालीची आस्था आणि ओढ वाटून, त्या प्राणी-पक्षी यांच्या विश्वाची सखोल माहिती मिळवायची, आणि जनसामान्यांपर्यंत ती आपल्या लिखाणाच्या माध्यमातून पोहोचवायची, हाच आयुष्यभराचा ध्यास घेणारे श्री. चितमपल्ली हे एक विरळेच व्यक्तिमत्व. घरच्यांबरोबर रानवाटा तुडवता तुडवता त्यांना लहानपणापासूनच पक्ष्यांची आणि वन्य प्राण्यांची खूप माहिती मिळाली होती. आणि त्याच जोडीने त्याबाबतच्या त्यांच्या मामाच्या अंधश्रद्धाही समजल्या होत्या. पण चितमपल्ली यांचे वैशिष्ट्य हे की, स्वतः अशा कुठल्याही अंधश्रद्धेचा बळी न होता, त्या माहितीचा त्यांनी संशोधनासाठी उपयोग केला. वने, वन्यप्राणी, वन्यजीव व्यवस्थापन, पक्ष्यांचे विशाल जग, याविषयी त्यांनी उल्लेखनीय संशोधन केले आणि आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये त्यासंदर्भात निबंध-वाचनही केले. नोकरीदरम्यान विख्यात पक्षीतज्ज्ञ डॉ.सलीम अली यांच्यासोबत त्यांनी अनेक ठिकाणची जंगलं अक्षरशः पिंजून काढली होती. आणि पुढे  वन्यजीवन संवर्धनासाठी जनजागृती व्हावी म्हणून चळवळही सुरु केली होती. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे संचालकपदही त्यांनी भूषवलेले आहे. राज्य वन्यजीव संरक्षण सल्लागार समितीचे ते सदस्य होते. सन २००६ मध्ये सोलापूर येथे झालेल्या ८३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. 

त्यांचे एक खूप मोलाचे काम म्हणजे, त्यांनी जंगल आणि त्याभोवतीचे विश्व यातील कितीतरी घटकांना नवी नावे दिली. या मूळ तेलगूभाषिक माणसाने मराठीच्या समृद्ध शब्दवैभवात आणखी सुमारे एक लाख शब्दांची मोलाची भर घातलेली आहे. पक्षीशास्त्रातल्या अनेक इंग्लिश संज्ञांचे त्यांनी मराठी नामकरण केलेले आहे. उदा. कावळ्यांची वसाहत- ज्याला इंग्लिशमध्ये rookery असे म्हणतात, त्याला त्यांनी ‘ काकागार ‘ असे समर्पक नाव दिले. तसेच ‘ सारंगागार ‘ हे बगळ्यांसारख्या पक्षांच्या विणीच्या जागेचे नाव. फुलांच्या बाबतीत घाणेरीला ( टणटणी ) 

‘ रायमुनिया ’, बहाव्याला ‘ अमलताश ‘ ही नावे त्यांच्यामुळेच लोकांना माहिती झाली आहेत. 

“ आनंददायी बगळे “ ( संस्कृत साहित्यातील काही पक्षी ), “ घरट्यापलीकडे “, “ जंगलाचं देणं “,

“ निसर्गवाचन “, “ पक्षीकोश “, “ रानवाटा “, “ शब्दांचं धन “, अशी त्यांची कितीतरी पुस्तके प्रसिद्ध झालेली आहेत. यापैकी “ पक्षी जाय दिगंतरा “ ही  त्यांची अतिशय प्रसिद्ध साहित्यकृती आहे. 

त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्यापैकी काही असे—भारती विद्यापीठाचा जीवनसाधना पुरस्कार, सहकार महर्षी साहित्य पुरस्कार, ‘ रानवाटा ‘ या पुस्तकासाठी उत्कृष्ट साहित्यनिर्मितीचा राज्य पुरस्कार, भैरू रतन दमाणी साहित्य पुरस्कार, म. रा. मराठी विभागाकडून ‘ विं.  दा. करंदीकर जीवनगौरव पुरस्कार “, “ १२ व्या किर्लोस्कर चित्रपट महोत्सवाचा जीवनगौरव पुरस्कार “ इ .  

पुण्याची ‘अडव्हेंचर’ ही गिर्यारोहण संस्था ‘ मारुती चितमपल्ली निसर्गमित्र पुरस्कार ‘ देत असते. 

“ मारुती चितमपल्ली : व्यष्टी आणि सृष्टी “ हे पुस्तक त्यांच्यावर लिहिले गेले आहे. 

विशेष सांगायला हवे ते हे की, मराठी, तेलगू, गुजराती, उर्दू, जर्मन, आणि रशियन एवढ्या भाषा तर त्यांना अवगत होत्याच, पण परंपरागत पद्धतीने संस्कृत साहित्याचा अभ्यास केलेला असूनही, वयाच्या ८४ व्या वर्षी  कालिदास संस्कृत विद्यापीठाचा “ प्राचीन भारतीय साहित्यातील पर्यावरण “ हा प्रमाणपत्र अभ्यासक्रम त्यांनी पूर्ण केला. 

असं विविधांगी व्यक्तिमत्व असणाऱ्या श्री. मारुती चितमपल्ली यांना आजच्या त्यांच्या जन्मदिनी अतिशय आदरपूर्वक वंदन.

☆☆☆☆☆

आज ज्येष्ठ साहित्यिका श्रीमती शकुंतला गोगटे यांचा स्मृतिदिन.( १९३० – ५/११/१९९१ ) श्रीमती गोगटे यांनी अनेक कादंबऱ्या, लघुकथा संग्रह असे विपुल लिखाण केलेले आहे. त्यांचे बरेचसे लिखाण सामाजिक विषय डोळ्यांसमोर ठेवून केल्याचे जाणवते. त्यातही, पांढरपेशा मध्यमवर्गाचे जीवन रंगवलेले दिसते. बूमरँग, मर्यादा, सारीपाट, अभिसारिका, समांतर रेषा, त्याला हे कसं सांगू?, सावलीचा चटका, माझं काय चुकलं, मी एक शून्य, दोघी, मना तुझा रंग कसा, झंकार, ही आणि त्यांनी लिहिलेली इतर पुस्तके वाचकांच्या पसंतीस पूर्णपणे उतरलेली आहेत. त्या “ सर्वोत्कृष्ट स्त्री लेखिका “ म्हणून ओळखल्या जात होत्या.

श्रीमती शकुंतला गोगटे यांना भावपूर्ण श्रद्धांजली ?

☆☆☆☆☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

ई – अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ : – १) कऱ्हाड शिक्षण मंडळ “ साहित्य-साधना दैनंदिनी. २) माहितीस्रोत — इंटरनेट 

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ दृष्टिकोन ☆ संग्राहक – सौ.अस्मिता इनामदार

सौ.अस्मिता इनामदार

? इंद्रधनुष्य ?

☆ इंद्रधनुष्य ☆ दृष्टिकोन ☆ संग्राहक – सौ.अस्मिता इनामदार ☆ 

दृष्टिकोन किती महत्वाचा पहा……..गणित तर समजून घ्या…”मस्त आयुष्य जगण्याचा स्वस्त फंडा – एक मजेशीर गणित”  पहा, सोडवा किंवा सोडून द्या,  पण आनंद जरूर घ्या.*

आपण असे मानू या की….

A, B, C, D, E, F, G, H, I, J, K, L, M, N, O, P, Q, R, S, T, U, V, W, X, Y, Z = अनुक्रमे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26.

म्हणजेच A=1, B=2, C=3 

असे मानले तर माणसाच्या कोणत्या गुणाला पूर्ण शंभर गुण मिळतात हे पाहू या….

आपण असे म्हणतो की, आयुष्यात  “कठोर मेहनत/ HARDWORK” केले तरच आयुष्य यशस्वी होते.

आपण “HARDWORK चे गुण पाहु या. H+A+R+D+W+O+R+K = 8+1+18+4+23+15+18+11 = 98% आहेत पण पूर्ण नाहीत.

दुसरा महत्त्वाचा गुण म्हणजे  “ज्ञान” किंवा ‘Knowledge’.

याचे मार्क्स पाहु या

K+N+O+W+L+E+D+G+E = 11+14+15+23+12+5+4+7+5= 96% हे पहिल्या पेक्षा कमी. 

काही लोक म्हणतात  “नशीब”/ LUCK हेच आवश्यक. तर लक चे गुण पाहु या.

L+U+C+K = 12+21+3+11 = 47%,–“नशीब” तर एकदमच काठावर पास.

काहींना चांगले आयुष्य जगण्यासाठी  “पैसा/MONEY” सर्व श्रेष्ठ वाटतो. तर आता “M+O+N+E+Y=किती मार्क्स?

 13+15+14+5+25= 72%, पैसा ही पूर्णपणे यश देत नाही.

बराच मोठा समुदाय असे मानतो की,  “नेतृत्वगुण/ LEADERSHIP” करणारा यशस्वी आयुष्य जगतो.  नेतृत्वाचे मार्क्स =

12+5+1+4+5+18+19+8+9+16= 97%, –बघा लीडर ही शंभर टक्के सुखी, समाधानी नाहीत, आनंदी तर अजिबात नाहीत.

मग आता आणखी काय गुण आहे, जो माणसाला १००% सुखी, समाधानी आणि आनंदी ठेऊ शकतो?  काही कल्पना करू शकता?…… नाही जमत?—-

मित्रांनो, तो गुण आहे, आयुष्याकडे पाहण्याचा “दृष्टिकोन/ATTITUDE” 

आता एटिट्यूड”चे आपल्या कोष्टका नुसार गुण तपासू… 

A+T+T+I+T+U+D+E = 1+20+20+9+20+21+4+5= 100%.— पहा– आयुष्यातील सर्व समस्यांचे निराकरण करून सुखी, समाधानी आणि आनंदी आयुष्य जगण्याचा स्वस्त फंडा आहे, ‘आपला आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन’. तो जर सकारात्मक असेल तर आयुष्य  १००% यशस्वी  होईल आणि आनंदी ही होईल.

“दृष्टिकोन बदला आयुष्य बदलेल”

संग्राहक : अस्मिता इनामदार

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ आदिशक्ती चंडिका देवी –  पाटणा ☆ संग्रहिका – सुश्री संगीता कुलकर्णी

सुश्री संगीता कुलकर्णी

? इंद्रधनुष्य ? 

☆ आदिशक्ती चंडिका देवी –  पाटणा ☆ संग्रहिका – सुश्री संगीता कुलकर्णी ☆ 

नवरात्रीचे नऊ दिवस हा शक्तिदेवीचा कालखंड म्हणूनच ओळखला जातो. अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून ते अश्विन शुद्ध नवमीपर्यंत हा महोत्सव चालतो. हा नऊ रात्रींचा कालखंड म्हणून “नवरात्र उत्सव” म्हटला जातो..हा नऊ दिवस आदिशक्तीची आराधना करण्याचा आहे.. नवरात्रीत  देव्हाऱ्यात अखंड नंदादीप, दररोज झेंडूच्या फुलांची माळ, देवीपुढे सप्तशतीचा पाठ अशा प्रकारे शारदीय नवरात्री व्रत केले जाते..

पाटणा— आदिशक्ती चंडिका देवी

श्री चंडीकादैव्यै नमो नमः

पाटणादेवी हे ठिकाण महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील चाळिसगाव पासून १८ कि.मी. अंतरावर असलेले निसर्गाच्या कुशीत वसलेले जागृत आदिशक्ती चंडिकादेवीचे पूर्वाभिमुख असलेले हेमाडपंथी पुरातन मंदिर…हे आदिशक्तीचे मंदिर बाराव्या शतकात उभारले गेले आहे.  राज्यातील हेमाडपंथीय मोठ्या मंदिरांमध्ये त्याची गणना होते. १०ते १२ फूट उंच चौथ-यावर त्याची रचना पूर्वाभिमुख करण्यात आलेली आहे. गाभारा चंद्राकृती असून त्याला अठ्ठावीस कोपरे आहेत तर गाभा-यातील सभामंडपामध्ये एक पुरातन शिलालेखही आहे. पाटणादेवीच्या या  मंदिरात असलेली देवीची मूर्ती खूपच भव्य आहे. प्रसन्नमुख असलेल्या देवीचे एकदा दर्शन घेवून समाधान तर होतच नाही तर पुन्हा पुन्हा देवीचे दर्शन घ्यावेसे वाटते… देवीचा प्रसन्न व हसतमुख चेहरा पाहून आपण आपले भानच विसरुन जातो…अत्यंत तेजस्वी असे रूप…. हे तेजस्वी रूप डोळ्यांत साठवत आपण तिच्या समोर नतमस्तक होतो.. 

मातेच्या मंदिरासमोर असलेल्या दोन भव्य दिपमाळा ही पाटणा देवी मंदिराची खास ओळख.. हे मंदिर सह्याद्री पर्वताच्या पायथ्याशी उंच चौथर्‍यावर धवलतीर्थापासून उगम पावलेल्या डोंगरी नदीच्या किनारी आहे… जवळच असलेल्या पाटणा या  गावाच्या नावामुळे हे ठिकाण पाटणादेवी या नावाने ओळखले जाते.. व ओळखले जाऊ लागले..  

आपण ज्या गावातून पाटणादेवी मंदिराकडे जातो ते गाव म्हणजेच पाटणा.. या गावाला ऐतिहासिक व पौराणिक असे महत्त्व आहे. भारताचे महान गणितज्ञ भास्कराचार्य यांची ही जन्मभूमी…

भास्कराचार्य यांच्या लीलावती ग्रंथाबद्दलची माहिती असलेला शिलालेखही येथे आहे. पाटणादेवीच्या मंदिरात बाराव्या शतकामधला एक शिलालेख आजही आपणांस  पाहावयास मिळतो… त्यावर भास्कराचार्यांची वंशावळ कोरलेली आहे. 

मंदिराजवळचा परिसर अतिशय नयनरम्य आणि मनमोहक निसर्ग सौंदर्याने बहरलेला आहे. तिन्ही बाजूने  सह्याद्रि पर्वताचे उंच उंच कडॆ, विविध वृक्ष- वनस्पती, डोंगरातून खळखळ वाहणारे पांढरेशुभ्र ओढे यामुळे मन अगदी मोहून जाते… 

मंदिराच्या चौथर्‍यावरुन मंदिराच्या भोवतालचा परिसर म्हणजे वनराईने नटलेले पर्वतांचे उंच उंच कडे, रंगीबेरंगी फुलाफळांनी बहरलेले वृक्ष, नागमोडी खळखळ वाहणारे पांढरेशुभ्र ओढे हे सर्व दृष्य पाहताना आपण स्वतःला पूर्णपणे विसरुन निसर्गाशी कधी  एकरुप होऊन जातो हे समजतचं नाही..! अश्या या रमणीय सौंदर्याने नटलेल्या ठिकाणचा इतिहास ही तितकाच ऎतिहासिक महत्वाचा आहे…

घनदाट जंगलातच पर्यटकांना मोहात टाकणारे केदारकुंड सर्वांनाच आकर्षित करतो… येथूनच जवळ केदारेश्वराचे प्राचीन मंदिरही पाहण्यासारखे आहे… नागार्जुन गुंफा व सितान्हाणी या गुंफा तसेच नवव्या शतकात कोरलेल्या जैन लेण्याही आहेत… या लेण्यांच्या पुढे सीतेची न्हाणी नावाची लेणी आहे. ही लेणी प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झाल्याची येथील भाविकांची श्रद्धा आहे… त्याचप्रमाणे दक्षिणेतील  पुरातन लेणी पितळखोरे सुद्धा याच ठिकाणी आहे. 

असे  विविधतेने नटलेले पाटणा देवीचे मंदिर… अनेकांची ही कुलस्वामिनी आहे. आजही कुळधर्म कुळाचारात बरेच भक्त धवलतीर्थातून देवीचे स्मरण करुन पूजेसाठी तांदळा नेतात.

दरवर्षी शारदीय नवरात्र महोत्सव व वासंतिक यात्रा महोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो.. दर पौर्णिमेस देवी चंडिका हिची (भगवतीची) महापूजा केली जाते..

चला तर मग…चाळीसगाव तालुक्यातील पाटणादेवी या धार्मिकस्थळाला नक्कीच  भेट द्यायला हवी…

 

संग्रहिका –  सुश्री संगीता कुलकर्णी 

लेखिका /कवयित्री

ठाणे

9870451020

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ चंद्रघंटा…. ☆ श्रीमती अनुराधा फाटक

श्रीमती अनुराधा फाटक

? कवितेचा उत्सव ?

☆ चंद्रघंटा… ☆ श्रीमती अनुराधा फाटक ☆ 

मस्तकी चंद्राकार घंटाधारिणी

पूजा तुझी होतसे तृतिय दिनी

सिंह वाहिनी नव अस्त्रेधारिणी

एक वरदहस्त दशभुजांगिनी !

रुप पार्वतीचे स्वरूप शक्तीचे

शांतवृत्ती शिवरुप परिवर्तनी

दूर करिसी संकटे भक्तांची

आशीश देसी महिषासुरमर्दिनी!

कल्याणकारी आशीर्वच देई

अलौकिक जगन्माते रुपदर्शनी!

 

© श्रीमती अनुराधा फाटक

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – मनन चिंतन ☆ संजय दृष्टि – हिंदी माह विशेष – भाषा ☆ श्री संजय भारद्वाज

श्री संजय भारद्वाज 

(श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही  गंभीर लेखन।  शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं  और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं।  हम आपको प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक  पहुँचा रहे हैं। सप्ताह के अन्य दिवसों पर आप उनके मनन चिंतन को  संजय दृष्टि के अंतर्गत पढ़ सकते हैं। )

? संजय दृष्टि – राजभाषा मास विशेष – भाषा ?

 

नवजात का रुदन

जगत की पहली भाषा,

अबोध की खिलखिलाहट

जगत का पहला महाकाव्य,

शिशु का अंगुली पकड़ना

जगत का पहला अनहद नाद,

संतान का माँ को पुकारना

जगत का पहला मधुर निनाद,

प्रसूत होती स्त्री केवल

एक शिशु को नहीं जनती,

अभिव्यक्ति की संभावनाओं के

महाकोश को जन्म देती है,

संभवतः यही कारण है,

भाषा स्त्रीलिंग होती है!

अपनी भाषा में अभिव्यक्त होना अपने अस्तित्व को चैतन्य रखना है।

©  संजय भारद्वाज

(रात्रि 3:14 बजे, 13.9.19)

अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार  सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय  संपादक– हम लोग  पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ☆ ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स 

संजयउवाच@डाटामेल.भारत

[email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – कविता ☆ “श्री रघुवंशम्” ॥ हिन्दी पद्यानुवाद सर्ग # 2 (31-35)॥ ☆ प्रो. चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’

॥ श्री रघुवंशम् ॥

॥ महाकवि कालिदास कृत श्री रघुवंशम् महाकाव्य का हिंदी पद्यानुवाद : द्वारा प्रो. चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’

☆ “श्री रघुवंशम्” ॥ हिन्दी पद्यानुवाद सर्ग # 2 (31-35) ॥ ☆

 

ज्यों दाहिने हाथ की नखप्रभा से भूषित हुआ बाण का कड़कपत्र

तूणीर के बाण में हाथ चिपका राजा विवश रह गया ज्यों ही चित्र ॥31॥

 

चिपका हुआ हाथ अवरूद्ध इच्छा, छूना जिसे पाप स हो गया था

राजा प्रतापी मन में विकल था, ज्यों मंत्र कीलित विषधर कोई था ॥32॥

 

मनुवंश के न्यायप्रिय वीर नृप से जो निज दशा पर स्वयं अति चकित थे

उस धेनुधारी महासिंह ने और विस्मित किया मानुसी बात करके ॥33॥

 

रूको महीपाल, हुआ बहुत श्रम वृथा यहाँ अस्त्र रहा तुम्हारा

तरू को गिरा ले भले तेज आँधी बल गिरि शिखर हेतु पर व्यर्थ सारा ॥34॥

 

कैलाश  सम श्वेत वृषभारू रोही शिव के चरण पात से पृष्ठ पावन

कुम्भोदर नाम निकुम्भ का मित्र, जानो मुझे शम्भु का दास राजन ॥35॥

 

© प्रो. चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’   

A १, विद्युत मण्डल कालोनी, रामपुर, जबलपुर. म.प्र. भारत पिन ४८२००८

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – कविता ☆ “श्री रघुवंशम्” ॥ हिन्दी पद्यानुवाद सर्ग # 1 (86-90)॥ ☆ प्रो. चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’

॥ श्री रघुवंशम् ॥

॥ महाकवि कालिदास कृत श्री रघुवंशम् महाकाव्य का हिंदी पद्यानुवाद : द्वारा प्रो. चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’

☆ “श्री रघुवंशम्” ॥ हिन्दी पद्यानुवाद सर्ग # 1 (86-90) ॥ ☆

पुण्य दर्शनी धेनु लख शकुन सुखद अनुमान

मुनिवर बोले नृपति से, सफल मनोरथ मान ॥ 86॥

 

सिद्धि न कोई दूर है हो राजन विश्वास

नाम लिये ही आ गई कल्याणी लो पास ॥ 87॥

 

वन में कर गो अनुगमन वनचर बन रह पास

करें प्रसन्न इन्हें यथा विद्या को अभ्यास ॥ 88॥

 

इनके चलते ही चलें, रूकने पै रूक जाँय

जल पीने पर जल पियें बैठे तब सुस्ताँय ॥ 89॥

 

भक्तिभाव से वधू भी कर पूजन अविराम

वन को जॉयें प्रात प्रति, लौटे सँग में शाम ॥ 90॥

 

© प्रो. चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’   

A १, विद्युत मण्डल कालोनी, रामपुर, जबलपुर. म.प्र. भारत पिन ४८२००८

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कलास्वाद ☆ आनंद रंगरेषांचा – मधुबनी शैली/ पेंटिंग ☆ सौ.वंदना अशोक हुळबत्ते

सौ.वंदना अशोक हुळबत्ते

? कलास्वाद ?

☆ आनंद रंगरेषांचा – मधुबनी शैली/ पेंटिंग ☆ सौ.वंदना अशोक हुळबत्ते ☆

चित्रकला हा मानवी जीवनातील अविभाज्य भाग आहे. ज्या वेळी भाषा विकसित झाली नव्हती तेव्हा आदिमानव आपल्या भावना चित्राच्या माध्यमातून व्यक्त करीत होता. अश्मयुगातील गुहाचित्रातून हे स्पष्ट झाले आहे. आज ही चित्रकला आदिवासी लोकांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. सांस्कृतिक ठेवा आहे. लोककलेची ओळख करून घेऊ.

आबालवृद्धांना चित्र पाहणे आवडते. सरळ साधी सोपी चित्रे सहज समजतात.त्या चित्रातील रंग आकर्षक असतील तर ती चित्रे पुन्हा पुन्हा पहावीशी वाटतात. मधुबनी शैलीची चित्रे सर्वांग सुंदर आहेत.त्यातील विषय,आशय, रंग बघताक्षणी आपल्या खिळवून ठेवतात.

मधुबनी पेंटिंग हा बिहारचा सांस्कृतिक ठेवा आहे.हा चित्र प्रकार सुंदर आहे.ही चित्रे छान तेजस्वी रंगात रंगवलेली असतात. रेखांकन मुक्त असते. पाने, फुले, पक्षी, प्राणी, मासा, देवदेवता, किती सहजतेने काढलेली असतात. १९३४ साली बिहार मध्ये मोठा भूकंप झाला तेव्हा या भागाची पाहणी करण्यासाठी एक इंग्रज अधिकारी तिथे आला तेंव्हा भूकंपात पडलेल्या घराचच्या  भिंती वर सुंदर चित्रे दिसली.त्या चित्राचे त्यांनी फोटो काढले. हे फोटो या चित्र शैलीचे सर्वात जुने नमुने आहेत. ही चित्रे गावातून बाहेर कधी आलीच नव्हती. ही चित्रेशैली आजवर बिहार मधील महिलांनी जोपासली. बिहार मधील काही गावं चा गावं या चित्र शैलीने सजलेली दिसतात. प्रत्येक घरातील चार वर्षाच्या मुली पासून नव्वद वर्षांच्या महिले पर्यत सर्वजण ही चित्रे काढतात. जणू ही चित्र शैली त्यांच्या रक्तातून धावत आहे.

बिहार राज्यातील मधुबनी जिल्ह्यात ही कला विकसित झाली. म्हणून याला मधुबनी पेंटिंग/शैली म्हटले जाते. मधुबनी बरोबर दरभंगा, पूर्णिया, सहसा, मुजक्कापूर व नेपाळचा काही भाग यातून ही चित्रे काढली जातात. ही कला पुरातन काळा पासून प्रचलीत आहे असे मानले जाते. जनक राजाने आपली कन्या  सीता हीच्या विवाह सोहळ्याच्या वेळी संपूर्ण राजवाड्यात, गावात ही चित्रे काढून घेतली होती. म्हणून या  कलेला मिथिला पेंटिंग/शैली म्हणून ही ओळखली जाते. रामायण  काळापासून ही कला चालत आली आहे.

या चित्र शैलीचे दोन प्रकार

१) भिंती चित्रे

२)अरिपन चित्रे

१) भिंतीवर चित्रे काढण्याचे दोन प्रकार पडतात अ) गोसनी म्हणजे देवघराच्या भिंतीवर काढायची चित्रे यात दुर्गा, काली, गणेश, सूर्य, राधाकृष्ण या विषयावर चित्रे. काढतात.

ब) कोहबर म्हणजे शयन कक्ष इथे प्रमुख्याने कमळ,मासा,झाडे, शिवपार्वती,घोडा,सिंह इ.चित्रे रेखाटली जातात.

२)अरिपन म्हणजे रांगोळी. अल्पना ही म्हणतात. घरातील खोलीच्या फरशीवर, अंगणात, सुंदर रांगोळ्या काढल्या जातात.त्यात रेषेला जास्त महत्त्व असते.

ही चित्रे काढण्यासाठी बांबूच्या काटक्या, काडेपेटीच्या काड्या यांचा उपयोग होत असे.ही चित्रे रंगवण्यासाठी नैसर्गिक रंगांचा वापर केला जातो.हळदी पासून पिवळा,पळसा पासून लाल,काजळी पासून काळा,तांदळा पासून पांढरा.

चित्राचे रेखांकन प्रथम काळ्या‌ रंगाने करून घेतले जाते. मग त्यात लाल,पिवळा,हिरवा,निळा हे रंग भरले जातात.बार्डर दुहेरी असते.चित्रातील चेहरे व्दिमित एका बाजूला पाहणारे असतात.ही चित्रे सहज समजतात.त्यांतील भाव कळतात .चित्रे आपल्याशी बोलतात म्हणून तर ही चित्रे आंतरराष्ट्रीय स्तरावर जावून पोहचली.परदेशातून या चित्रांना मोठी मागणी आहे.विशेषत: अमेरिका,जपान.जपान मध्ये मधुबनी कलेचे मोठे म्युझियम आहे.या कलेच्या प्रसार करण्यासाठी १५० महिला कलाकारांनी मधुबनी रेल्वेस्थानक विनामोबदला सुशोभित केले आहे.नंतर दरभंगा, पूर्णिया,सहसा,मुजक्कापुरही रेल्वे स्थानके ही सुशोभित केली.ही कला केवळ महिलांन मूळे जिवंत आहे.आज पर्यंत महिलांनी टिकवली आणि विकसित केली.या चित्राची वाढती मागणी पाहून पुरुष चित्रकार ही आता तयार झाले आहेत.पण या कलेच्या विकासाचे आणि संवर्धनाचे सारे श्रेय महिलांनाच जाते.

मधुबनी चित्रात साधेपणा दिसतो.बघता क्षणी मनाला भावतात.मनुष्य,पशुपक्षी,देवीदेवता, राधाकृष्ण, शिवपार्वती,फळे फुले,शुभचिन्हे,चित्रे काढली जातात.मातीच्या भिंतीवर, कागदावर, काॅन्व्हासवर, पिलोवर ही चित्रे काढली जातात. सीता देवी यांनी ही कला गावातून बाहेर काढली. दिल्लीत चित्रे पाठवली, प्रदर्शने मांडली, लोकांन समोर मांडली. लोकांना चित्रे समजू लागली मागणी वाढू लागली स्थानिक महिलांना रोजगार मिळू लागला.परदेशातील आर्ट गॅलरीत ही चित्रे पोहचली.चित्रांना आंतरराष्ट्रीय स्तरावर मागणी वाढली. सीतादेवींच्या या कामाची दखल घेवून त्यांना बिहार सरकारने पुरस्कार देवून १९६९ मध्ये सन्मानीत केले, तर भारत सरकारने १९८४ ला पद्मश्री देवून सन्मानित केले. ही कला विकसित होण्यास जगदंबा देवी,महासुंदरी देवी,बउआ देवी या महिलांचे योगदान महत्त्वाचे आहे.त्यांना ही पद्मश्रीने सन्मानीत केले आहे.

या कलेचे महत्त्व इतके वाढले आहे की स्टेट बॅक ऑफ़ इंडियाने आपले डेबीट कार्ड या चित्राने सुशोभित केले आहे. अनेक रेल्वेचे डबे या चित्राने सजत आहेत.ह्या चित्रातील साधेपण आपल्या आकर्षित करतो.ही कला कलाकारी न राहता आता कारागिरी झाली आहे. अनेक महिला या कलेवर आपला उदरनिर्वाह करत आहेत. ही कला केवळ बिहार ची न राहता भारताचा सांस्कृतिक ठेवा झाली आहे. तिचे जतन करणे आपले कर्तव्य आहे.

© सौ.वंदना अशोक हुळबत्ते

सांगली

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ आई☆ सौ. अमृता देशपांडे

सौ. अमृता देशपांडे

 ☆ विविधा ☆ आई☆ सौ. अमृता देशपांडे ☆ 

आज घरी लक्ष्मीपूजनाची गडबड चालू होती.  लक्ष्मीची तसवीर ठेऊन पिवळ्या शेवंतीचा हार घातला. घरातल्या प्रत्येकाने पूजेला आपले पैशाचे पाकीट ठेवले.बँकांची पासबुक्स,  चांदीची नाणी, सुवर्ण अलंकार,  हळदी कुंकवानं भरलेले करंडे, पाच फळांची परडी,  फुले, पंचामृत, धण्याच्या अक्षता, गूळ, पेढे सर्व तयारी जय्यत झाली. आदित्य,  माझा मुलगा,  सोवळे नेसून,  कपाळी केशरी नाम ओढून तयार झाला. नारळ पानसुपारीचा विडा ठेऊन पूजा सुरू करणार, तोच मला आठवण झाली,  अरे, तो लाल मखमली बटवा ठेवायचा राहिला की…. मी कपाटातला बटवा आणला आणि पूजेला ठेवला.

रीतसर पूजा झाली. आरती झाली. लक्ष्मीची स्तोत्रे म्हणून झाली. सर्वांनी कुंकू, फुले अक्षता वाहिल्या. तीर्थप्रसाद दिला. लक्ष्मीपूजन छान झाले.

न राहवून आदित्य नं विचारले, ” आई, त्या लाल बटव्यात काय आहे?” मी म्हटलं,  ” सांगेन नंतर.”

परवा सहज आदित्य ला आठवण झाली.  तेव्हा मी त्याला बटवा उघडून दाखवला.

” दहा रुपयाची नोट आईनं दिलेली.”  चेह-यावर प्रश्नचिन्ह घेऊन गडबडीत तो ऑफिसला गेला. पण माझ्या मनातून आज ते दहा रुपये हटेनात. रात्री अंथरूणावर पाठ टेकली तसे सर्व प्रसंग video बघावा तसे डोळ्यांसमोरून सरकू लागले.

ह्यांच्या, ( आदित्य च्या पप्पांच्या) अकाली निधनानंतर मला नोकरी करण्याशिवाय पर्याय नव्हता. दोन्ही मुलांचा सांभाळ आणि शिक्षण हे माझं पहिलं कर्तव्य होतं. सुरवातीला अगदी तुटपुंजा पगार ( रू.975/- फक्त) होता. ह्यांच्या पश्चात आलेली रक्कम हात न लावता ठेवायची, असं ठरवूनही वापरावी लागे. माझी एकूण सगळी ओढाताण आई बाबांना न सांगताच समजत असे. आईची तळमळ मला जाणवत होती.  बाबा नेहमीप्रमाणे ‘ हेही दिवस जातील,  धीर धर, म्हणून पाठिंबा देत होते.  ” फिरते रूपयाभवती दुनिया” याचा पावलो पावली प्रत्यय येत होता.

स्वतःच्या मेरीटवर घेतलेलं शिक्षण,  मेरिटवर मिळालेली नोकरी, मेहनत करून मिळवलेला पैसाच खरा, तोच आपले चारित्र्य ठरवत असतो.  हे आधी बाबांचे आणि नंतर ह्यांचे संस्कार.  हाता- तोंडाची जुळवणी करता करता वर्षे उलटली.

आई आजारी होती म्हणून तिला बघायला गेले होते माहेरी. तेव्हा आईनं माझ्या हातात ती पुडी दिली. उघडून बघते तर एक दहा रूपयांची जुनी नोट. काय आई तरी! क्षणभर विचार आला, आईकडे कुठून आले हे पैसे? कारण आता धाकटा भाऊ आणि भावजय सगळे व्यवहार बघत होते.  तिच्या समाधानासाठी घेतले मी ते पैसे. घरी आल्यावर कपाटात ठेऊन दिले.

पुढे 15च दिवसात आईनं या जगाचा निरोप घेतला. मला तिकडं पोचेपर्यंत पाच तास गेले. आईला तशी झोपलेली बघून मी तरी कोसळलेच.

” अशी कशी गेलीस ग आई? ” माझ्यातल्या वासरानं हंबरडा फोडला.

सर्व सोपस्कार झाल्यावर दुस-याच दिवशी परतावं लागलं. दिवसाला सुद्धा जायला जमलं नाही. तिचीच शिकवण, ” कर्तव्यात चुकारपणा करायचा नाही. कर्तव्य आपुलकीने करायचे. कर्तव्य आणि आपुलकी ची सांगड जबाबदारीने घालायची.” हे तिने आयुष्य भर केले, आम्ही ही नकळत तेच शिकलो.

आई गेली. सवाष्ण असतानाच गेली. गळ्यात दोन सुवर्ण वाट्या असलेली काळ्या मण्यांची पोत,  हातात दोन दोन काचेच्या बांगड्या,  कपाळावर लाल कुंकू इतके अहेव लेणे आयुष्य भर लेवून अखंड सौभाग्यवती राहून गेली. तिचा पार्थिव देह हिरव्या साडीत  झाकलेला होता.  मुखावर डोळे दिपवून टाकणारे तेज पसरले होते. येणारे लोक आश्चर्याने बघत होते.  देवीप्रमाणे नमस्कार करत होते. लोकांची गर्दी जमली होती.  चेह-यावरून नजर हटत नव्हती.

इतकी वर्षे कुणाची नजर लागू नये म्हणून आम्हां मुलांवरून, नातवंडांवरून  मीठमोह-या आईनं कितीतरी वेळा उतरल्या होत्या.आज मला तिची दृष्ट काढावीशी वाटली.

आई गेली.  घर माणसं असून सुनं सुनं झालं. डोळ्यातलं पाणी पापण्यातून परतवत मी परतले. दुसरे दिवशी जड मनाने पुडी उघडून नोट हातात घेतली. ती देताना आई मला बोलली होती. ” बेटा, खूप अवघड डोंगर चढलीस, खूप त्रास,  खूप दु:ख झेललेस.  पण तोंडातून चकार शब्द काढला नाहीस. ” मी म्हटलं  , ” आई तुझीच ना ग मी लेक, तुझ्याकडूनच शिकले.” तिनं माझ्या हातात पुडी दिली. जपून ठेव म्हणाली. ती नोट मी देवीसमोर ठेवली , नमस्कार केला आणि परत कपाटात ठेवली.

आईच्या जाण्याच्या दुःखानं मन आणि शरीर कमजोर आणि हळुवार झालं होतं. त्यातून बाहेर निघणं आम्हां भावंडांना जड जात होतं. महिनाच झाला जेमतेम, तोच बाबाही आम्हाला सोडून गेले. उरलासुरला आधार गेला. मातृछत्र,  पाठोपाठ पितृछत्र ही हरवलं.  आम्ही पार ढासळलो.  मूकपणे एकमेकाला सावरू लागलो.  दिवसामागून दिवस गेले.  दुःखावर काळ हाच उपाय असतो.

आई  गेल्यानंतर दोनच महिन्यात ध्यानी-मनी नसताना माझं प्रमोशन झालं. कमाईत थोडी सुधारणा झाली. डगमगणारी आर्थिक गाडी हळूहळू रुळावर येऊ लागली. पुढे पुढे तर कधीच आर्थिक चणचण जाणवली नाही. हा त्या दहा रुपयाच्या नोटेचा चमत्कार आणि आईचा आशीर्वाद. जाताना आई मला श्रीमंत करून गेली.

सहा फेब्रुवारी ला आईला जाऊन 13 वर्षे होतील. ती दहा रुपयांची नोट हीच आज माझी ताकद आहे आणि तीच माझी श्रीमंती.

मला आईच्या दूरदृष्टीचं कौतुक वाटतं. बदलणारी परिस्थिती सहजपणे आणि सकारात्मकतेने स्वीकारण्याचे बाळकडू मला आईने पाजले. तिच्या विचारांच्या आणि मनाच्या श्रीमंतीने मलाही खूप शिकवले. आयुष्यात पैसाअडका,  दागदागिने कशाचाच हव्यास न धरता तिने अनेक आयुष्ये घडवली.

दहा रूपयांच्या रूपात आईने लक्ष्मी माझ्या हातात दिली. लक्ष्मीच्या तसबिरीकडे पहाताना मला आईचाच भास होतो.

आईचं दुसरं रूप लक्ष्मी?

की लक्ष्मीचंच सगुण रूप आई?

© सौ अमृता देशपांडे

पर्वरी- गोवा

9822176170

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – कविता ☆ “मेघदूतम्” श्लोकशः हिन्दी पद्यानुवाद # मेघदूत…. उत्तर मेघः ॥२.८॥ ☆ प्रो. चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’

महाकवि कालीदास कृत मेघदूतम का श्लोकशः हिन्दी पद्यानुवाद : द्वारा प्रो. चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’

☆ “मेघदूतम्” श्लोकशः हिन्दी पद्यानुवाद # मेघदूत …. उत्तरमेघः ॥२.८॥ ☆

 

नीवीबन्धोच्च्वासितशिथिलं यत्र बिम्बाधराणां

क्षौमं रागादनिभृतकरेष्व आक्षिपत्सु प्रियेषु

अर्चिस्तुङ्गान अभिमुखम अपि प्राप्य रत्नप्रदीपान

ह्रीमूढानां भवति विफलप्रेरणा चूर्णमुष्टिः॥२.८॥

 

उन वृक्ष के बीच कोमल हरित बाँस

के रंग मणि से जड़ित रूप शाली

आवास के हेतु स्वर्णिम शलाका

स्फटिक के फलक पर खड़ी जो लता सी

जिस पर ध्वनित कंगनो तालियों का

मधुर ताल स्वर मम प्रिया का नचाता

तुम्हारे सखा मोर को शाम को जो

उसी पर बसा नित्य विश्राम पाता

 

© प्रो. चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’   

A १, विद्युत मण्डल कालोनी, रामपुर, जबलपुर. म.प्र. भारत पिन ४८२००८

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares